Breaking News

Yearly Archives: 2019

ढगाळ वातावरणामुळे ताडी निर्मितीवर परिणाम

परवाना शुल्क माफ करण्याची मागणी अलिबाग : प्रतिनिधी लांबलेला पाऊस व चक्रीवादळ यामुळे असलेले ढगाळ वातावरणाचा ताडी उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. ताडी निर्मिती थांबली आहे. त्यातच राज्य शासनाने ताडीमाडीच्या लिलावाला डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ दिली असल्यानेे ताडीमाडी उत्पादकांना आर्थिक नुकसान सहन करावे  लागत आहे. त्यामुळे सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यानचे परवाना …

Read More »

कर्जत तहसील कार्यालयाचे पटांगण झाले खाजगी वाहनांचे पार्किंग

कडाव : प्रतिनिधी तहसील कार्यालयात विद्यार्थी, नागरिक आणि शेतकरी यांची महत्वाची कामे असतात. मात्र कर्जत तहसिलदार कार्यालयाचे पटांगण म्हणजे खासगी वाहनांची पार्किंग झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्याविषयी नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कर्जत तहसिल कार्यालयाच्या पटांगणात खाजगी वाहनांची गर्दी येथे नक्की कशासाठी येते. हे मात्र गुलदस्त्यातच आहे असे …

Read More »

पर्यटनासाठी समुद्रकिनारे होताहेत स्वच्छ

कर्जत : बातमीदार पर्यटनाला चलन देण्यासाठी स्वच्छता हि बाब महत्वाची आहे.जगातील अनेक देश हे केवळ पर्यटनावर आपल्या देशाची आर्थिक सुबत्ता राखून आहेत. पर्यटनासाठी भारत हा जगात आघाडीवरील देश आहे. हे ओळखून पर्यटकांना आकर्षित करणारे समुद्रकिनारे स्वच्छ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या केंद्रीय पर्यावरण आणि वन तसेच सामाजिक वनीकरण …

Read More »

बंधारा फुटल्याने मुरूड किनार्याची धूप

उधाणामुळे सुरुच्या बनालाही धोका मुरूड : प्रतिनिधी  मुरुड शहराला तीन किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. मात्र पावसाळ्यातील मोठ्या भरतीमुळे धुप्रतिबंधक बंधारा फुटून मुरुड समुद्र किनार्‍याचे मोठे नुकसान झाले आहे. सुरुच्या झाडांची वनेसुध्दा नष्ट होत आहेत. लाटांसोबत वाहून येत असलेल्या कचर्‍यामुळे मिनी गोवा म्हणून परिचित असलेल्या मुरूडच्या समुद्र किनार्‍याला बकाल स्वरूप …

Read More »

दोन तासांत चोरट्याला केले जेरबंद

अलिबाग : प्रतिनिधी चेंढरे येथील बाफनाबाग परिसरात चोरी करून पळ काढणार्‍याला अलिबाग पोलिसांनी अवघ्या दोन तासात जेरबंद केले. त्याच्याकडून चोरून नेलेला मुद्देमालही हस्तगत केला. नागडोंगरी येथील बाफनाबाग सोसायटीतून पाण्याचा पंप आणि दुर्मिळ पितळी घंटा चोरीला गेली होती. या संदर्भात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. पोलीस निरीक्षण के. डी. …

Read More »

माणगाव संगमेश्वर मंदिरात ‘त्रिपुरारी’

माणगाव : प्रतिनिधी येथील श्री स्वयंभू संगमेश्वर मंदिरात मंगळवारी (दि. 12)त्रिपुरारी पौर्णिमा भक्तीभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मंदिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाविकांनी शिवशंकराची मनोभावे प्रार्थना केली. मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजयअण्णा साबळे व सर्व ट्रस्टी यांनी भक्तगणांचे स्वागत केले. मंगळवारी प्रसाद खरे, सचिन गोरेगांवकर, व सहाकार्‍यांनी मंदिराच्या …

Read More »

‘वाचनालय हे त्या शहराचा चेहरा’

कर्जत : प्रतिनिधी वाचनालयावरून त्या शहराची किंवा गावाची संस्कृती समजते, म्हणूनच वाचनालय हे त्या शहराचा चेहरा असतो. मराठी भाषेतील शब्दांचे अर्थ विविध आहेत. ते गुगल सर्च करून कळणार नाहीत तर त्यासाठी शब्दकोश वापरले पाहिजेत असे प्रतिपादन प्रा. संध्या शहापुरे यांनी येथे केले. कर्जतमधील लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालयाचे शतक महोत्सवी वर्ष सुरू …

Read More »

मुरूड आयटीआयचे स्थलांतर

नूतन इमारतीत वर्ग भरण्यास सुरुवात मुरुड : प्रतिनिधी पंधरा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मुरुड येथील औद्योगीक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सोमवारी (दि. 11) नवीन स्वतंत्र इमारतीत स्थलांतरीत झाली आहे. मुरुड आयटीआय गेल्या 15वर्षापासून शहरातील सर एस. ए. हायस्कूलच्या एका हॉलमध्ये सुरू होते. दरम्यान, शहरातील एका टेकडीवर असलेल्या दत्त मंदिराच्या परिसरात या आयटीआयची …

Read More »

नेरळमध्ये त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त रोषणाई

कर्जत : बातमीदार त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नेरळ येथील श्री कुसुमेश्वर मंदिरात मंगळवारी (दि. 12) रात्री दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. श्री समर्थ सेवा संघाच्या वतीने कुसुमेश्वर मंदिर परिसर शेकडो दिव्यांनी उजळवून टाकण्यात आला होता.  नेरळ गावातील कुसुमेश्वर मंदिर पुरातन असल्याच्या नोंदी आहेत. या मंदिरात मंगळवारी रात्री त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »

रेवदंड्यात नागाला दिले जीवदान

रेवदंडा : प्रतिनिधी चौल भगवती-नवगाव येथील गजानन राऊत यांच्या घराच्या पाठिमागे असलेल्या बिळांमध्ये साप आढळल्याने परिसरातील सर्वांचीच धावपळ व घबरगुंडी उडाली. कोणीतरी चौलमधील सर्पमित्र स्वप्नील ठाकूर यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून बोलावून घेतले. स्वप्नील ठाकूर लागलीच घटनास्थळी पोचले. त्यांनी बिळाचे भेावती खड्डा मारून सापाला बाहेर काढण्यास यश मिळविले. अंदाजे साडेपाच फुट …

Read More »