Breaking News

Ramprahar News Team

स्वातंत्र्याचा उत्सव

भारतीय स्वातंत्र्याचा 76वा वर्धापन दिन मंगळवारी साजरा होणार आहे. स्वातंत्र्य मिळवून अमृत महोत्सवी अर्थात 75 वर्षांचा टप्पा आपला देश पार करतोय. यानिमित्ताने वर्षभरापासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. देशाभिमानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच माझी माती, माझा देश अभियानाची घोषणा केली आणि क्रांती दिनापासून याचा शुभारंभ झाला. त्याचबरोबर यंदाही …

Read More »

रोह्यात जादूटोणा करणार्‍या सात जणांना ग्रामस्थांनी दिले पोलिसांच्या ताब्यात

धाटाव : प्रतिनिधी रोह्यातील धामणसई गावच्या हद्दीत अघोरी विद्येचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नऊ अनोळखी व्यक्ती जादूटोणा करीत असताना त्यांना सतर्क ग्रामस्थांनी पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. या झटापटीत दोन जण पळून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काही व्यक्ती कोलाड विभागातील एका व्यक्तीसोबत शनिवारी (दि. 12) धामणसई …

Read More »

श्रीवर्धनमधील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त श्रीवर्धन तालुक्यातील दाडंगुरी गावचे ग्रामस्थ आणि सध्या मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात वास्तव्यास असलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 13) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. या वेळी उद्धव …

Read More »

आपटा ग्रामपंचायतीच्या शेकाप सदस्य गीता देशमुख भाजपमध्ये दाखल

पनवेल ः रामप्रहर वृत्त आपटा ग्रामपंचायतीच्या शेतकरी कामगार पक्षाच्या सदस्य गीता देशमुख व कार्यकर्ते राजू देशमुख यांनी रविवारी (दि. 13) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ …

Read More »

निलिमा चव्हाणला न्याय देण्यासाठी नाभिक समाज एकवटला

रोहा, मुरूडमधील समाजबांधवांचे कारवाईसाठी निवेदन धाटाव, रोहे, मुरूड : प्रतिनिधी चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील रहिवासी 24 वर्षीय तरुणी निलिमा चव्हाण हिचा मृतदेह दाभोळ खाडीकिनारी आढळून आला. त्यामुळे संपूर्ण नाभिक समाज आक्रमक झाला आहे. सोमवारी (दि. 7) रोहा व मुरूडमधील नाभिक समाजबांधवांतर्फे आरोपीला तातडीने ताब्यात घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात …

Read More »

वेगवान विकास

आपल्याकडे एक म्हण आहे इच्छा तिथे मार्ग. जर काहीतरी करण्याची इच्छाशक्ती असेल तर मार्ग सापडतोच आणि दूर्दम्य इच्छाशक्ती असल्यावर तर काय करता येऊ शकते हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या नऊ वर्षांत दाखवून दिले आहे. उत्तुंग व विधायक कार्यातून मोदी सरकारने देशाचा कायापालट केला आहे. आता राज्यातही …

Read More »

पनवेलमधील सुकापूर परिसरात विकासाची गंगा

– विविध कामांचे शानदार उद्घाटन आणि भूमिपूजन – आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलजवळील पाली देवद (सुकापूर) ग्रामपंचायत हद्दीत विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते रविवारी (दि. 6) करण्यात आले. सुकापूरमधील नागरिकांना वाढदिवसाची ही …

Read More »

कामोठ्यातील युवा कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठे येथील असंख्य युवा कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 6) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत करण्यात आले. भाजपच्या पनवेल तालुका व शहर कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप …

Read More »

शेतशिवारातला कवी

‘जैत रे जैत’नंतर कवी ना. धों. महानोर गीतकार म्हणून प्रसिद्ध झाले. साहित्यिक वर्तुळात त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला. अनेक पुरस्कार, साहित्यसंमेलनांतील सहभाग हे सारेही त्यांच्या वाट्याला आले. इतकेच नव्हे, तर ते विधान परिषदेचे सदस्यही बनले, पण तरीही अखेरपर्यंत हा शेतकरी-कवी मनापासून शेतीतच रमलेला राहिला. महानोर गेले. गुरुवारी सकाळीच बातमी आली. …

Read More »

विमानतळाच्या तीन प्रमुख मार्गांवर 9 ऑगस्टला लोकनेते दि. बा. पाटील नामफलक लावणार

सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत निर्णय पनवेल ः प्रतिनिधी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने 9 ऑगस्ट रोजी नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी असलेल्या तीन प्रमुख मार्गांवर नामफलक लावण्याचा निर्णय घेतला आहे. या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा जो ठराव राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही …

Read More »