Breaking News

Monthly Archives: December 2019

स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठ्याकरिता प्रयत्न करणार -सभापती बाफना

मुलांच्या शिक्षणाकरिता इंग्लिश मीडियम शाळेची निर्मिती पेण : प्रतिनिधी नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना स्वच्छ व नियमितपणे मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी तत्परतेने काम करणार असल्याचे शिक्षण, क्रीडा व पाणीपुरवठा सभापती दर्शन बाफना यांनी सांगितले. पेण नगरपालिकेचे नवनिर्वाचित शिक्षण, क्रीडा व पाणीपुरवठा सभापती दर्शन बाफना यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते …

Read More »

रायगडमध्ये आयुष्मान भारत योजनेचे काम धीम्या गतीने

म्हसळा : प्रतिनिधी केंद्र सरकारने आर्थिकदुर्बल कुटुंबांसाठी सुरू केलेल्या आयुष्मान भारत योजनेसाठी राज्यात काम सुरू आहे. जनगणनेतील सर्वेक्षणातील आर्थिकदुर्बल कुटुंबांना या योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधा मिळणार आहे, मात्र राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत रायगड जिह्यात या योजनेतील लाभार्थींचे केवायसी नोंदणीचे व गोल्डन कार्ड वितरणाचे काम फार कमी …

Read More »

सरपंचानेच ठोकले ग्रामपंचायतीला टाळे

ग्रामसेवक नसल्याने रजपे येथील दीपाली पिंगळे संतप्त कर्जत : बातमीदार तालुक्यातील रजपे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी  सप्टेंबर 2019मध्ये दीपाली प्रमोद पिंगळे निवडून आल्या आहेत, मात्र त्यांनी वेळोवेळी विनवण्या करूनही कर्जत पंचायत समितीने त्या ठिकाणी आजतागायत ग्रामसेवक दिला नाही. त्यामुळे जनतेची कामे होत नसल्याने संतप्त झालेल्या सरपंच पिंगळे यांनी ग्रामपंचायत कार्यालयालाच टाळे …

Read More »

पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा

विविध विषयांवर चर्चा करून मंजुरी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा शनिवारी (दि. 21) झाली. ही सभा महापालिकेच्या सभागृहात स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विधानसभा निवडणूक 2019करिता दिव्यांग कल्याण …

Read More »

गोव्याकडे जाण्यासाठी पनवेल-करमाळी रेल्वे सुरू

पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई परिसराचा दिवसेंदिवस वाढता विकास लक्षात घेऊन गेल्या 50 वर्षांत रेल्वेसेवेमध्ये प्रवासी संघाच्या शिफारसीने प्रवासी अनेक लक्षणीय सुखकारक बदल अनुभवत आहेत. त्यानुसार 24 नोव्हेंबरपासून पनवेल-करमाळी ही रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. या रेल्वेसेवेचे आरक्षणही पनवेल रेल्वे स्थानकावर व ऑनलाइन पद्धतीनुसार सुरू झाले आहे. करमाळी स्थानकावरून …

Read More »

वणव्यांमुळे निसर्गसंपदा धोक्यात

खारघर डोंगरावर वारंवार आगीच्या घटना हिरवाई नष्ट; पर्यावरणप्रेमींकडून संताप पनवेल : बातमीदार खारघर वसाहतीला लागून असलेल्या डोंगररांगा गेल्या काही दिवसांत लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. हजारो हेक्टर निसर्गसंपदा जळून खाक झाल्याने येथील पक्ष्यांचा अधिवासही धोक्यात आला आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरवर्षी हिवाळा व उन्हाळ्यात आगी लागतात.  …

Read More »

गव्हाण विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव

पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवास प्रारंभ झाला आहे. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन तथा संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. …

Read More »

अलिबागेत आज राज्य अजिंक्यपद क्रॉस कंट्री स्पर्धा

अलिबाग : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य आणि रायगड जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 22) अलिबाग येथे राज्य अजिंक्यपद क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमधून तेलंगण करीमनगर येथे होणार्‍या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ निवडण्यात येणार आहेत.राज्यस्तरीय स्पर्धा पुरुष व महिला 10 किमी, 20 वर्षांखालील मुले …

Read More »

पनवेलच्या कुणाल पाटीलचे बॉक्सिंग स्पर्धेत ‘सुवर्ण’यश

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेलमध्ये राहणारा व्ही. के. हायस्कूलचा विद्यार्थी कुणाल पाटील याने नुकत्याच अकोला येथे झालेल्या पाचव्या राज्यस्तरीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये नेत्रदीपक कामगिरी करीत सुयश प्राप्त केले आहे.कुणालने स्पर्धेत क्लब क्लास (वय 12 ते 13)मध्ये 44 किलो वजनी गटात रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. उपांत्यपूर्व फेरीत त्याने नागपूरच्या रचित सरपाटणे याचा पराभव …

Read More »

मीराबाई चानूला सुवर्णपदक

दोहा : वृत्तसंस्थामाजी जागतिक विजेती वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूने कतार आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतील महिलांच्या 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.ऑलिम्पिक पात्रता प्रकारात चानूने 194 किलो वजन उचलत जेतेपदाला गवसणी घातली. टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची अंतिम क्रमवारी जाहीर झाल्यानंतरच पात्रता स्पष्ट होऊ शकेल.2018च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणार्‍या 24 वर्षीय मीराबाईने स्नॅच …

Read More »