Breaking News

Monthly Archives: December 2019

अंमली पदार्थाची विक्री करणारा अटकेत

पनवेल : वार्ताहर खारघर सेक्टर-35 भागात मेस्किलीन या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या युवकाला गुन्हे शाखेच्या अमंली पदार्थ विरोधी पथकाने सापळा लाऊन अटक केली आहे. जुबेर इलियाज खान (27) असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याच्या जवळ असलेली 2 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 44 ग्रॅम मेस्किलीन या अंमली पदार्थाची …

Read More »

खारघर येथे ख्रिसमस आठवड्याचे उद्घाटन, आयोजित स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

नवी मुंबई : जिमाका महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत सहभागी होणार्‍या स्वयंसहाय्यता समूहांच्या वस्तू व उत्पादनांची जास्तीत जास्त विक्री व्हावी यासाठी खारघर येथील सेक्टर 21 च्या महालक्ष्मी सरस मार्ट येथे ख्रिसमस सणाचे औचित्य साधून बुधवारी (दि.25) ते गुरुवारी (दि. 2 जानेवारी) या कालावधीत ख्रिसमस आठवडा साजरा करण्यात येत आहे. या …

Read More »

ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांना ‘एकता कला गौरव पुरस्कार’, सुनीता डागा, संपदा जोगळेकर, शुभांगी सावंत, दुर्गेश सोनार, हरेश साठे, विलास गावडे यांचाही सन्मान

मुंबई : प्रतिनिधी अभिनयाच्या कुशल जोरावर चित्रपट-नाटय क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल एकता कल्चरल अकादमीच्या वतीने ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांना या वर्षीचा एकता कला गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अनुवादित साहित्यिक सुनीता डागा, अभिनेत्री संपदा जोगळेकर, दुष्यसंकलन शुभांगी सावंत, पत्रकारिता दुर्गेश सोनार, हरेश साठे, कवी विलास गावडे  यांचाही पुरस्कार प्राप्त …

Read More »

एसटी चालकाने केली संरक्षण कठड्याची दुरुस्ती

पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील बल्लाळेश्वर मंदिराजवळील वीर सावरकर चौकाच्या संरक्षण कठड्याला दोन दिवसापूर्वी पनवेल आगारातील एका एसटीने चुकीच्या बाजूने येवून धडक दिली होती. त्यामुळे या संरक्षण कठड्याचे नुकसान झाले होते. या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित बस चालकाने तातडीने या संरक्षण कठड्याची दुरुस्ती करून दिली. दोन दिवसापूर्वी सावरकर चौकातून …

Read More »

रेल्वेला लवकरच येणार अच्छे दिन! प्रवासी भाड्यात होणार वाढ; रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रेल्वे प्रवाशांसाठी आता महत्त्वाची बातमी आहे. मोदी सरकार लवकरच रेल्वे भाड्याने देणार आहे. तसेच रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. रेल्वेप्रवाशांसाठी हा मोठा निर्णय असणार आहे. रेल्वेचा प्रवास महागणार असल्याने रेल्वेला अच्छे दिन येणार आहेत. भाडेवाढीचा निर्णय जाहीर होणार आहे.  रेल्वेचा प्रवास आता महागणार आहे. …

Read More »

मोहोपाड्यातील शिक्षकाच्या गाण्याची गिनीज बुकात नोंद

मोहोपाडा : प्रतिनिधी विराग मधूमालती इंटरटेन्टमेंट यांच्या वर्ल्ड सिंग मॅरेथॉन आयोजित कार्यक्रमात खारघर नवी मुंबई येथील लिटील वर्ल्ड मॉलमध्ये नॉनस्टॉप 895 तासाचा गायनाचा कार्यक्रम 38 दिवस सुरू होता. या कार्यक्रमात मोहोपाडा रायगड जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक महेंद्र जाधव यांनी गायलेल्या दहा गाण्याची गिनीज बुकात नोंद झाली आहे. महेंद्र जाधव हे …

Read More »

ख्रिसमस निमित्ताने मुलांना भेट वस्तूंचे वाटप

पनवेल : प्रतिनिधी कामोठे येथील कल की छाया या संस्थेतील मुलांसाठी दिशा महिला मंचतर्फे बुधवारी (दि. 25) ख्रिसमस नाताळ आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने डान्स म्युझिक मस्ती अशा प्रकारच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या मुलांना साधी चप्पलसुद्धा खरेदी करता येत नाही. आलेल्या परिस्थितीचा सामना करत …

Read More »

महात्मा फुले महाविद्यालयात चर्चासत्र

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र व वाणिज्य विभागामार्फत अर्थशास्त्र, वाणिज्य व व्यवस्थापनातील नवीन विचार प्रवाह या विषयावरील एक दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र झाले. यासाठी दक्षिण आफ्रिका येथील नॉर्थवेस्ट युनिव्हर्सिटीई मधील प्रा. डॉ. रेना रविंदर यांना चर्चासत्राचे बीजभाषण करण्यासाठी आमंत्रित …

Read More »

पनवेल : शिवशक्ती क्रिकेट क्लब माणघर यांच्या वतीने प्रकाश झोतातील क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. हे क्रिकेट सामने 23 ते 25 डिसेंबर दरम्यान कैलासवासी मधुकर शंकर पाटील मैदानात सुरु होते. या क्रिकेट सामन्यांना सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहीत केले. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष …

Read More »

नाताळनिमित्त आयोजित कार्यक्रमांना सभागृह नेते परेश ठाकूर यांची भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मध्ये नाताळ हा सण विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त नवीन पनवेल येथील पृथ्वी हॉलमध्ये अमेझिंग ग्रेस प्रेअर ग्रुपच्या वतीने बुधवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थितीत लाभली. या वेळी नगरसेविका राजेश्री …

Read More »