Breaking News

Ramprahar News Team

मुक्या प्राण्यांची काळजी घ्या!; प्राणीमित्रांचे आवाहन

पेण ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी असलेल्या लॉकडाऊन व संचारबंदीत मुक्या प्राण्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. लॉकडाऊनमुळे सर्वत्र शुकशुकाट आहे. अन्न व खाद्यपदार्थांची दुकाने तसेच हॉटेल्स बंद असल्याने कचर्‍यात तसेच उकिरड्यावर पडलेले अन्नही भटक्या प्राण्यांना मिळत नाही. एप्रिलमध्ये उन्हाचा पारा वाढल्याने प्राणी-पक्ष्यांचा अन्नपाण्यावाचून तडफडून मृत्यू होण्याची शक्यता असल्याने मुक्या …

Read More »

बौद्ध समाज सेवा संघाकडून अन्नधान्याचे वाटप

मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुरूड तालुका बौद्ध समाज सेवा संघाकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील आगरदांडा, खरआंबोळी, सायगाव, तेलवडे, विहूर, माजगाव, नांदगाव, उसरोळी, वाकळवती आदड, काशीद, बारशीव, बोर्ली आदी गावांतील मोलमजुरी करणारे मजूर, निराधार विधवा महिला व अपंग घटकातील 250 कुटुंबांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. सदर उपक्रमात …

Read More »

नेरळ पोलिसांची धडक कारवाई; संचारबंदीत फिरणार्‍या वाहनचालकांना दंड; पावणेदोन लाखांचा महसूल गोळा

कर्जत ः बातमीदार कोरोनामुळे संचारबंदी जारी असून शासनाच्या आदेशाने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य वाहनांना पेट्रोल देऊ नये, असे आदेश आहेत. तरीही अनेक वाहने रस्त्यावर दिसत असून अशा वाहनांवर रायगड पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिले आहेत. त्यानुसार नेरळ पोलिसांनी एप्रिल महिन्यातील 19 दिवसांत एक लाख 80 हजारांचा महसूल …

Read More »

जासई परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित

अलिबाग : प्रतिनिधी जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जासई हद्दीतील बिल्डींग इ व एफ रेल्वे कॉलनी, जासई गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस हे क्षेत्र कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात राहणार्‍या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणार्‍या …

Read More »

महाड तालुक्यात वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस

महाड : प्रतिनिधी तालुक्यात रविवारी (दि. 19) सायंकाळी वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस पडला. पावसामुळे हवेत गारवा आला असला, तरी हा पाऊस पिकांसाठी नुकसानदायक ठरू शकतो. मध्यंतरीही महाडला वादळी पावसाने झोडपले होते. तशाच प्रकारे रविवारी पुन्हा सायंकाळी हजेरी लावली. या पावसामुळे उष्म्यापासून दिलासा मिळाला खरा, पण नुकसान होण्याची भीती व्यक्त होत …

Read More »

रस्त्यावर संदेश लिहून जनजागृती; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेण पालिकेचा उपक्रम

पेण : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेण शहरात नगर परिषदेमार्फत स्वच्छता व जनजागृती मोहीम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून शहरातील रस्त्यांवर प्रबोधनात्मक संदेश लिहून जनजागृती करण्यात येत आहे. पेण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता, फवारणी, निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. सर्व कर्मचार्‍यांना आरोग्यविषयक साहित्य देण्यात आलेले आहे. …

Read More »

नागोठण्यातही 33 जण ताब्यात

नागोठणे : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागोठण्यातही मॉर्निंग वॉक करणार्‍या 33 जणांना रविवारी (दि. 19) नागोठणे पोलिसांनी ताब्यात घेतले. यात काही महिलांचाही समावेश होता. कोरोनामुळे असलेले लॉकडाऊन व संचारबंदीकडे दुर्लक्ष करीत नागोठण्यातील काही नागरिक बिनक्कित फिरत आहेत. अशाच प्रकारे रविवारी नागोठणे-वासगाव रस्त्यावर मॉर्निंग वॉक करीत असताना 33 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. …

Read More »

उरणमध्ये कोरोनाविरुद्धचा लढा आता होणार अधिक तीव्र; व्यापारी असोसिएशनचा पुढाकार; दुकानदार, विक्रेत्यांसाठी वेळापत्रक

उरण : वार्ताहर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उरण शहरात विविध उपाययोजना करण्याचे आवाहन व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. दुकानदार, विक्रेते तसेच नागरिकांनी मिळून कोरोनाविरुद्ध लढा तीव्र लढा देण्याचे या माध्यमातून निर्धार करण्यात आलेला आहे. येत्या 20 एप्रिलपासून सर्व हॉटेल आणि मिठाई विक्रेते यांनी रोज सकाळी 8 ते दुपारी 2 व …

Read More »

मॉर्निंग वॉकला गेलेल्या 33 जणांची नेरळमध्ये पोलिसांकडून धरपकड

कर्जत : बातमीदार लॉकडाऊन आणि संचारबंदी असूनही मॉर्निंग वॉकला जाणार्‍या 33 जणांना नेरळ पोलिसांनी रविवारी (दि. 19) पकडले. यातील बहुतांश जण हे जेष्ठ नागरिक असल्याने सर्वांना समज देऊन सोडण्यात आले, मात्र यापुढे कुणीही अशा प्रकारे फिरताना आढळल्यास कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. संचारबंदीबाबत अनेक जण जागरूक नसल्याचे …

Read More »

मुरूड शहर आठवड्यातून दोन दिवस राहणार बंद; पहिल्याच दिवशी नागरिकांचा प्रतिसाद

मुरूड : प्रतिनिधी शेजारील श्रीवर्धन तालुक्यात कोरोनाचा रूग्ण आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुरूड शहर रविवार व बुधवार असे दोन दिवस पूर्णत: बंद असणार आहे. व्यापारी, पोलीस आणि नगर परिषद यांनी मिळून हा निर्णय घेतला असून यातून अत्यावश्यक सेवा असलेली औषधांची दुकाने वगळण्यात आली आहेत. कोरोना विषाणूने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे.  …

Read More »