Breaking News

Ramprahar News Team

पैशांसाठी मित्राचा खून करणारा गजाआड

आरोपीला पनवेल शहर पोलीसांनी ठोकल्या बेड्या पनवेल : वार्ताहर पनवेल शहरात पैशाच्या कारणावरुन मित्राचे शिर धडावेेगळे करून त्याचा खुन केल्याप्रकरणी एका आरोपीला पनवेल शहर पोलिसांंनी अटक केली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्यात 28 जून 2023 रोजीपासुन पनवेल येथुन महंमद अस्लम हाश्मद (वय 42, रा. आशीयाना अपार्टमेंट, पनवेल) हा मिसींग असलेबाबत …

Read More »

कळंबोलीत एकाला सव्वा तीन लाखांचा गंडा

पनवेल : वार्ताहर प्रीपेड टास्क खेळावयास सांगून भरलेल्या रकमेचा अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून तीन लाख 37 हजार 40 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कळंबोली येथे घडला आहे. सेक्टर 11 कळंबोली येथील प्रशांत गडवीर यांना ऑनलाइन वर्क फ्रॉम होम करणार का, याबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी लिंक पाठवल्यानंतर त्यांनी काम करण्याचा …

Read More »

ताम्र धातूवरील आकर्षक मिनाकारी व शिल्पकला

ताम्र धातूवरील आकर्षक मिनाकारी व शिल्पकला भारतात शेकडो वर्षांपासून आहे. आधुनिकतेच्या काळात ही कला लोप होण्याच्या मार्गावर असताना अलिबाग तालुक्यातील भायमळा या गावात संजय पाटील व त्यांचा मुलगा विक्रांत पाटील हे पिता-पुत्र ही प्राचीन कला जोपासण्याचे काम करीत आहेत. विशेष म्हणजे देशी-परदेशी नागरिक येथे येऊन ही कला जाणून घेत आहेत. …

Read More »

अग्निपरीक्षेत उत्तीर्ण

तिन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये खातेवाटप कसे साधायचे हा खरोखरच कळीचा मुद्दा होता, परंतु अशा तारेवरच्या कसरतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माहीर आहेत. या अग्निपरीक्षेतदेखील ते पैकीच्या पैकी गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत असेच म्हणावे लागेल. जनतेच्या माथ्यावर मारण्यात आलेले महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाले त्याला वर्ष उलटून गेले. या वर्षभराच्या काळात महाराष्ट्राचा कारभार …

Read More »

दुर्गम गावात अन्नधान्याची तजवीज

पावसाळ्यात पुरेल इतके धान्य प्रशासनाकडून उपलब्ध अलिबाग : प्रतिनिधी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे दुर्गम गावातील नागरिकांची अन्नधान्याअभावी आबाळ होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने गावातील कुटुंबांना सप्टेंबर महिन्यापर्यंत पुरेल इतके धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्यात दोन हजार क्विंटल गहू आणि पाच हजार क्विंटल तांदळाचा पुरवठा करण्यात आला आहे. दुर्गम डोंगराळ भागात …

Read More »

माणगाव बसस्थानकात खड्डे व चिखलातून प्रवाशांची पायपीट

माणगाव ः प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचे असणार्‍या माणगाव बसस्थानकात गेले अनेक दिवस प्रवाशांना खड्डे व चिखलातून पायपीट करावी लागत आहे. याबाबत युवासेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले होते. त्यानंतर आमदार भरत गोगावले यांनी पाठपुरावा करीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून निधी उपलब्ध करून घेतला होता. बसस्थानकातील काँक्रीटीकरणासाठी …

Read More »

सराईत घरफोडी करणारे चोरटे जेरबंद

10 तोळे सोने व कार जप्त; राज्यात एकूण 29 गुन्हे दाखल पेण ः प्रतिनिधी पेण शहरातील जगदंबा सिद्धी अपार्टमेंट चिंचपाडा व रामवाडी येथील बिल्डिंगमध्ये घुसून घरफोडी करणार्‍या सांगली येथील सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबागच्या पोलिसांनी फिल्मी स्टाईलने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी केलेले 10 तोळे सोन्याचे दागिने आणि …

Read More »

बेशिस्त वाहतूक चालकांवर ‘वॉच’

नियमाचे उल्लंघन करणार्‍यावा होणार कारवाइ; पनवेल वाहतूक शाखेचा इशारा पनवेल : वार्ताहर विद्यार्थ्यांच्या वाहतूकीत सुरक्षिततेच्या दृष्टीने पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी पनवेल शहर विद्यार्थी वाहतूक संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक करताना घेण्यात येणार्‍या सर्व प्रकारच्या सूचना दिल्या तसेच तसेच …

Read More »

पोलादपूर तालुक्यातील सदनिकेचा प्रकल्प रखडला

पोलादपूर तालुक्यातील विविध भ्रष्टाचाराचे मनोरंजक किस्से पावसाळ्यात चहाचे घोट घेताना नाक्यानाक्यावर चर्चेत येत असतात, मात्र यासाठी भ्रष्टाचार घडून गेल्यानंतर त्याला जनतेमध्ये कोणी कसा किती फायदा करून घेतला, याबाबत चर्चा होत असते. यापैकी एका सरकारच्या आवास योजनेची सरमिसळ करून भामट्या भावंडांनी केलेल्या घोटाळ्याची सध्या दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू आहे. म्हाडा आणि …

Read More »

रखडलेल्या नियुक्त्या

सर्वोच्च न्यायालयाने 12 आमदारांच्या नियुक्तीला दिलेली स्थगिती आता उठवण्यात आली असून या संबंधातील एका याचिकाकर्त्याने आपली याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे आता विधान परिषदेतील या नियुक्त्या लवकरात लवकर होतील, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेवरील 12 आमदारांच्या नियुक्तीचा रखडलेला प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या हस्तक्षेपामुळे आता मार्गी लागणार आहे. केवळ कुरघोडीच्या …

Read More »