Breaking News

Monthly Archives: October 2019

भारतीय लष्कराकडून पाक सैनिकांसह दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : वृत्तसंस्था भारतात दहशतवादी घुसवण्याच्या उद्देशाने पाकिस्तानने रविवारी (दि. 20) पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. जम्मू-काश्मीरच्या तंगधार सेक्टरमध्येे पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय लष्कराने प्रत्युत्तर देत सीमेलगत पाकच्या हद्दीत असलेले चार दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त केले. या कारवाईत पाकच्या पाच सैनिकांसह 20 ते 22 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे …

Read More »

मतदानासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणाही सज्ज; रायगडात 22 लाख 73 हजार मतदार बजावणार हक्क

अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 21) मतदान होत आहे. रायगड  जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 78 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर दोन हजार 714 मतदान केंद्रांवर जाऊन एकूण 22 लाख 73 हजार 239 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक शांततेत व सुरळीत व्हावी यासाठी जिल्हा …

Read More »

महायुतीला महाप्रतिसाद; शेकापला गळती सुरूच; विरोधक बॅकफूटवर

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीला मतदारांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. मतदानाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली तसतसे भाजपमध्ये प्रवेश करणार्‍यांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. विशेषत: शेतकरी कामगार पक्षाला पावसाप्रमाणे गळती लागली आहे. जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वीदेखील शेकापच्या कार्यकर्त्यांनी विकासाची कास धरणार्‍या आणि …

Read More »

मतदार जागृतीसाठी व्यावसायिक सरसावले; विविध ऑफर्स

मुंबई : प्रत्येक व्यक्तीने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी निवडणूक आयोगातर्फे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. प्रशासनाबरोबरच आता हॉटेल व्यावसायिक, विविध सामाजिक संस्थांनीही मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी शक्कल लढवली आहे. ‘मतदान करा आणि पैठणीवर विशेष सूट मिळवा’ अशी ऑफर  येवला शहरातील कापसे पैठणीतर्फे देण्यात आली आहे. कोल्हापुरातील लक्ष्मी मिसळच्या मालकांनी …

Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 21) मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. लोकशाहीच्या या महाउत्सवाच्या तयारीवर एक दृष्टीक्षेप. -एकूण मतदार महाराष्ट्रात पुरुष, महिला, तृतीयपंथी, दिव्यांग असे एकूण आठ कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार आहेत. …

Read More »

गल्ल्यातील पैसे न दिल्याने कोयत्याने प्रहार करणार्यास अटक

उरण ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील नारायण काशिनाथ पाटील (55) यांच्यावर जीवे ठार मारण्याच्या हेतूने कोयत्याने वार करणार्‍या आरोपीस न्हावाशेवा पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार फिर्यादी नारायण काशिनाथ पाटील यांच्या न्हावा गावातील मालकीच्या साई बेकरीत काल दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास प्रवेश करून त्यांच्याकडे बेकरीच्या गल्ल्यातील पैसे …

Read More »

हातावर धारदार शस्त्राने वार

चार आरोपी न्हावाशेवा पोलिसांच्या ताब्यात उरण ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील गव्हाण गावात फेरी मारून साड्यांची विक्री करीत असणार्‍या मनिरुल हशरथ शेख (47) यास चौघांच्या संगनमताने दमदाटी करून त्याच्या हातावर धारदार चाकूने वार करून पनवेल तालुक्यातील गव्हाण येथील जंगलाच्या ठिकाणी निर्जनस्थळी असलेल्या रूममध्ये घेऊन जाऊन त्यास त्या रूममध्ये डांबून लाकडी दांडक्याने …

Read More »

पनवेलमध्ये युवा पिढी महत्त्वाचा फॅक्टर

पनवेल ः बातमीदार सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच प्रत्येक जण मतदान करण्याचे महत्त्व जाणून घेत आहे व दुसर्‍याला मतदानाचे महत्त्व पटवून देत आहे. त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत विक्रमी मतदान होईल, हे निश्चित. पनवेलमध्ये 18 ते 39 वर्षापर्यंत दोन लाख 73 हजार 424 मतदार आहेत. त्यामुळे …

Read More »

पनवेलमध्ये 12 मतदान केंद्र संवेदनशील

पनवेल ः बातमीदार 188 पनवेल विधानसभा मतदारसंघात 12 संवेदनशील मतदान केंद्र आहेत. यात खारघर येथील 7, तर पनवेल येथील 5 मतदान केंद्रांचा समावेश आहे. खारघर येथील डीएव्ही स्कूल, ग्रीन फिंगर शाळा, सुधागड एज्युकेशन शाळा, सुधागड एज्युकेशन, कोपरा समाज हॉल, रेड क्लिप स्कूल खोली क्र. 1 खारघर, रेड क्लिप शाळेच्या पार्किंगमध्ये …

Read More »

आर्चरी स्पर्धेत गुरुकुल स्कूलच्या नियम विराणीचे सुयश

मोहोपाडा ः वार्ताहर शालेय शिक्षण व क्रीडा संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे विभागस्तरीय आर्चरी स्पर्धा 2019चे आयोजन शनिवारी (दि. 19) प्रबोधन क्रीडा भवन गोरेगाव- मुंबई येथे करण्यात आले होते. यामध्ये चौक येथील श्रीस्वामीनारायण गुरुकुलच्या  नियम विराणी या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन करून आपल्या विशेष प्रावीण्याच्या जोरावर धुळे येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेत …

Read More »