श्रीवर्धन : प्रतिनिधी जीवना येथील साईस्टार ग्रुपच्या वतीने आयोजिींत नगराध्यक्ष चषक पावसाळी क्रिकेट स्पर्धेत इरफानिया अडखळ आंजर्ले या संघाने विजेतेपद पटकाविले. दर्यावर्दी श्रीवर्धन संघ उपविजेता ठरला. मालिकावीर तुषार (दर्यावर्दी) उत्कृष्ट फलंदाज इमरान, उत्कृष्ट गोलंदाज फजल, सामनावीर इमरान आणि शिस्तबद्ध संघ म्हणून रॉकस्टार जीवना यांची निवड करण्यात आली. विजेते संघ आणि …
Read More »Monthly Archives: June 2019
हा कसला बॉस, याची हुकूमत मर्यादित! ; रमीझ राजा यांची ख्रिस गेलवर जोरदार टीका
लंडन : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेच्या 34व्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर 125 धावांनी विजय मिळवला. या स्पर्धेत विंडीज संघाचा हा पाचवा पराभव आहे. त्यामुळे त्यांच्यावर चहुबाजूने टीकेचा अक्षरक्ष: वर्षाव होत आहे. दरम्यान, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू व क्रिकेट समीक्षक रमीझ राजा यांनी धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलवर जोरदार टीका केली आहे. चेंडू स्टेडिअमबाहेर …
Read More »धोनी एक महान खेळाडू ; विराट कोहलीकडून पुन्हा पाठराखण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था वर्ल्ड कपमध्ये आपल्या संथ खेळीमुळे टीकेचा धनी झालेल्या भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची विराट कोहलीकडून पाठराखण करण्यात आली आहे. धोनी एक महान खेळाडू असून, त्याला खेळाची उत्तम जाण आहे. त्याच्या अनुभवाचा फायदा भारतीय संघाला होत असल्याचे विराटने सांगितले. वेस्ट इंडिजवर दिमाखदार विजय मिळविल्यानंतर विराट प्रसारमाध्यमांशी …
Read More »भारताला जो हरवेल तोच वर्ल्ड कप जिंकेल! ; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे विधान
लंडन : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या धडाकेबाज कामगिरीनंतर अनेक माजी दिग्गजांनी भारतच विजयाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत व्यक्त केले आहे. पाकिस्तान, श्रीलंकेकडून झालेला धक्कादायक पराभव आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाने मात दिल्यापासून इंग्लंडच्या माजी खेळाडूंचे सूरदेखील सोशल मीडियावर बदललेले पहायला मिळत आहेत. आतापर्यंत इंग्लंडच विजयाचा प्रबळ दावेदार आहे आणि घरच्या मैदानावर विश्वचषक …
Read More »भारत उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर ; विंडीजवरील विजयाने गुणतालिकेत दुसर्या स्थानी
मँचेस्टर : वृत्तसंस्था दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 50 षटकांत 7 बाद 268 धावा केल्या होत्या, मात्र हे आव्हान विंडीजला पेलवले नाही आणि त्यांचा डाव अवघ्या 143 धावांत संपुष्टात आला. या विजयासह भारत 11 गुणांसह …
Read More »अभिनंदन अन् शुभेच्छा! पनवेल : दिघाटी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत बिनविरोध विजयी झालेले भाजपचे सदस्य मनोहर मारुती पाटील, हर्षदा सुजित पाटील, अक्षता मयूर म्हात्रे व वैशाली कैलास पाटील यांचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, दिघाटीचे सरपंच अमित …
Read More »घोडीवलीतील महिला दारूबंदीसाठी आक्रमक ; कारवाईसाठी पोलिसांना निवेदन
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या घोडीवली कांढरोली गावात असणार्या दिवासीवाडीत छुप्या मार्गाने गावठी दारू विक्री सुरू असल्याने अनेक जण व्यसनाधीन झाले आहेत. यातून पुढील पिढी वाममार्गाला लागू नये यासाठी येथील महिलांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी दारूबंदीबाबत खालापूर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे घोडीवली आदिवासी …
Read More »जलधारा बरसल्या! रायगडात मान्सूनचे आगमन
अलिबाग : प्रतिनिधी गेले अनेक दिवस रायगडकर ज्याची चातकाप्रमाणे वाट पाहत होते तो पाऊस गुरुवारी (दि. 27) अखेर बरसला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेले रायगडकर सुखावले. त्याचप्रमाणे दुबार पेरणीचे संकट टळून बळीराजाला दिलासा मिळाला आहे. पाऊस पडत नसल्यामुळे उकाड्याने रायगड जिल्ह्यातील लोक हैराण झाले होते, तर मान्सूनपूर्व पावसामुळे उगवून वर आलेली …
Read More »काशीदच्या समुद्रात बुडून पर्यटकाचा मृत्यू
मुरूड : प्रतिनिधी काशीद येथील समुद्रात बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी (दि. 27) असाच प्रकार घडला. पनवेल तालुक्यातील उलवे येथे राहणारे मोहंमद सादिक गनी (25) यांचा येथील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. उलवे येथील आठ लोक काशीदला आले होते. दुपारी सर्व जण एका झाडाखाली भोजनास बसले. …
Read More »खासदार श्रीरंग बारणे यांचा उद्या पनवेलमध्ये जाहीर सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुका भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांचा जाहीर सत्कार शनिवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या …
Read More »