पत्नीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर स्वतःचे नाव टाकल्याचे उघड पनवेल : बातमीदार बोगस नाव धारण करून पनवेल तालुक्यात राहणारा इनामुल मुल्ला हा बांगलादेशी बनावट कागदपत्रामुळे चर्चेत आला होता. त्याच्याकडे सापडलेल्या शाळा सोडल्याचा दाखला हा जिल्हा परिषदेच्या शाळतून घेतला नसल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पत्नीच्या दाखल्याची झेरोक्स काढून त्याच्यावर स्वतःचे नाव …
Read More »Monthly Archives: December 2019
निर्माल्य कलशाचे लोकार्पण
सर्वांनी स्वच्छतेचा अंगीकार करावा : आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्तस्वच्छता ही सेवा आणि कर्तव्य आहे. त्यामुळे सर्वांनी भविष्याचा विचार करून स्वच्छतेचा अंगिकार केला पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. पनवेल येथील निसर्गमित्र संस्थेच्या वतीने ’गाढी नदी वाचवू या’ उपक्रमांतर्गत चिपळे येथे बसविण्यात आलेल्या …
Read More »वुई सपोर्ट ‘सीएए’!
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ पनवेलकर एकवटले पनवेल : रामप्रहर वृत्तनागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सिटीझनशीप अॅमेंडमेंट अॅक्ट-सीएए) समर्थनार्थ शनिवार (दि. 21) सायंकाळी पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने एकटवले. त्यांनी जोरदार घोषणा देऊन या कायद्याचे समर्थन केले.धर्म, प्रांत या आधारावर देशात फूट पाडण्याचा समाजकंटकांचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी …
Read More »शेतकर्यांचा विश्वासघात
अपुर्या कर्जमाफीवर देवेंद्र फडणवीस यांची टीका नागपूर : प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकर्यांचा सातबारा कोरा करणार होते. शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देणार होते, मात्र त्यांनी शब्द फिरवला. केवळ दोन लाखांची कर्जमाफी देऊन या सरकारने शेतकर्यांचा विश्वासघात केला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी …
Read More »राष्ट्रीय गोमंतक गोवा पुरस्कारांचे आज वितरण
शैलेश पालकर यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार पोलादपूर : प्रतिनिधी हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेचा तृतीय राष्ट्रीय गोमंतक गोवा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि. 22) मडगाव डवरली येथील श्री स्वामी समर्थ मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. त्यात पोलादपूर येथील ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित …
Read More »जिल्हा परिषदेसमोर प्राथमिक शिक्षकांचे धरणे आंदोलन; जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी
अलिबाग : प्रतिनिधी जुनी पेन्शन योजना, मयत डीसीपीएस धारकांच्या कुटुंबांना 10 लाखांची मदत मिळावी आणि इतर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षकांनी शनिवारी (दि. 21) जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. या वेळी जुनी पेन्शन योजना लागू करा, अशा घोषणा शिक्षकांनी देऊन …
Read More »कर्जत रेल्वेस्थानक परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात
कर्जत : बातमीदार येथील रेल्वेस्थानकाच्या फलाट तीनच्या बाहेर असलेला पादचारी पूल आणि तिकीट खिडकी परिसरात फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे लोकल गाडी पकडण्यास आलेल्या प्रवाशांना त्रास होत असून, या अतिक्रमण करणार्यांना वेळीच आवरा, अशी सूचना कर्जत पॅसेंजर असोसिएशनने पोलीस आणि सुरक्षा यंत्रणेला केली आहे. प्रवाशांच्या मागणीनंतर कर्जत रेल्वे स्थानकाच्या भिसेगाव …
Read More »बेकायदा वाणिज्य वापरावर दंडात्मक कारवाईची गरज
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील चौक हद्दीतील काही हॉटेल, गोडाऊन आणि शोरूम चालक बिनशेती न करता जागेचा वाणिज्य वापरासाठी बिनधोक वापर करीत असून, त्यामुळे खालापूर तहसीलला लाखो रूपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966प्रमाणे कलम 44प्रमाणे जागेचा वापर वाणिज्य कारणासाठी करायचा असेल तर बिनशेती करणे आवश्यक …
Read More »मुरूडमध्ये दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त
मुरूड : प्रतिनिधी शहरातील नागरिकांना गेल्या पाच दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींत वाढ झाली असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मुरूड शहराची लोकसंख्या 12 हजारांच्या आसपास असून या वाढत्या लोकसंख्येला नगर परिषदेतर्फे आंबोली धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या पाच दिवसांपासून या धरणातून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने …
Read More »पत्रकारांसाठी पेण येथे गुरुवारी कार्यशाळा
अलिबाग : प्रतिनिधी पत्र सूचना कार्यालय, मुंबईच्या वतीने गुरुवारी (दि. 26) पेण येथे पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पेण-खोपोली रोडवरील हॉटेल सौभाग्यवन इंटरनॅशनल येथे होणार्या या कार्यशाळेचे उद्घाटन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होणार आहे. केंद्र शासनाच्या विविध विकासात्मक योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper