पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यात कोरोनाचे आणखीन आठ रुग्ण आढळले आहेत. पेण शहरातील फणसडोंगरी येथे चार व पूर्व विभागातील मांगरुळ येथे चार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाचा आता पेण तालुक्यातील पूर्व विभागासह पेण शहरातही शिरकाव झाला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. हे रुग्ण कोणाकोणाच्या संपर्कात आले त्याचा …
Read More »रेल्वे अपघातात तिघांचा मृत्यू
पेण ः प्रतिनिधी पेण रामवाडी ब्रिजजवळ रेल्वे अपघातात तीन जण ठार झाल्याने खळबळ उडाली आहे. पेण चिंचपाडा येथील सुशील वर्मा (24), सुनील वर्मा (25) व निखिल गुप्ता (25) अशी मृत तरुणांची नावे आहेत. हे युवक शनिवारी रात्रीच्या सुमारास रामवाडी रेल्वे ब्रिजच्या पुढे वडखळ बाजूकडे स्टोन क्र. 104/2जवळ बसले असताना मालगाडीने …
Read More »निसर्ग भ्रमंती मंडळाकडून वृक्षारोपण
कर्जत ः बातमीदार कर्जतच्या कचेरी टेकडीवर ओम निसर्ग भ्रमंती मंडळाच्या माध्यमातून हिरवाई निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चक्रीवादळात ज्या भागात झाडे कोसळली, त्या जिल्हा परिषद विश्रामगृह परिसरात 50 मोठ्या झाडांची लागवड करण्यात आली. कर्जतच्या तहसील टेकडीवर ओम निसर्ग मैत्री भ्रमंती परिवाराच्या वतीने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टेकडीवरील उप …
Read More »शाळांच्या दुरुस्तीस विशेष निधी द्या; आमदार निरंजन डावखरे यांची मागणी
अलिबाग ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाचा कोकणातील शाळांच्या इमारतींना मोठा फटका बसला असून इमारतींच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारने विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. त्याचबरोबर खासगी अनुदानित शाळांच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी आमदार निधीतून खर्च करण्यास परवानगी देण्याची मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. …
Read More »गुंडगे परिसराचा वीजपुरवठा पूर्ववत; महावितरणचे प्रयत्न
कर्जत ः बातमीदार निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात कर्जत शहरातील गुंडगे प्रभागात ठाकूरवाड़ी येथील एक मोठे झाड विजेच्या खांबावर पडले होते. त्यामुळे गुंडगे भागातील तो परिसर आणि विश्वनगर चार दिवस अंधारात होते. दरम्यान, महावितरणकडून सातत्यपूर्ण प्रयत्न झाल्याने त्या परिसरात चार दिवसांनी विजेचे दिवे पुन्हा उजळले आहेत. गुंडगे भागातील विश्वनगर व ठाकूरवाडी परिसरात …
Read More »चक्रीवादळाचा हाहाकार; रोह्यात फळबागांचे मोठे नुकसान; हजारो हेक्टर क्षेत्र बाधित
रोहे ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाने रोहा तालुक्यात थैमान घालून हजारो घरांचे अतोनात नुकसान केले. अनेकांच्या घरावरील पत्रे व कौले उडाली. विजेचे खांब पडले. रोहा तालुक्यात असंख्य झाडे उन्मळून पडली. बागायतदार शेतकर्यांचे सर्वांत जास्त नुकसान झाले असून सर्वाधिक फटका आंबा, केळी, पपईसारख्या फळझाडांना बसला आहे. रोहा तालुक्यात सुमारे 1400पेक्षा जास्त हेक्टरमधील …
Read More »आपत्तीत ‘हॅम’चा आधार; 98 तास अविरत सेवा
अलिबाग ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला मोठा तडाखा दिला आहे. मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. वीजपुरवठा खंडित झाला. लाखो घरांचे नुकसान झाले. संपर्क यंत्रणा कोलमडली होती. त्यामुळे कुणाशीही संपर्क होऊ शकत नव्हता. सर्वच जॅम झाले होते. अशा कठीण परिस्थितीतही हॅम रेडिओ ऑपरेटर यंत्रणा अविरत काम करीत होती. त्यामुळे शासकीय यंत्रणा …
Read More »कोळी बांधवांचे वादळात बोटी फुटल्याने अतोनात नुकसान
मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यात निसर्ग चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केले. राजपुरी येथील कोळी बांधवांच्या आगरदांडा बंदरात बांधून ठेवलेल्या बोटी वादळात फुटून नुकसान झाले आहे. वादळात 30 मिनिटांमध्ये शहरातील 50 टक्के घरांचे कौले, पत्रे उडाले. पाऊस उलट्या दिशेने वाहून शहरातील सर्वच घरांचे मोठे नुकसान झाले. अनेक घरांवर नारळाची झाडे पडली. राजपुरी …
Read More »शेतीकामांबाबत शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन; रिलायन्स फाऊंडेशनचा पुढाकार
कर्जत ः बातमीदार निसर्ग चक्रीवादळानंतर निर्माण झालेल्या नैसर्गिक स्थितीत शेतकर्यांनी कशा पद्धतीने काम केले पाहिजे, शेतीची कामे करताना कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. रिलायन्स फाऊंडेशन रायगड जिल्हा शाखेच्या माध्यमातून शेतकर्यांसाठी ध्वनी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यात रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले …
Read More »आदिवासींना रोटरी क्लबकडून मदतीचा हात
कर्जत ः बातमीदार निसर्ग चक्रीवादळामुळे कर्जत तालुक्यातील शिंगढोळ गावाचे मोठे नुकसान झाले आहे. आदिवासी आणि गरीब लोकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड येथील रोटरी क्लबकडून त्यांना महिनाभराचे रेशन आणि संसार उपयोगी वस्तूंची मदत करण्यात आली. कर्जत रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रामदास घरत यांनी शिंगढोल गावाची स्थिती रोटरी इंटरनॅशनल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper