Breaking News

Monthly Archives: November 2019

खालापुरातील बोंबल्या विठोबाच्या यात्रेची लगबग

खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील खोपोली-पेण रस्त्याला लागूनच ताकई येथे धाकटी पंढरी अशी ओळख असलेल्या विठ्ठल मंदिरातील यात्रेस येत्या कार्तिकी एकादशी म्हणजेच 8 नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. त्यामुळे परिसर स्वच्छ करुन यात्रेसाठीचे नियोजन जोरदार सुरू आहे. सलग 15 दिवस चालणार्‍या या यात्रेत संपूर्ण रायगड, ठाणेसह मुंबई, पुणे व महाराष्ट्रातील लाखो …

Read More »

नागोठण्यात घरफोडी : प्रियदर्शनी वाहतूक संस्थेचे कार्यालय फोडून 38 हजार चोरले

नागोठणे : प्रतिनिधी येथील प्रियदर्शनी चालक मालक वाहक सहकारी वाहतूक संस्थेच्या कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप फोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील रोख रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि. 7) सकाळी उघडकीस आली. डीवायएसपी किरणकुमार सुर्यवंशी आणि पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू केला आहे. मुंबई …

Read More »

पेणमध्ये पिसाळलेल्या गाईचा धुमाकूळ

पेण : प्रतिनिधी शहरातील म्हाडा कॉलनीत बुधवारी (दि. 6) पिसाळलेल्या गाईने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या गाईने दिवसभरात एका महिलेसह अनेक जणांना जखमी केले. या घटनेमुळे शहरातील भुंडा पूल ते म्हाडा कॉलनी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास या गाईला पकडण्यात लोणावळा येथील शिवदुर्ग …

Read More »

खोपोली नाकाबंदीत चार अट्टल गुन्हेगार जेरबंद

खोपोली : प्रतिनिधी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरू केलेल्या नाकांबदीत भिवंडीतील चार अट्टल गुन्हेगारांना जिवंत काडतुसे आणि पिस्तुलासह जेरबंद करण्यात खोपोली पोलिसाना यश मिळाले आहे. ईदीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या आदेशाने जिल्ह्यात सर्वत्र कडेकोट तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी मुंबई – पूणे महामार्गावर रॉकेल पॉईन्टजवळ वाहनांची तपासणी …

Read More »

अशोक मित्तल यांच्या हॉलिडे रिसॉर्टवर आज पडणार हातोडा

अलिबाग : प्रतिनिधी प्रसिद्ध उद्योगपती अशोक मित्तल यांनी अलिबाग तालुक्यात कोळगाव येथे सीआरझेडचे उल्लंघन करून अनधिकृतपणे बांधलेल्या हॉलिडे रिसॉर्टचे वाढीव बांधकाम शुक्रवार (दि 8)पासून पाडण्यात येणार आहे. अलिबाग प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ यांनी गुरुवारी तेथे जाऊन पाहणी केली. बॉम्बे इन्व्हरमेन्ट अ‍ॅक्शन ग्रुप व इतर यांनी अशोक मित्तल यांच्या …

Read More »

पाताळगंगा वसाहतीत कंटेनरची दोन दुचाकींसह वृक्षाला धडक

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील पाताळगंगा औद्योगिक वसाहतीत बुधवारी (दि. 6) रात्री बेफाम कंटेनर चालकामुळे अपघाताची घटना घडली. या कंटेनरच्या धडकेत भला मोठा वृक्ष कोसळला असून बाजूपट्टीवर उभ्या दोन दुचाकींचा चुराडा झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कंटेनर (एमएच-43,वाय-9193) हा सावरोली- खारपाडा मार्गाने …

Read More »

माथेरानमध्ये भामट्यांना दणका, दस्तुरी नाक्यावर पोलिसांची धडक कारवाई

कर्जत : बातमीदार माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी येथे पर्यटकांची फसवणूक तसेच दिशाभूल होते अशा तक्रारी होत्या. त्या अनुशंघाने  येथील पोलिसांनी दोन दिवस मोहीम राबवून दस्तुरी येथील घोडेवाले, हात रीक्षावाले, एजंट व कुली यांच्यावर कारवाई केली. सध्या माथेरानमध्ये दिवाळी पर्यटन हंगाम सुरू असून, मिनिट्रेन बंद असल्याचा फायदा उचलत दस्तुरी येथील घोडेवाले, …

Read More »

‘बालकामगार अनिष्ट प्रथेचे समूळ उच्चाटन करू या’

अलिबाग : जिमाका बालकामगार प्रथेविरुद्ध संपूर्ण राज्यात जनजागृती अभियान कार्यक्रम राबविण्याबाबत कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकार यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांच्या अध्यक्षतेखाली जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास कामगार उपायुक्त प्र. न. पवार, सहाय्यक कामगार आयुक्त भ. मा. आंधळे, सहाय्यक कामगार …

Read More »

‘मिशन शिवडी-न्हावा शेवा लिंक’

पाच हजार कामगारांची प्रकल्पासाठी नियुक्ती मुंबई : प्रतिनिधी शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक हा महत्वाकांक्षी प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएने वेगाने हालचाली सुरू केल्या असून, या प्रकल्पावर पाच हजार तंत्रज्ञ व कामगार नियुक्त करण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प सप्टेंबर 2022पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष आहे. मुंबईच्या दक्षिण भागातील शिवडीपासून न्हावा …

Read More »

कायदा आणि सुव्यस्थेचे पालन करावे -प्रांताधिकारी इनामदार

महाड : प्रतिनिधी  सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या जागेसंबधीच्या खटल्याचा निकाल येत्या कांही दिवसांमध्ये लागण्याची शक्यता आहे. या निकालाचा सन्मान करुन त्याचे पालन करावे, असे प्रतिपादन महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी केले.  महाड प्रांताधिकारी कार्यालयामध्ये शांतता कमेटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार उपस्थितांना …

Read More »