कर्जत : प्रतिनिधी : कर्जत नगर परिषद हद्दीतील विठ्ठलनगर परिसरातील सडलेला विजेचा खांब अखेर मंगळवारी (दि. 26) कोसळला. त्यामुळे पुन्हा एकदा वीजवितरण कंपनीचा गलथान कारभार समोर आला आहे. वीजवितरण कंपनीचे कर्जत शहरातील अनेक खांब मुळाशी सडले आहेत. हे खांब फक्त वरील वीजवाहिन्यांच्या आधारावर उभे आहेत. काही खांब रस्त्याच्या बाजूला आहेत, …
Read More »Monthly Archives: March 2019
म्हसळा शिवकृपा ग्रामीण पतसंस्थेच्या चेअरमनपदी कृष्णा कोबनाक यांची निवड
म्हसळा : प्रतिनिधी : तालुक्यातील शिवकृपा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या चेअरमनपदी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यकाळ पूर्ण झाल्याने शैलेश कुमार पटेल यांनी त्यांच्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर संचालक मंडळातील कृष्णा कोबनाक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी बी. …
Read More »शिवजयंतीनिमित्त गरिबांना कपडेवाटप
नवी मुंबई ः बातमीदार नेरुळ येथील क्रिएटिव्ह या तरुणांच्या संस्थेने गरिबांना कपडेवाटप करून शिवजयंती साजरी केली. संपूर्ण महाराष्ट्रात दणक्यात शिवजयंती साजरी केली जात असताना या संस्थेचे अध्यक्ष संदीप निकम यांनी कपडे वाटपाची कल्पना मांडली. सध्या भयंकर उकाडा असून उन्हामुळे अंगाची लाही लाही होते. नेरुळ जिमखान्यासमोर असलेल्या धड झोपडीचे छप्परही नसताना …
Read More »विवाहितेची आत्महत्या
जेएनपीटी ः वार्ताहर उरण चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील श्रीयोगनगर सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहणार्या स्नेहल म्हात्रे (28) या विवाहित महिलेने छताच्या पंख्याला स्वत:ची ओढणी अडकवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. 26) घडली. या घटनेसंदर्भात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उरण तालुक्यातील बोकडवीरा गावात राहणार्या स्नेहलचे लग्न …
Read More »मृत्यूनंतरही सात जणांना दिले जीवदान
नवी मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्रातील बीड येथील 17 वर्षीय तरुणाच्या पालकांनी अतिशय धाडसी निर्णय घेत आपल्या मृत मुलाचे यकृत, मूत्रपिंड, फुप्फुसे, त्वचा आणि डोळे हे अवयव दान केले आहेत. त्यांच्या या उदात्त कृतीमुळे सात जणांना अवयवदानाचा फायदा होऊन त्यांची आयुष्ये वाचली. 2019 सालातील हे मुंबईतील 28वे, तर नवी मुंबईतील पाचवे …
Read More »रिपाइं तालुका अध्यक्षपदी संजय गायकवाड
उरण ः प्रतिनिधी उरण येथील पूर्वीचे पँथरचे कार्यकर्ते संजय गायकवाड यांचे सामाजिक काम तसेच कामगार व सर्व थरातील श्रमिकवर्गात कामाचे संघटन कौशल्य पाहून केंद्रीय समाज कल्याण मंत्री, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा तथा कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या हस्ते संजय गायकवाड यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ …
Read More »लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेकडून आढावा
पनवेल ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात ठाणे परिक्षेत्रासह नवी मुंबई व ठाणे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत ठाणे, नवी मुंबईसह कोकण परिक्षेत्रात पोलिसांकडून कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या त्याचा आढावा घेण्यात आला, तसेच निवडणुकीदरम्यान …
Read More »शिवराज प्रतिष्ठानतर्फे भक्ती-शक्ती महोत्सव
नागोठणे : प्रतिनिधी विभागातील आमडोशी येथील शिवराज प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच भक्ती-शक्ती महोत्सव घेण्यात आला. त्यात संत तुकाराम महाराज पुरस्कार ह.भ.प. मधुकरमहाराज जवके आणि राजमाता जिजाऊ पुरस्कार पुष्पाताई शेलार यांना, तर शिवछत्रपती राज्य क्रीडा एकलव्य पुरस्कार प्राप्त संदीप प्रल्हाद गुरव यांना शक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच सोनल रवींद्र पाटील (कोलाड) …
Read More »तोंडसुरे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना ठप्प
8 गावे 4 वाड्या टंचाईग्रस्त; टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी म्हसळा : प्रतिनिधी दुरूस्तीचे काम करण्यासाठी पाभरे (ता. म्हसळा) धरणातील बहुतांश पाण्याचा विसर्ग केल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या नळ पाणीपुरवठा योजना आता पाण्याअभावी ठप्प झाल्या आहेत. त्याचा मोठा फटका तोंडसुरे नळ पाणीपुरवठा योजनेला बसला आहे. या योजनेवर अवलंबून असलेली आठ गावे …
Read More »सरपंच दत्तात्रय सांबरी यांनी स्वीकारला पदभार, बिपीन बडेकर उपसरपंचपदी
कर्जत : बातमीदार सार्वत्रिक निवडणुकीत कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी निवडून आलेले दत्तात्रय सांबरी यांनी सोमवारी (दि. 25) पदभार स्वीकारला. पंचायत समिती सदस्य प्रदीप ठाकरे आणि युवासेनेचे संदीप बडेकर यांनी दत्तात्रय सांबरी यांना सरपंच पदाच्या खुर्चीत बसविले. येत्या काही दिवसांत किरवली ग्रामस्थांना नळपाणी योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्याचा मनोदय या वेळी …
Read More »