आय रन इंडिया मॅरेथॉन स्पर्धेला प्रतिसाद मोहोपाडा ः वार्ताहर अॅक्सिओम स्पोर्ट्स अॅण्ड इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत राज्यस्तरीय आय रन फॉर इंडिया मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेत राज्यातील मोठ्या संख्येने स्पर्धकांनी भाग घेतला होता. यात रायगड व नवी मुंबईतील स्पर्धकांची संख्या लक्षणीय होती. …
Read More »Monthly Archives: October 2019
एकच वादा… प्रशांतदादा!, बाइक रॅलीला भरपावसातही उत्स्फूर्त प्रतिसाद, युवकांसोबत ज्येष्ठ कार्यकर्ते आणि महिलांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि. 19) शेवटच्या दिवशी खारघरमध्ये भरपावसातही झालेल्या बाइक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रॅलीत युवकांसोबत ज्येष्ठ कार्यकर्ते आणि महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या वेळी ‘एकच वादा… प्रशांतदादा’चा जयघोष निनादला. आमदार …
Read More »मतदार जागृतीसाठी उरणमध्ये वॉकेथॉन
उरण ः प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्देशानुसार उरणमध्ये मतदार जागृती वॉकेथॉनचे आयोजन केले होते. या उपक्रमात फुंडे येथील रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व उरणमधील ज्ञानपीठ कला व वाणिज्य महाविद्यालय सहभागी झाले होते. उरणच्या …
Read More »तटकरे कुटुंबीयांना घरी बसवणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गर्जना श्रीवर्धन : प्रतिनिधी सुनील तटकरे यांनी आजपर्यंत केलेल्या पापाचा घडा या विधानसभा निवडणुकीत फोडून आम्ही येथील जनतेला न्याय देणार आहोत. त्यांना त्यांच्या कुंटुंबासह घरात बसविल्याशिवाय गप्प राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी श्रीवर्धनमध्ये दिला. शिवसेना, भाजप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार …
Read More »प्रचाराच्या तोफा थंडावल्या; आता मोर्चेबांधणीवर भर
मुंबई : प्रतिनिधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदी प्रमुख नेत्यांच्या शक्तिप्रदर्शनाने शनिवारी (दि. 19) विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. भरपावसात रोड शो, रॅली आणि सभांच्या माध्यमातून राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस गाजवला. प्रचार संपल्यानंतर आता उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू होणार आहे. …
Read More »विकास हाच आमचा अजेंडा : देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर एक लाख मताधिक्याने विजयी होण्याचा विश्वास
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार, कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभा सदस्य, सिडको अध्यक्ष आणि भाजपचे जिल्हा अध्यक्ष म्हणून आपल्या पनवेल मतदारसंघात प्रचंड विकासकामे केली आहेत. त्यामुळे विकास हाच आमचा प्रचाराचा अजेंडा असून, याच जोरावर ते एक लाख मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास भाजपचे …
Read More »महाराष्ट्रातून काँग्रेसचा सफाया करा; केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांचे आवाहन
खारघर : प्रतिनिधी दिवाळीपूर्वी घराची साफसफाई करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. तसाच सफाया महाराष्ट्रातून काँग्रेस पक्षाचा करा आणि 21 ऑक्टोबरला सर्वांनी मतदानाचा हक्क बजावत भाजप महायुतीला विजयी करा, असे आवाहन केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी शुक्रवारी (दि. 18) खारघर येथे केले. महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समर्थनार्थ गुजराती समाजाचा …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस पाठिंबा, विविध समाज, संस्था, संघटना, मंडळांचे समर्थन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना उदंड प्रतिसाद लाभत आहे. या कार्यसम्राट लोकप्रतिनिधीला विविध समाज, संस्था, संघटना, मंडळांनी आपला पाठिंबा दिला असून, पाठिंब्याचे पत्र पदाधिकार्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले. पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संघटना …
Read More »निजामपूर जि.प. गट व आंबेवाडी पं.स. गण पोटनिवडणूक मतदार यादी कार्यक्रम
अलिबाग : जिमाका जिल्ह्यात माणगाव तालुक्यातील निजामपूर जिल्हा परिषद गट आणि रोहा तालुक्यातील आंबेवाडी पंचायत समिती गणामधील पोटनिवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक 4 ऑक्टोबर, राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील पोटनिवडणुकीकरिता तयार …
Read More »रावे गावात महायुतीच्या कार्यकर्त्यांचे शक्तिप्रदर्शन
पेण : प्रतिनिधी भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी रावे (ता. पेण) गावात भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, पेण नगर परिषदेतील गटनेते अनिरुद्ध पाटील, नगरसेवक निवृत्ती पाटील, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, आदिनाथ पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व …
Read More »