Breaking News

Monthly Archives: May 2019

हॉकीच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात भारताची विजयी सुरुवात

पर्थ : वृत्तसंस्था भारतीय पुरुष हॉकी संघाने बुधवारी पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या थंडरस्टिक्स संघावर 2-0 ने विजय नोंदवून ऑस्ट्रेलिया दौर्‍याची सकारात्मक सुरुवात केली. वीरेंद्र लाक्रा याने 23 व्या, तसेच हरमनप्रीतने 50 व्या मिनिटाला गोल केला. भारताला 15 तसेच 17 मे रोजी ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाविरुद्ध सामने खेळायचे आहेत. उभय संघांनी पहिल्या क्वॉर्टरमध्ये वेगवान …

Read More »

श्री धापया महाराज कुस्ती स्पर्धा ; कोकरे अजिंक्य, तर चव्हाण आखाडा किंग

कर्जत : प्रतिनिधी कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री धापया महाराज यांचा उत्सव अक्षय्य तृतीयेपासून सुरू झाला.  त्यानिमित्ताने शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या कुस्तीच्या आखाड्यात आयोजित केलेल्या कुस्त्यांमध्ये  गेल्या वर्षी अजिंक्य ठरलेला रसायनीचा विशाल कोकरे आणि दिल्लीचा मनजीत यांच्यात कुस्ती रंगली, परंतु कुस्ती ऐन रंगात आली असता मनजितने अचानक आखाडा सोडल्याने विशालला …

Read More »

अटीतटीच्या सामन्यात दिल्ली विजयी ; आज चेन्नईशी भिडणार

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा विजय झाला आहे. दिल्लीने हैदराबादचा 2 गडी राखून पराभव केला. पंतच्या स्फोटक खेळीच्या जोरावर दिल्लीने एलिमिनेटर सामना जिंकला आहे. दिल्लीकडून ऋषभ पंतने ताबडतोड खेळी केली. त्याने 21 चेंडूत 49 रन कुटल्या. दिल्लीने विकेट गमावल्यानंतर पंतने एकाकी खिंड लढवत दिल्लीला विजय मिळवून दिला. पंतचे दिल्लीच्या …

Read More »

मृत विद्यार्थ्याचे घवघवीत यश

नोएडा ः वृत्तसंस्था केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. देशभरातील 91.1 टक्के विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षेत यश मिळवले. यामध्ये उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील विनायक श्रीधर याला इंग्रजीत 100पैकी 100, विज्ञानामध्ये 96 आणि संस्कृतमध्ये 97 गुण मिळाले आहेत, मात्र हा निकाल पाहण्यासाठी विनायक या जगात …

Read More »

दिग्विजय सिंहांसाठी साधूंची फौज

मैदानात उतरविणारे कम्प्युटरबाबा गायब? भोपाळ ः वृत्तसंस्था मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या समर्थनात शेकडो साधूंची फौज घेऊन मैदानात उतरलेले कम्प्युटरबाबा भोपाळमधून अचानक गायब झाले आहेत. कम्प्युटरबाबांचे हजारो साधूंसोबत सुरू असलेले समागम स्थळ रिकामे झाल्याचे चित्र आहे. भोपाळमध्ये दिग्विजय सिंह यांच्यासमोर  …

Read More »

आयपीएलवरील सट्ट्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त

वडिलांची तीन मुलींसह आत्महत्या वाराणसी ः वृत्तसंस्था जुगारी वडिलांमुळे एक हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. सट्ट्यात सर्वकाही हरल्याने एका पित्याने तीन मुलींना विष देऊन स्वत:देखील आत्महत्या केली. आता या कुटुंबातील केवळ मुलींची आई जिवंत आहे. माहेरी गेल्यामुळे त्यांचा जीव वाचला, मात्र पती आणि मुलींच्या मृत्यूमुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला …

Read More »

सहा महिन्यांनंतर उघडले केदारनाथ मंदिराचे द्वार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था चारधाम यात्रेतील केदारनाथ मंदिर गुरुवार (दि. 9)पासून भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. मंदिराचा दरवाजा सहा महिन्यांनी उघडण्यात आला आहे. मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर पुजार्‍यांनी विधिवत पूजा केली. हजारो भक्तांच्या उपस्थितीत केदारनाथाला जलाभिषेक, रुद्राभिषेक संपन्न झाला आहे. 8 तारखेला गंगोत्री आणि यमनोत्रीची दारे खुली झाल्यापासून चारधामच्या यात्रेला सुरुवात …

Read More »

चक्रीवादळग्रस्त राज्यांना रेल्वेची मदत

विनाभाडे पोहोचविणार साधनसामुग्री सोलापूर ः प्रतिनिधी फनी चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या पश्चिम बंगाल, ओरिसा आणि आंध्र प्रदेश राज्यांतील नागरिकांना मदत करण्याचा ओघ वाढतच आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलातील सामाजिक संस्था, संघटना व अन्य लोकांकडून दिली जाणारी मदत विनाभाडे रेल्वे प्रशासन संबंधित लोकांपर्यंत पोहचवणार असल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे …

Read More »

जागतिक क्षितिजावर चमकणार रायगडचे सात तारे ; अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन परिषदेसाठी निवड

पेण ः प्रतिनिधी नासा, जपान, रशिया, इस्त्रो, चायना, युरोपियन देश वगैरेंशी संलग्न असणार्‍या आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन परिषदेसाठी रायगड जिल्ह्यातील सात, तर कल्याणमधील एकाची युवकाची निवड झाली आहे. 1951 साली स्थापन झालेल्या या संस्थेची ही 70वी परिषद असून आजपर्यंत एकाही भारतीय व्यक्तीची अथवा संस्थेची निवड या परिषदेसाठी झाली नव्हती, मात्र ऑक्टोबर …

Read More »

शेकापचा दणदणीत पराभव करून वारदोली ; सरपंचपदी भाजपच्या शिल्पा पवार विराजमान

पनवेल ः प्रतिनिधी वारदोली गु्रप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी बुधवारी (दि. 8) निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपच्या शिल्पा पवार यांनी शेकापच्या नीता पाटील यांचा पराभव करीत वारदोली गु्रप ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकवला आहे. त्यानिमित्त पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचित सरपंच शिल्पा पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील …

Read More »