Breaking News

Yearly Archives: 2019

अतिउत्साही पर्यटकांना आवरा

पावसाळा सुरू होताच सर्वांना वेध लागतात ते वर्षा सहलीचे. रायगड जिल्ह्यातील धबधबे व समुद्रकिनारे वर्षा सहलीसाठी पर्यटकांना भुरळ घालतात. पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणावर रायगडात येतात. पर्यटकदेखील पर्यटनाचा आनंद घेत असतात. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळते. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळतो, परंतु काही अतिउत्साही पर्यटकांमुळे अपघात होतात. कित्येकदा प्राणहानी होते. त्यामुळे …

Read More »

काँग्रेसची कानउघाडणी

राजकीय हिंसाचाराच्या घटना पश्चिम बंगाल आणि केरळमध्येही घडल्या आहेत आणि घडत आहेत. मग निव्वळ झारखंडला झुंडबळींचा अड्डा म्हणून हिणवणे कदापिही योग्य ठरत नाही. राजकीय हिंसाचाराच्या प्रत्येक घटनेला समान पद्धतीने हाताळले गेले पाहिजे हे मोदींचे म्हणणे अतिशय योग्यच आहे. त्या-त्या ठिकाणी पोलिसांनी दोषींना ताब्यात घेऊन कायद्यानुसार त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे …

Read More »

‘रयत’च्या केंद्राचे आज खारघरमध्ये उद्घाटन

पनवेल : वार्ताहर रयत शिक्षण संस्था सातारा, सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी पार्क पुणे आणि टाटा टेक्नॉलॉजी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर सेक्टर 11 येथे उभारण्यात आलेल्या सेंटर फॉर इन्व्हेशन, इनोव्हेशन अ‍ॅण्ड इक्युबेशनचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 28) दुपारी 3 वाजता करण्यात येणार आहे. हा सोहळा ‘रयत’चे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद …

Read More »

स्वप्नपूर्ती संकुलात कुत्र्यांची दहशत

पनवेल ः वार्ताहर खारघरमधील सेक्टर 36 मध्ये सिडकोकडून उभारण्यात आलेल्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण संकुलात सध्या भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवली आहे. संकुलात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून या भटक्या कुत्र्यांचा रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी संकुलातील रहिवाशांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. स्वप्नपूर्ती गृहनिर्माण प्रकल्पात …

Read More »

‘अनधिकृत सदनिकांची नोंदणी करणार्या दुय्यम निबंधकांवर कडक कारवाई करा’

पनवेल ः रामप्रहर वृत्त बेकायदेशीर इमारतीमधील सदनिकांची नोंदणी करून सामान्यांची फसवणूक करणार्‍या विकासकाला मदत करणार्‍या पनवेलच्या दुय्यम निबंधकांवर कडक कारवाई करण्याची मागणी उसर्ली येथील रामचंद्र भगत यांनी सिडकोचे अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर आणि सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे. पनवेल तालुक्यातील नैना हद्दीतील उसर्ली खुर्द ग्रामपंचायत हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर इमारतींचे …

Read More »

आरपी धातूच्या नावाने कोट्यवधींचा गंडा; एकाला अटक

पनवेल ः वार्ताहर अस्तित्वात नसलेल्या आरपी या धातूच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करण्याच्या बहाण्याने खारघरमधील महिलेला तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांना गंडा घालणार्‍या टोळीतील आरोपी अनिल सहदेव साळी (49) याला अखेर आर्थिक गुन्हे शाखेने वर्सोवा भागातून अटक केली. आरोपी अनिल साळी याने व त्याच्या सहकार्‍यांनी आरपी धातूच्या नावाने अनेकांना कोट्यवधी …

Read More »

सुरक्षेसाठी बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी एकवटले

पनवेल ः वार्ताहर  बँकांच्या शाखांवर व एटीएमवर गंभीर हल्ले झाल्याचे विविध माध्यमांकडून कळत आहे. यात काही बँक कर्मचार्‍यांना आपले प्राण गमावले आहेत तर काही गंभीर झाले आहेत. तसेच  बँकांची लाखोंच्या रुपयांची लूट झाली आहे. बँकांची  सुरक्षा हा सध्या ऐरणीवरचा प्रश्न निर्माण झाला आहे. बँक ही ग्राहकांच्या मेहनतीच्या मिळकतीच्या ठेवींची सुरक्षा …

Read More »

कर्मचार्यांना गणवेश सक्ती करावी

सभापती तेजस कांडपिळे यांची मागणी; आयुक्तांना निवेदन पनवेल ः वार्ताहर  पनवेल महानगरपालिकेतील कामचार्‍यांना गणवेश परिधान करण्याची सक्ती करावी, अशी मागणी प्रभाग समिती ’ड‘चे सभापती तेजस कांडपिळे यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पनवेल महानगरालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 2016 रोजी …

Read More »

बावनबंगला येथे घरफोडी

पनवेल ः पनवेल शहरातील बावनबंगला येथील पाटकरवाडामधील एका घरात येथील सुरक्षा रक्षकानेच घरफोडी केल्याने जवळपास दोन लाख रुपये चोरुन नेल्याची घटना घडली आहे. बावनबंगला येथील पाटकरवाडा येथे पहिल्या मजल्यावर असलेल्या आदिनाथ पाटकर यांचे घर बंद असल्याचे पाहून त्यांच्याकडे असलेल्या सुरक्षा रक्षकानेच घरात प्रवेश करून घरातील कपाटात असलेले जवळपास दोन लाख …

Read More »

खारघर भाजपच्या वतीने दाखले वाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त दरवर्षीप्रमाणे भारतीय जनता पार्टी खारघर यांच्यावतीने लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ विद्यार्थी, नागरिक आणि गरजूंसाठी वेगळ्या प्रकारचे दाखले उपलब्ध करुन देण्यासाठी सिडकोचे अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली दाखले वाटप शिबिर रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर येथे नुकतेच घेण्यात आले.  रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, …

Read More »