पनवेल ः वार्ताहर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून ज्ञानवसा संवर्धित करण्यासाठी, विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृतीस चालना देण्यासाठी तसेच ऑनलाइन शिक्षणाचे दुष्परिणाम कमी करण्याचा प्रयत्न म्हणून गुळसुंदे येथील कु. गार्गी रेवती वसंत सोमण यांनी विद्यालयास ग्रंथभेट दिली. आत्मचरित्रे, प्रवासवर्णने, कथासंग्रह, कादंबरी अशा विविध विषयांवरील सुमारे सात हजार रुपयांची मराठी …
Read More »पीर करमअली शहा बाबांना 70 फूट फुलांची चादर
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल ः प्रतिनिधी पनवेलकरांचा अभिमान माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त शहरातील पीर करमअली शहा बाबांच्या दर्ग्यात राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे गुरुवारी (दि. 18) 70 फूट फुलांची चादर अर्पण करण्यात येणार आहे. 2 जून रोजी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस …
Read More »वेगवेगळ्या अपघातांत दोन तरुणांचा मृत्यू
पनवेल ः वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील दोन दिवसांत खारघर आणि तुर्भे येथे झालेल्या दुचाकीच्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एक तरुण गंभीर जखमीही झाला. खारघर येथील अपघातातील ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सायन-पनवेल मार्गावर खारघर येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या अपघातात ऋषिकेश हिवराळे …
Read More »सराईत चोरटे गजाआड; घरफोडीतील ऐवज हस्तगत
पनवेल ः वार्ताहर पनवेल शहरात घरफोडीसह एका टेम्पोच्या बॅटरीसह टायर चोरणार्या दुकलीस पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने चोरट्यांना गजाआड केले असून, त्यांच्याकडून घरफोडीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. सुरेखा भेंडे (रा. लाइन आळी, पनवेल) यांच्या राहत्या घराचा कडीकोयंडा उचकटून …
Read More »चिमुरडीच्या अपहरणकर्त्यांना बेड्या; दोन महिलांचा समावेश
उरण ः प्रतिनिधी उरण तालुक्यातील नवघर गावातील एका घरातून पळवून नेलेल्या दोन महिन्यांच्या चिमुरडीला उरण पोलिसांनी मोठ्या शिताफीने शोधून काढण्यात यश मिळविले आहे. या प्रकरणी दोन संशयित महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उरण तालुक्यातील नवघरपाडा येथे वास्तव्यास असलेल्या मनोज राजभर यांचा फुलेहारांचा व्यवसाय आहे. सकाळच्या सुमारास व्यवसायात मग्न असलेल्या राजभर …
Read More »नवी मुंबईत कोरोनाची वर्षपूर्ती
600 ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; रुग्णवाढ रोखण्याचे पालिकेसमोर आव्हान नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबईत 15 मार्च 2019 रोजी कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. त्याला सोमवारी वर्ष झाले असून वर्षभरात नवी मुंबईत 1139 जणांचा मृत्यू झाला असून, त्यात 603 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये एकच मृत्यू होता. या वर्षी …
Read More »साहेब, आम्हाला इथेच जागा द्या!
साहेब आम्हाला कुष्ठरोग झाला म्हणून गावातून हाकलले, तेव्हापासून आम्ही इथेच राहतोय. पण आता रेल्वेचे नवीन काम सुरू झालंय, म्हणून आम्हाला इथून जायच्या नोटिसा दिल्यात, आता जायचे कोठे ? आम्हाला इथेच जागा द्या, 80 वर्षाच्या छबीबाई आंबेकर सांगत होत्या. पनवेलच्या कुष्ठरोग वसाहतीतील 24 कुटुंबांच्या या मागणीकडे शासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा …
Read More »अपयशांची मालिका
केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र सरकारला खरमरीत पत्र लिहून स्पष्ट इशारा दिला आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेला महाराष्ट्रात प्रारंभ झाला असून महाराष्ट्राची आरोग्ययंत्रणा त्यासाठी वेळीच सज्ज झाली नाही तर पुन्हा नव्या महासंकटाला तोंड द्यावे लागेल असे त्यांच्या पत्रावरून दिसते. म्हणजेच कोरोनाशी यशस्वी मुकाबला केल्याबद्दल महाविकास आघाडीचे सरकार स्वत:ची …
Read More »अस्थिरतेच्या दिशेने
गेल्या दीड वर्षापासून कसेबसे सत्ता टिकवून असलेले महाविकास आघाडीचे सरकार मुळासकट हादरले आहे याची चिन्हे दिसू लागली आहेत. विख्यात उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर पार्क केलेल्या स्कॉर्पिओ मोटारीतील स्फोटकांचे प्रकरण, पाठोपाठ घडलेला मनसुख हिरन या स्कॉर्पिओ मालकाचा गूढ मृत्यू आणि या दोन्ही प्रकरणांतील सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांचा कथित …
Read More »खांदा कॉलनीतील रक्तदान शिबिराला प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त भारत विकास परिषदेच्या वतीने खांदा कॉलनीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. खांदा कॉलनीतील रोटरी क्लब, नवीन पनवेलच्या रक्तपेढीमधे हे शिबिर झाले. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन रक्तदान केले. सध्या कोविडच्या संकटामुळे सर्वत्र रक्ताची मोठ्या प्रमाणावर आवश्यक्तता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper