10 हजारांवर कर्मचार्यांची नियुक्ती; मतमोजणी केंद्रांवर सीसीटीव्हीद्वारे नजर मुंबई ः प्रतिनिधी राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी 10 हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी बुधवारी (दि. 23) दिली. गुरुवारी सकाळी …
Read More »Monthly Archives: October 2019
पनवेल : रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक उत्तम धायगुडे यांनी पीएचडी पदवी संपादन केली आहे. त्याबद्दल ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रा. धायगुडे यांचे बुधवारी अभिनंदन केले. या वेळी प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, प्रा. जे. व्ही. बोरगावे, प्रमोद कोळी, देवेंद्र म्हात्रे, रवींद्र भोईर …
Read More »शिवसेना नेते बबन पाटील यांना मातृशोक
पनवेल : शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांच्या मातोश्री गणूबाई कमळू पाटील (वय 90, रा. पापडीचा पाडा) यांचे बुधवारी (दि. 23) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे. गणूबाई पाटील यांच्या अंत्ययात्रेत आमदार प्रशांत ठाकूर, तसेच सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, …
Read More »पनवेलमध्ये उद्या ’दिवाळी संध्या’, सुप्रसिद्ध गायक व संगीतकार श्रीधर फडके यांचा गीतगायन कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेच्या वतीने सुप्रसिद्ध गायक व संगीतकार श्रीधर फडके यांचा ’दिवाळी संध्या’ अर्थात गीतगायनाचा सुश्राव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी (दि. 25) सायंकाळी 6.30 वाजता शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके …
Read More »तळोजा वसाहतीत होणार सिडको उद्यान विकसित
नवी मुंबई : प्रतिनिधी तळोजा वसाहत सेक्टर 9 मध्ये सिडको 60 लाख रुपये खर्च करून उद्यान विकसित करणार असून, वसाहतीमधील हे पहिले उद्यान आहे. एप्रिल अखेरपर्यंत उद्यानाचे काम करून नागरिकांसाठी खुले करण्यात येणार असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. सिडकोने तळोजा वसाहत विकसित करताना फेज 1 आणि 2 असे वर्गीकरण …
Read More »नेरळमध्ये फराळ आणि भेटवस्तूंची बाजारपेठ
कर्जत : बातमीदार दिवाळी सणानिमित्ताने कोतवालवाडी ट्रस्टच्या महिला विकास केंद्राने फराळ आणि भेटवस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. या केंद्रामधील बाजारपेठेचे उद्घाटन महिलांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ट्रस्टचे विश्वस्त राम ब्रम्हांडे, सावळाराम जाधव, शेखर भडसावळे, स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ भडसावळे, महिला विकास केंद्राच्या अध्यक्ष संध्या देवस्थळे आदी उपस्थित होते. या दिवाळी साहित्य …
Read More »अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार करणार्यास 10 वर्षे सक्तमजुरी
अलिबाग : प्रतिनिधी अल्पवयीन मेहुणीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणार्या मेहुण्यास येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सुनील गजानन पवार (23) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, पीडित अल्पवयीन मुलीला तिच्या बहिणीचा नवरा सुनील गजानन …
Read More »खरीप हंगाम स्पर्धेत शेतकर्यांचा मोठा सहभाग
कर्जत : बातमीदार खरीप हंगामात शेतकर्यांना प्रोत्साहित करण्यासाठी भातपीक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून कशेळे मंडळात मोठ्या प्रमाणात शेतकर्यांनी स्पर्धेत भाग घेतला आहे. भातपीक स्पर्धेत सहभागी होणार्या स्पर्धकांच्या शेतात कृषी अधिकारी पोहचले असून शेतीशाळेच्या निमित्ताने तेथे परीक्षण केले जात आहे. कर्जत तालुक्यातील कशेळे मंडळांतर्गत नेवाळी येथे खरीप हंगाम 2019-20 राष्ट्रीय …
Read More »शेतमालाच्या आधारभूत दरात वाढ, केंद्र सरकारकडून शेतकर्यांना दिवाळी भेट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने देशातील शेतकर्यांना दिवाळी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 23) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात शेतकर्यांना बळ देण्यासाठी रब्बी हंगामातील शेतमालाच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही …
Read More »नुकसानभरपाईसाठी बाधित शेतकर्यांचे तहसीलदारांना निवेदन
कडाव : प्रतिनिधी/बातमीदार परतीच्या पावसाने भातपिकांचे मोठे नुकसान केल्याने कर्जत तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्याची दखल घेत शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख शशिकांत मोहिते यांनी कर्जत तहसीलदारांना निवेदन सादर करत शेतकर्यांना एकरी 25 हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. दसर्याच्या अगोदर कर्जत तालुक्यातील सर्व हळवी भातपिके कापण्यास तयार झाली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper