Breaking News

Monthly Archives: June 2019

कुंडलिका नदीत बुडालेला तिसरा पर्यटक सापडला

रोहे ः प्रतिनिधी कोलाड विभागातील बल्हे येथे मुंबई येथून आलेले तीन पर्यटक कुंडलिका नदीत बुडाल्याची घटना रविवारी घडली होती. त्यातील दोघांचे मृतदेह रविवारीच सापडले होते. सोमवारी सकाळी तिसरा पर्यटक महेश जेजुरकर याचा मृतदेह पोलीस व रेस्क्यू टीमच्या हाती लागला. मुंबईतील ट्रॉम्बे येथील 28 जण शनिवारी कोलाड (ता. रोहे) विभागातील बल्हे …

Read More »

पावसाळी अधिवेशनाला सुरुवात

मुंबईः प्रतिनिधी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज (दि. 17) सुरुवात झाली. विधानसभेच्या कामकाजास वंदे मातरमने सुरुवात करण्यात आली. या वेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींसह मंत्री, राज्यमंत्री आणि विधानसभेचे सदस्य उपस्थित होते. विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी विधानसभा सदस्य सर्वश्री सुरेश धानोरकर, प्रतापराव चिखलीकर, हर्षवर्धन …

Read More »

अडथळा निर्माण करणार्या बांधकाम व्यावसायिकांना उपमहापौरांची तंबी

पनवेल ः वार्ताहर नव्याने इमारत उभारत असताना इमारत उभारण्यासाठी लागणारे साहित्य रस्त्यातून वाहणार्‍या गटारावरच टाकणार्‍या बांधकाम व्यावसायिकांना आज (दि. 17) पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तंबी दिली आहे. तातडीने सदर साहित्य हटविण्यास तसेच तुटलेली गटारे व स्लॅब बांधून देण्यासही संबंधितांना सांगण्यात आले आहे. शहरातील चिंतामणी मंगल …

Read More »

श्रीवर्धनमधील रस्त्यांसाठी 20 कोटींचा निधी

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे विशेष प्रयत्न; कृष्णा कोबनाक यांची माहिती म्हसळा ः प्रतिनिधी  रायगडातील ग्रामीण भागातील वाड्या वस्त्या तालुका शहराला जोडणे व सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या परंतु दुरवस्था झालेल्या गाववाडी रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची शिफारस व विशेष प्रयत्नाने श्रीवर्धन …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कामोठ्यातील शाळेत केले विद्यार्थ्यांचे स्वागत ; गजबजलेल्या शाळेत महापौर आणि आयुक्त

पनवेल ः प्रतिनिधी सोमवार 17 जूनची सकाळ जराशी वेगळी होती…. त्याला कारणेही दोन होती…. एक तर प्रत्येकाला हव्याहव्याशा वाटणार्‍या पावसाने हजेरी लावली होती आणि दुसरीकडे जागोजागी रस्त्यावर किलबिलाट दिसत होता, पण हा किलबिलाट पक्ष्यांचा नव्हता, तर हा किलबिलाट होता विद्यार्थ्यांचा.. सकाळपासून शाळेचा नवा गणवेश घालून नवे दप्तर सांभाळत ही मुले …

Read More »

अखेर ममतादीदी नमल्या; डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य

कोलकाता : डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत गेल्या आठवडाभरापासून संपावर गेलेल्या पश्चिम बंगालमधील डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व मागण्या मान्य केल्यानंतर डॉक्टरांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या प्रतिनिधींसोबत ममता बॅनर्जी यांची प्रदीर्घ बैठक झाली. या बैठकीत ममता यांनी सकारात्मक भूमिका घेतली. बैठकीतूनच ममता …

Read More »

विमानतळ प्रकल्प गावांतील शाळा स्थलांतरित!

पनवेल : बातमीदार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थलांतरित होणार्‍या दहापैकी दोन गावांनी अजूनही आपली राहती घरे सोडली नाहीत, मात्र या दोन्ही गावांतील शाळांचा प्रश्न मिटला असल्याने सोमवार (दि. 17) पासून जिल्हा परिषदेच्या गावातील शाळा आता उलवे नोडमध्ये सिडकोने उभारलेल्या नवीन इमारतींमध्ये सुरू होत आहेत. यानंतर गावे रिकामी करण्याचा ओघही वाढण्याची …

Read More »

भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची विविध गावांना भेट

पनवेल : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी सोमवारी जांभिवली, चावणे आणि कराडे खुर्द या ठिकाणी भेट देत उमेदवारांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, किरण माळी, रवींद्र चिपळे, विजय मुरकुटे, प्रभाकर माळी, राजेश सोनावळे, बंडू मोडक, …

Read More »

पनवेल भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे अभिनंदन

पनवेल : रायगड जिल्हा नियोजन मंडळावर विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल पनवेल भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी विश्वजित पाटील, विश्वनाथ कोळी, आकाश पाटील आदी उपस्थित होते.

Read More »

सामन्यात सरफराजच्या जांभया

मॅनचेस्टर : वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तान सामना म्हटलं की प्रेक्षकांच्या अंगात वेगळाच उत्साह संचारतो. त्यात विश्वचषकातील सामना असेल, तर चाहत्यांना युद्धज्वर चढतो. भारत आणि पाकिस्तानातील चाहते नखं कुरतडत हा सामना पाहत असताना, एक माणूस काहीसा निर्धास्त दिसला. तो म्हणजे खुद्द पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद. सामना सुरू असतानाच चक्क सरफराज भर …

Read More »