भारतीय अर्थव्यवस्था संघटीत करण्याच्या महामार्गाची पायाभरणी जागतिकीकरणाच्या मार्गाने ज्यांनी केली आहे, त्या माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहनसिंग यांना आता असंघटीत क्षेत्राविषयी काळजी करण्याचा अधिकार पोचत नाही. तो तेव्हाच पोचला असता, जेव्हा त्यांनी आपल्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत असंघटीत क्षेत्राच्या भल्यासाठी मुलभूत आणि आमुलाग्र असे काही बदल केले असते. देशाला जागतिकीकरणाची दिशा …
Read More »जागतिक सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन
तळोजा ः प्रतिनिधी येथील दीपक नायट्राइट लि. कंपनीत सर्व कामगारांच्या उपस्थितीत 4 ते 10 मार्चदरम्यान साजरा होत असलेल्या जागतिक सुरक्षा सप्ताहाचे थाटामाटात उद्घाटन झाले. या वेळी एमआयडीसी फायर ऑफीसर दीपक डारुगडे यांच्या हस्ते सुरक्षा साहित्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. सुरक्षा साहित्यांचे प्रदर्शन पुढील काही दिवस सुरू राहणार आहे. कार्यक्रमात साइट …
Read More »चौक महसूल विभागात कोरोना रुग्णांची हजारी
आरोग्य यंत्रणा सज्ज मोहोपाडा ः प्रतिनिधी ग्रामीण, शहरी, आदिवासी, दुर्गम, औद्योगिक क्षेत्र असणार्या चौक महसूल विभागात 1000 कोरोना रुग्णांचा टप्पा पार झाला असून, त्या पार्श्वभूमीवर महसूल विभाग, ग्रामविकास, आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. कोरोनाने जगभरात हाहाकार माजविला आहे. दरम्यान, नागरिक, डॉक्टर्स, पोलीस, महसूल यंत्रणा, आरोग्य विभाग, सफाई कामगार, सामाजिक संस्था, …
Read More »ओएलएक्सवरील खरेदीच्या बहाण्याने फसवणूक; 98 हजारांना गंडा
पनवेल ः वार्ताहर ओएलएक्सवर विक्रीसाठी ठेवलेले फर्निचर खरेदी करण्याच्या बहाण्याने एका इसमाने संबंधित मालकाचा क्युआर कोड मिळवून त्यातून त्याच्या खात्यातील 98 हजार 456 रुपये वळते करून त्याची फसवणूक केल्याची घटना खारघरमध्ये घडली आहे. खारघर वसाहतीत राहणारे सुरेश यादव यांनी ओएलएक्सवर विक्रीसाठी फर्निचरची माहिती आणि फोटो पोस्ट केले होते. हे फर्निचर …
Read More »कर्जतमध्ये 550 मुलींची मोफत हिमोग्लोबीन तपासणी
भारत विकास परिषदेचे सेवाकार्य पनवेल ः प्रतिनिधी भारत विकास परिषदेची पनवेल शाखा आणि एमपॉव्हर इंडिया या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत तालुक्यातील कशेळे गावात मुलींसाठी मोफत हिमग्लोबीन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या शिबिरात आदिवासी पाडे तसेच दुर्गम पाड्यांमधील गोरगरीब मुलींची मोफत हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. 11 …
Read More »नगर परिषद आपल्या दारी अभियान
उरण नगर परिषदेचा स्तुत्य उपक्रम उरण ः वार्ताहर उरण नगर परिषदेच्या वतीने नगर परिषद आपल्या दारी अभियान सुरू करण्यात आले आहे. मोरा येथे नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात झाली. उरण नगर परिषदेने केलेल्या व करीत असलेल्या कामांची माहिती उरणच्या नागरिकांपर्यंत पोहचविणे व उरणच्या नागरिकांच्या सूचना, नागरी समस्या …
Read More »उरण पालिकेच्या शिलकी अंदाजपत्रकाला मंजुरी
उरण ः प्रतिनिधी उरण नगर परिषदेच्या सन 2021-22 वर्षासाठी सहा कोटी 64 लाख 99 हजार 876 रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकाला नुकतीच सभागृहात मंजुरी देण्यात आली आहे. उरण नगर परिषदेचे सन 2020-21चे सुधारित, तर 2021-22 वर्षासाठी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सभागृहात मांडण्यात आले. 2021-22 वर्षात प्रारंभीची शिल्लक, विविध कर, अनुदाने, अंशदाने आदी मिळून 49 …
Read More »मुंबई-पुणे महामार्गावर टँकरला आग
खोपोली : प्रतिनिधी द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ मुंबईहून पुण्याकडे केमिकल वाहून नेणार्या टँकरला शुक्रवारी (दि. 5) आग लागली. वायरिंगमध्ये बिघाड झाल्यामुळे धावत्या टँकरला अचानक आग लागल्याचे वाहनचालकाच्या लक्षात येताच त्याने टँकर महामार्गाच्या बाजूस थांबवला. डेल्टा फोर्स कर्मचारी राऊंडला जात असताना टँकरला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी प्रसंगावधान दाखवत आपल्याकडे …
Read More »खोपोली सायमाळ गावाजवळ अपघात
एक गंभीर, तर पाच जण किरकोळ जखमी खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावरील सायमाळ गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने शुक्रवारी (दि. 5) दुपारी दूधाच्या टँकरने क्रेटा कार आणि दुचाकीस्वारला धडक दिली. या अपघातात एक प्रवासी गंभीर तर पाच जण किरकोळ जखमी झाले. दुधाचा टँकर मुंबई-पुणे महामार्गावरून जात असताना शुक्रवारी दुपारी 12.15 वाजण्याच्या …
Read More »माणगावात एकाच रात्रीत सहा घरे फोडली
सहा लाखांचा ऐवज घेऊन चोरटे पसार माणगाव : प्रतिनिधी शहरातील बामणोली मार्गावर एकाच रात्रीत सहा बंद घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे पाच लाख 72 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. माणगावमधील बामणोली मार्गावरील सहा बंद घरे अज्ञात चोरट्यांनी 3 मार्च 2021 रोजी रात्री 11 ते 4 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper