Breaking News

Ramprahar News Team

पुढील आठवड्यापासून सुरू होणार माथेरान ट्वीन ट्यूब बोगद्याचे काम

माथेरान ः रामप्रहर वृत्त भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अर्थात एनएचएआयने 10 हजार 560 कोटी रुपये माथेरान ट्वीन ट्यूब बोगद्यासह आठ लेनच्या मुंबई- वडोदरा एक्स्प्रेस वेची कामे प्रस्तावित केली आहेत. पुढील आठवड्यापासून या मार्गाचे काम सुरू होणार आहे. या एक्स्प्रेस वेमुळे जवाहरलाल नेहरु पोर्ट अथॉरिटी आणि वडोदरा विरारमार्गे प्रवासाचा वेळ तीन …

Read More »

खारघर टाटा रुग्णालयातील प्रतिक्षा यादी संपणार

पनवेल : रामप्रहर वृत्त कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खारघर येथे असलेल्या टाटा मेमोरियल रिसर्च अ‍ॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सर सेंटरमध्ये रुग्ण खाटा व त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी शुक्रवारी (दि. 10) खारघर येथे पत्रकार परिषदेत …

Read More »

गृहपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनाचे परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः वार्ताहर परिणिता सोशल फाउंडेशन आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उद्योजिकांचे गृहपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन पनवेल शहरात प्रथमच गोखले हॉलमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 10) झाले. उद्घाटन समारंभास नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त …

Read More »

तायक्वांदो स्पर्धेत रामशेठ ठाकूर विद्यालयाचे यश

खारघर ः रामप्रहर वृत्त राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद पालघर यांच्या वतीने मुंबई विभागस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन विरार येथील नवीन विवा कॉलेज या ठिकाणी करण्यात आले होते. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर ओवे पेठ येथील रामशेठ ठाकूर …

Read More »

रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी जनर्दन भगत शिक्षक प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ बुधवारी (दि. 8) मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा झाला. हा सोहळा संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यांनी …

Read More »

पेणच्या श्री एकविरा देवीच्या मंदिरात चोरी

चांदीची मूर्ती व पादुका चोरट्यांकडून लंपास पेण ः प्रतिनिधी पेण शहरातील कोळीवाडा येथील आई एकविरा मंदिरात बुधवारी (दि. 9) दुपारच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी देवीची चांदीची मूर्ती व पादुका असा चार किलो चांदीचा दीड लाखांचा ऐवज लंपास केला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच, पेण पोलीस …

Read More »

बोरघाट व सावरोली-पेण मार्गावर बर्निंग कारचा थरार

खालापूर ः प्रतिनिधी खालापूर-पेण मार्गावरील सावरोली गावाजवळ असलेल्या इंडिया बुल इमारत विकसक कंपनीसमोर पॅजोरो गाडीला आग लागली. घटनास्थळी असणार्‍या नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. या घटनेने सावरोली गावाजवळ अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. दुसरी घटना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटातील …

Read More »

आरोग्य केंद्राचा नागरिकांना फायदा -आमदार प्रशांत ठाकूर

गावदेवी केंद्रात महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्य शासनाच्या वतीने जागरूक पालक सदृढ बालक अभियानास गुरुवारी (दि. 9)पासून सुरुवात झाली. हे अभियान मुलांप्रमाणेच पालकांपर्यंत पोहचण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला पाहिजे. येणार्‍या काळात महापालिकेची नऊ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होणार आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्राचा माध्यमातून हजारो नागरिकांना फायदा …

Read More »

उथळ प्रश्न, सखोल उत्तरे

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी संसदेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबाबतच्या आभारप्रदर्शन ठरावावर बोलताना पंतप्रधान मोदी यांच्यावर बेफाम आरोप केले. त्या आरोपांना ना शेंडा होता, ना बुडखा. खरे तर, मोदी यांना अशाप्रकारे प्रश्न विचारणे हे कुठल्याही काँग्रेस खासदारासाठी हास्यास्पदच ठरते. राहुल गांधी हे स्वत: गैरव्यवहारांच्या आरोपांखाली जामिनावर आहेत. अशा लोकांना मोदींसारख्या स्वच्छ …

Read More »

आदिवासी शेतकर्‍यांचा वहिवाटीचा रस्ता अडवला

गोदरेज कंपनीविरोधात शेतकरी करणार आंदोलन खालापूर : प्रतिनिधी खालापूरातील तांबाटी येथे असलेल्या गोदरेज कंपनीच्या आवारात शेतकरी अडीच एकर शेती असून शेतीमध्ये जाण्यासाठी गोदरेजचे व्यवस्थापन रस्ता देत नसल्याचा आरोप शेतकर्‍याने केला आहे. या प्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी शेतकर्‍याने केली असून गोदरेज कंपनी व्यवस्थापनाच्या आडमुठ्या आणि दडपशाही विरोधात स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण …

Read More »