Breaking News

Yearly Archives: 2019

इनामपुरी (खारघर) : साक्षी स्टार इंटरप्रायजेसच्या वतीने दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा समारोप शनिवारी झाला. या वेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन गौरविले. भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी व अन्य सोबत होते.

Read More »

कामोठे  : बेटी बचाओ-बेटी पढाओ, असा संदेश देत एक स्वयंसेवक : एक हौसिंग सोसायटी अंतर्गत रविवारी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झेंडा दाखविण्यात आला. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, रहिवासी व धावपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजेत्यांना …

Read More »

‘हिल चॅलेंजर’चे हेमंतकुमार, कमुन्या नूकी विजेते

रोहे : प्रतिनिधी स्व. डॉ. सतिश लेले यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या कोकण हिल चॅलेंजर स्पर्धेच्या दुसर्‍या वर्षी हेमंतकुमार हा स्पर्धक 21 किमीच्या मुख्य हाफ मरेथॉन स्पर्धेचा मानकरी ठरला आहे. 10.100 हे अंतर त्याने एक तास 10 मिनिटांत पार केले. इथिओपियन धावपटू मिकीयास येमोटो याने द्वितीय आणि रोनाल्ड किबीवॉट या केनियन …

Read More »

कर्जतमध्ये मिडलाइन कबड्डी अ‍ॅकॅडमीचे उद्घाटन

कर्जत ः प्रतिनिधी येथील पोलीस मैदानावर अनिकेत म्हात्रे याने मिडलाइन कबड्डी अ‍ॅकॅडमी सुरू केली असून, त्याचे उद्घाटन करण्यात नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या आले. या अ‍ॅकॅडमीतर्फे प्रोफेशनल कोचिंग, फिटनेस असेसमेंट, स्ट्रेन्थ अँड कंडिनिंग कॅम्पस, स्पोर्ट्स सायकॉलॉजी, स्पोर्ट्स न्यूट्रिशन, व्हिडीओ व अ‍ॅनॅलिसिस, स्पोर्ट्स करिअर गायडन्स आदींविषयी मार्गदर्शन दिले जाणार आहे. मूळचा पेण …

Read More »

कुस्ती संघाच्या सरचिटणीसपदी खोपोलीचे मारुती आडकर

खोपोली : प्रतिनिधी येथील ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक व राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त मारुती आडकर यांची कुस्तीगीर संघाच्या विभागीय सरचिटणीसपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. मारुती आडकर यांनी क्रीडा क्षेत्रात विशेषतः तालीम व कुस्तीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मागील पाच वर्षेही ते कोकण विभागीय कुस्तीगीर संघाचे …

Read More »

हॅण्डबाल स्पर्धेत रायगड तृतीय

पनवेल : प्रतिनिधी हॅण्डबॉल असोसिएशन महाराष्ट्रद्वारा 48वी महिला महाराष्ट्र राज्य हॅण्डबाल अजिंक्यपद स्पर्धा पालघरच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रायगड संघाने नागपूरचा पराभव करीत तृतीय क्रमांक पटकाविला. राज्यभरातून तब्बल 20 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेत सांगली, ठाणे या संघांवर मात करीत रायगड …

Read More »

रायगडचे कबड्डी संघ जाहीर

अलिबाग : प्रतिनिधी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याचे पुरुष व महिला संघ जाहीर करण्यात आले आहेत. राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा 19 ते 22 डिसेंबर या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे होणार आहे. उरणमधील बोकडवीरात झालेल्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून रायगडचे पुरुष व महिला संघ निवडण्यात आले. …

Read More »

घसरगुंडीनंतर टीम इंडिया सावरली, वेस्ट इंडिजविरुद्ध श्रेयस अय्यर, ऋषभ पंत चमकले

चेन्नई ः वत्तसंस्था वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने 50 षटकांत 9 बाद 289 धावा केल्या. विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांनी भारताच्या डावाला आकार दिला. चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर रविवारी (दि. 15) खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार किएरॉन …

Read More »

नेरळमध्ये विद्यार्थ्याचे हाताचे बोट तुटले

शाळेकडून पालकांना कोणतीही माहिती नाही कर्जत : बातमीदार कल्याण-कर्जत राज्यमार्गावरील नेरळ पेट्रोलपंप येथे हाजी लियाकत इंग्लिश मीडियम स्कूल असून, तेथे सहावीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याच्या हाताचे बोट शाळेतच तुटले आहे, मात्र त्याबाबत शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्याच्या पालकांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. पालकांनी या विद्यार्थ्याला खासगी डॉक्टरकडे नेल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. …

Read More »

भाजप महाड तालुकाध्यक्षपदी जयवंत दळवी बिनविरोध

महाड : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या पक्षांतर्ग निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत रविवारी (दि. 15) महाड तालुका अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. त्यासाठी जयवंत शशिकांत दळवी यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस आणि निवडणूक निरीक्षक राजेश मपारा यांनी जयवंत दळवी यांची महाड तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे …

Read More »