नागोठणे : प्रतिनिधी काही दिवसांत अयोध्येतील राममंदिर, बाबरी मशिदीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून जाहीर होणार आहे. नागोठण्यासह संपूर्ण विभाग शांतताप्रिय आहे, अशी आमच्या पोलीस दप्तरी नोंद असून कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी सर्वांनी जनजागृती करावी, असे आवाहन रोह्याचे डीवायएसपी किरणकुमार सूर्यवंशी यांनी नागोठण्यात केले. अयोध्येतील लवकरच जाहीर होणार्या निकालासंदर्भात …
Read More »Monthly Archives: November 2019
प्रगती एक्स्प्रेस सोमवारपासून पुन्हा रुळावर
कर्जत : बातमीदार बोरघाटात पावसाळ्यात भूस्खलन व दरडी कोसळून मुंबई-पुणे रेल्वेमार्ग नादुरुस्त झाला आहे. त्याची दुरुस्ती करण्यासाठी गेल्या चार महिन्यात अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत, तर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यापैकी मुंबई-पुणे या मधील दुवा असलेली आणि पनवेलमार्गे धावणारी प्रगती एक्सप्रेस ही गाडी येत्या …
Read More »माणगाव-पुणे महामार्गाच्या कामाला गती
माणगांव : प्रतिनिधी पुणे – दिघी महामार्गाच्या दिघी ते माणगांव या टप्प्याच्या रूंदिकरणाचे काम 70 टक्के पुर्ण झाले असून, माणगांव ते पूणे या टप्प्यातील रस्ता रूंदीकरणाच्या कामाने गती घेतली आहे. त्यामुळे या महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. या महामार्गावरील माणगांव – दिघी पोर्ट दरम्यानच्या रस्ता रूंदीकरणाचे काम दोन …
Read More »सुधागडातील गावे नॉट रिचेबल, बहुसंख्य कंपन्यांचे नेटवर्कच गायब, नागरिक संतप्त आवश्यकतेनुसार मोबाईल टॉवर बसवण्याची मागणी
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात 109 गावे आहेत. हा तालुका अदिवासीबहुल आहे. बहुसंख्य गावे डोंगर व दर्याखोर्यात वसली आहेत. यातील सुमारे 40 टक्के गावांना अजूनही मोबाईल व इंटरनेट सेवा मिळालेली नाही. तर काही गावांमध्ये फक्त ठरावीक कंपन्यांचेच मोबाईल व इंटरनेट सेवा चालते, ती ही व्यत्यय देत. कानाकोपर्यात आपले नेटवर्क असल्याचे …
Read More »सोशल नेटवर्कच्या माध्यमातून 17 वर्षांनी भेटले मित्र
मोहोपाडा : प्रतिनिधी वाशिवली येथील पारनेरकर महाराज विद्यालयात दहावीनंतर अनेक मित्र दुरावले. यापुढे आपण भेटू की नाही हाच विचार प्रत्येकाच्या मनात रेंगाळत होता, मात्र जे शक्य नव्हते ते सत्यात उतरले अखेर सतरा वर्षांनी. सोशल नेटवर्कच्या माध्यमातून सर्व मित्र सेलिब्रेशन करण्यासाठी मारुती पाटील फार्म हाऊस भिलवले येथे एकत्र आले. शिक्षण पूर्ण …
Read More »आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत पेसमेकरची बाजी
पनवेल : वार्ताहर थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत पनवेलमधील पेसमेकर डान्स अकॅडमीने आपल्या नावावर सोनेरी मोहोर उमटवली आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या पेसमेकरच्या संघाने अकॅडमीच्या स्पर्धकांनी ग्रॅन्ड फिनालेमध्ये मानाची गोल्ड ट्रॉफी पटकावली. त्यांनी हीप-हॉप आणि बॉलीवूड या डान्स स्टाईलचे मिक्चर करून जगातील सर्व सैनिकांना मानाचा मुजरा केला आहे. …
Read More »कुष्ठरोग्यांकरिता मलमपट्टी सुविधा द्यावी
नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांची मागणी पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रेल्वेस्टेशनच्या बाहेरील भागात कुष्ठरुग्णांची एक वसाहत आहे. एकूण रुग्ण आणि परिवार मिळून 120 लोकांची वस्ती आहे. स्थानिक रुग्णांना खास करून जखम असलेले रुग्ण यांना मलमपट्टीचे कोणतेही साधन नाही. शांतिवन पनवेल दवाखाना लांब असल्यामुळे रोज जाणे-येणे शक्य होत नाही. …
Read More »विमानतळ धावपट्टीच्या कामाला सुरुवात
प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर; उलवा नदी प्रवाह बदल करण्याच्या कामाला वेग पनवेल : बातमीदार गेली अनेक वर्षे या ना त्या कारणास्तव लांबणीवर पडत चाललेल्या नवी मुंबई विमानतळाच्या दक्षिण बाजूकडील धावपट्टीच्या कामाला येत्या 15 दिवसांत सुरुवात होणार असल्याचे सिडको सूत्रांनी सांगितले. या कामाला आता अधिक विलंब लागू नये, अशी सूचना सिडकोने विमानतळ बांधकाम …
Read More »श्री राधाकृष्ण वर्धापन दिन सोहळ्याची सांगता
खारघर : रामप्रहर वृत्त खारघरमधील खुटुक बांधणवाडा येथे वासुदेव घरत आणि विनोद घरत यांच्या निवासस्थानी श्री राधाकृष्ण वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित ह.भ.प. अनिल महाराज पाटील यांच्या काल्याच्या कीर्तनासाठी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची गुरुवारी (दि. 7) प्रमुख उपस्थिती लाभली. खारघर येथे बुधवारी सुरू झालेल्या श्री …
Read More »पनवेल शहर पोलिसांनी राबवली दंगा काबू योजना
पनवेल : वार्ताहर पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत हिंदू-मुस्लीम संमिश्र लोकवस्ती असलेल्या टपाल नाका परिसरात आज सकाळी दंगा काबू योजना राबविण्यात आली. संमिश्र लोकवस्तीत टपाल नाका-मिरची गल्ली-मुसलमान नाका-पटेल मोहल्ला-कोळीवाडा-उरण नाका-शिवाजी चौक असा रूट मार्च केला. छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना डिब्रिफिंग केले. दंगा काबू …
Read More »