Breaking News

Monthly Archives: October 2019

कर्जत तालुक्यातील भातशेती पाण्यात

कर्जत : बातमीदार परतीच्या पावसामुळे कर्जत तालुक्यातील भाताची पिके भिजून शेतामध्येच आडवी झाली आहेत. त्यामुळे बळीराजा हताश झाला आहे. दसर्‍यानंतर शेतकरी भाताच्या उभ्या पिकाची कापणी करून ते सुरक्षित ठिकाणी साठवण करून ठेवत असतो, मात्र यंदा तालुक्यातील अर्ध्या भागात भाताचे पीक शेतात कापून ठेवल्यानंतर परतीच्या पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. गेल्या …

Read More »

महाडमध्ये वीज पडून 17 जण जखमी

महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यातील मुमुर्शी आदिवासीवाडीतील झोपड्यांवर वीज पडून 17 आदिवासी लोक जखमी झाले आहेत. यात एका वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. ही घटना मंगळवारी (दि. 22) रात्री आठच्या सुमारास घडली. जखमी आदिवासींवर विन्हेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. याबाबत येथील तलाठी पाटील यांनी संबंधित घटनास्थळाचा पंचनामा केला …

Read More »

रायगडात मतदानाचा टक्का घसरला

मतदारराजा कोणाला देणार धक्का? आज फैसला पाली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांत सोमवारी मतदान घेण्यात आले. प्रशासनाकडून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. तरीही सात विधानसभा मतदारसंघांत सरासरी 65.86 टक्के मतदान झाले. मतदानाचा टक्का घसरल्याने मतदारराजा कुणाला धक्का देणार हे पाहणे औत्सुक्याचे झाले आहे.  जिल्हा प्रशासनाकडून मतदानाचा …

Read More »

म्हसळा तालुक्यात पाच नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे

म्हसळा : प्रतिनिधी समग्र शिक्षांतर्गत म्हसळा तालुक्यात कांदळवाडा, तुरूंबाडी   खरसई, पाभरे आणि मेंदडी अशा शाळांमध्ये नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे उभारण्यात आली आहेत. शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी यासाठी समग्र शिक्षा प्राथमिक विभागामार्फत राज्यातील 35 जिल्ह्यांमधील निवडक शाळांत नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे उभारण्यात येत आहेत. म्हसळा तालुक्यात समग्र शिक्षांतर्गत 2019-20 या शैक्षणिक वर्षात …

Read More »

मुमुर्शी आदिवासीवाडीत वीज पडून 17 जण जखमी

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील मुमुर्शी आदिवासीवाडी येथील आदिवासींच्या झोपड्यांवर वीज पडल्याने 17 आदिवासी जखमी झाले आहेत. यामध्ये एक वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. मंगळवारी (दि. 22) सायंकाळी आठ वाजता ही घटना घडली. जखमी सर्व आदिवासींवर तालुक्यातील विन्हेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत. महाड तालुक्यामध्ये गेले काही दिवस दररोज सायंकाळी …

Read More »

मतमोजणीची तयारी पूर्ण

पेणमध्ये प्रशासन सज्ज; पोलीस यंत्रणाही दक्ष पेण : प्रतिनिधी पेण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 24) सकाळी 8 वाजल्यापासूून कोएसोच्या पेणमधील लिटील एंजेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करण्यात येणार असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणीसाठी 14 टेबल लावण्यात आले असून 150 प्रशिक्षित …

Read More »

महेंद्रसिंह धोनी चॅम्पियन : गांगुली

मुंबई : प्रतिनिधी अष्टपैलू फलंदाज महेंद्रसिंह धोनी चॅम्पियन आहे आणि चॅम्पियन कधी लवकर मैदान सोडत नाहीत, अशा शब्दांत बीसीसीआयचे नवे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेवर प्रतिक्रिया व्यक्त केली. बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गांगुली म्हणाला की, मी धोनीशी चर्चा करणार आहे. माझी अद्याप धोनीशी भेट झालेली …

Read More »

पनवेलचा मयूर नाईक ‘सुपर डुपर हिट 2019’ पुरस्काराचा मानकरी

पनवेल : प्रतिनिधी रसिकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवणार्‍या लोकगीते, कोळीगीतांची पर्वणी देणार्‍या कृणाल म्युझिक या नामांकित संगीत कंपनीचा ‘2019 सुपर डुपर हिट गाण्याचा पुरस्कार’ पनवेलमधील गायक ‘लिंबू कापला’फेम मयूर नाईक यांनी पटकाविला आहे. लोअर परेल येथील अल्ट्रा मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या स्टुडिओमध्ये कृणाल अल्ट्रा म्युझिकचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक जयेश विरा, निर्माता …

Read More »

उरणमध्ये कोण मारणार बाजी?

उरण : प्रतिनिधी/वार्ताहर उरण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी जासई येथे मंगल कार्यालयाच्या बाजूला असलेल्या सिडकोच्या इमारतीमध्ये गुरुवारी (दि. 24) सकाळी 8 वाजता सुरू होणार असून, निकाल दुपारी 3 वाजेपर्यंत जाहीर होतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे उरणचा शिलेदार कोण असणार हे उद्या दुपारी जाहीर होणार असल्याने उमेदवारांसह मतदारांची …

Read More »

पशुचिकित्सा व्यवसायाचे अनुदानित खासगीकरण गरजेचे

दुग्धोत्पादन शेतीपूरक व्यवसाय म्हणून आतापर्यंत गाय, बैल, म्हशी आणि रेडे यांच्या संगोपनाकडे पाहिले जात आहे. मेंढी, शेळी आणि बकरी पालन तसेच कोंबड्या आणि ससेपालन हे व्यवसाय मांसाहारी लोकांच्या जिभेचे चोचले पुरविणारी मांसनिर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. या सजीवांच्या संगोपनामध्ये आरोग्य आणि चिकित्सा करताना आतापर्यंत सरकारी पशुचिकित्सा दवाखानेसदृश यंत्रणा …

Read More »