पनवेल : विधानसभा कार्यालय प्रमुख नितीन परब यांना वाढदिवसानिमित्त खासदार श्रीरंग बारणे यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी रायगड जिल्हा समन्वयक अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, उपमहानगरप्रमुख दीपक घरत, राकेश गोवारी, खारघर शहरप्रमुख शंकरशेठ ठाकूर आदी उपस्थित होते.
Read More »Monthly Archives: March 2019
अभिनंदन
पनवेल : कुंडेवहाळ ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच सदाशिव वास्कर यांचे जेएनपीटीचे विश्वस्त तथा भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी अभिनंदन केले.
Read More »नांदा सौख्य भरे
पेण : येथील नरेंद्र हरीभाऊ पाटील यांची सुकन्या चि.सौ.कां. प्रणाली आणि शंकर नथुराम तांबोळी (रा. शिवणसई, पनवेल) यांचा सुपूत्र चि. समाधान यांचा शुभविवाह शनिवारी पेण येथे उत्साहात पार पडला. वधुवरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, शकुंतला ठाकूर, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर यांच्यासह मान्यवर …
Read More »कर्नाळातील ‘त्या’ वाड्यांचा पाणीपुरवठा पूर्ववत
पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केले नाही म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दोन आदिवासी वाड्यांतील पाणीपुरवठा बंद केला होता. मात्र याबाबत प्रसारमाध्यमे आणि ग्रामस्थांनी जोरदार आवाज उठविल्याने या वाड्यांचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. कर्नाळा ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच झाली असून या निवडणुकीत शेकापक्षाला भाजप-शिवसेनाप युतीच्या उमेदवारांनी जोरदार …
Read More »घराघरातून लाकडी देवघर होतंय नामशेष
उरण : दिनेश पवार पूर्वी प्रत्येक घरामध्ये लाकडी देवघर असायची ति पण चांगले सागवान किंवा शिसव या लाकडापासून सुंदर नक्षीकाम केलेले देवघर पाहवयास मिळायचे, आता जंगले कमी झाली आणि पर्यावरणाचा र्हास टाळण्यासाठी जंगल तोडीस बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीचे लाकूड उपलब्ध होत नसल्याने लाकडाची देवघर दुर्मिळ होऊ लागली …
Read More »गव्हाण विद्यालयात रयत माऊलीला अभिवादन
गव्हाण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनि. कॉलेज गव्हाण येथे आज शनिवारी (दि.30) संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची सहचारिणी रयतेच्या विद्यार्थ्यांची रयत माउली लक्ष्मीबाई पाटील यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सांस्कृतिक मंडळाने हा कार्यक्रम साजरा करण्याची संधी’ सातवी …
Read More »खासदार बारणेंना आघाडी मिळवून देणार
आमदार मनोहर भोईर यांचा निर्धार; नवीन शेवा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा उरण : रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीत मावळमधील शिवसेना-भाजपचे आर.पी.आय.चे उमेदवार खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांना उरण विधानसभा मतदार संघातून मोठी आघाडी मिळवून देणार असे प्रतिपादन शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख व आमदार मनोहरशेठ भोईर यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरण …
Read More »पर्यटन एक निखळ आनंद…
धकाधकीच्या जीवनात दोन-चार दिवस कुटुंबीयांसमवेत पर्यटनाचा आनंद लुटायचा असेल तर कोकणासारखे उत्तम ठिकाण नाही. निळाशार समुद्र, हिरवीगार झाडी आणि माफक दरात मिळणारे ताजे, चमचमीत भोजन आदींमुळे हा छोटासा प्रवास नेहमीच लक्षात राहण्यासारखाच ठरतो. रायगडातही अशी अनेक ठिकाणे आहेत जेथे दोन दिवसांत मनमुरादपणे आनंद लुटणे सहज शक्य होणार आहे. अलिबाग, मुरूड, …
Read More »प्रचाराचा सोशल फंडा
लोकसभा महासंग्रामाच्या निमित्ताने राजकीय रण तापू लागले असताना उष्णतेचा पाराही चढू लागला आहे. तापमान चाळीशीच्या वर जाऊ लागल्याने प्रचार करताना सर्वच राजकीय पक्षांची कसरत होताना दिसते. अशा वेळी घरबसल्या एका क्लिकवर किंवा अगदी बोटाद्वारे कार्यकर्ते आपल्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत. हे शक्य झाले आहे समाजमाध्यमे अर्थात सोशल नेटवर्किंग साईट्समुळे. काळ …
Read More »खारघरमधून 15 वर्षीय मुलीचे अपहरण
वडिलांची पोलीस ठाण्यात धाव पनवेल ः बातमीदार : खारघर सेक्टर 36मधील स्वप्नपूर्ती सोसायटीच्या बाजूला असलेल्या बांधकाम साईटजवळ राहणार्या निताय प्रफुल्ल सरदार या बांधकाम कामगाराची 15 वर्षीय मुलगी 17 मार्चपासून बेपत्ता झाली आहे. दरम्यान, निताय प्रफुल्ल सरदार याने खारघर पोलीस ठाण्यात धाव घेतली असून माझ्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविली आहे. …
Read More »