Breaking News

Monthly Archives: February 2020

दुंदरे गु्रप ग्रामपंचायत उपसरपंचपदी दर्शना चौधरी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दुंदरेच्या उपसरपंचपदाची निवडणूक नुकतीच झाली. यामध्ये उपसरपंचपदी दर्शना नारायण चौधरी यांची निवड करण्यात आली. या वेळी ग्रामपंचायतीचे सरपंच अनुराधा विष्णू वाघमारे, माजी उपसरपंच रमेश सिताराम चौधरी, सदस्या निराबाई शांताराम चौधरी, मंगल गणेश उसाटकर, सदस्य किशोर आत्माराम पाटील, ग्रामविकास अधिकारी व्ही. आर. राठोड, …

Read More »

कर्जतमध्ये लाखोंचा गांजा जप्त

दोन जणांना अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील पळसदरी परिसरातून साडे पंधरा किलो गांजा आणि त्याची वाहतूक करणारी गाडी असा सुमारे 10 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी दोन जणांना  अटक केली आहे. कर्जत शहरातून अमली पदार्थाची वाहतूक होणार असल्याची माहिती अलिबाग येथील स्थानिक …

Read More »

‘त्या’ नराधमावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल

कर्जत : बातमीदार तालुक्यातील धोत्रे गावात राहणार्‍या अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी कृष्णा नामा आगीवले याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला सात दिवसांची  न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कर्जत तालुक्यातील धोत्रे गावातील 13 वर्षीय पीडित मुलीच्या घरात तिची आई आणि लहान बहिणीशिवाय कोणीही पुरुष मंडळी नाही, ही …

Read More »

मराठी ही ज्ञानभाषा व्हावी -प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण

मुरुड : प्रतिनिधी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातील मराठी विभागामार्फत  गुरुवारी मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हिंदी राष्ट्रभाषा असली तरी मराठी ही राजभाषा आहे. तिला ज्ञानभाषा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. चव्हाण यांनी …

Read More »

धाटावमध्ये मराठी भाषा गौरव दिन

रोहे : प्रतिनिधी एम. बी. मोरे फाऊंडेशनच्या धाटाव येथील महिला महाविद्यालयात गुरुवारी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी फाऊडेशनचे संचालक अशोक मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात कोकण मराठी साहित्य परिषदेचे सुखद राणे यांनी, कविवर्य कुसुमाग्रजांचे मराठी भाषेतील योगदान व मराठी भाषेतून स्वतःचे करिअर घडविण्यासाठी उपलब्ध असणारी संधी, या …

Read More »

म्हसळ्यात मराठी भाषेबाबत प्रतिज्ञा

म्हसळा : प्रतिनिधी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त म्हसळा सार्वजनिक वाचनालयात गुरूवारी (दि. 27) ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त मराठी साहित्यीक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व मराठी भाषेबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच शाळा नं.1च्या विद्याथ्यार्ंना 50 पुस्तकांचा संच देऊन साखळी वाचनालयाचे सदस्य करून घेतले. यावेळी वसंतराव नाईक महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. मशाळे यांनी …

Read More »

मराठी भाषा दिन : नेरळ रेल्वेस्थानकात रांगोळीतून शुभेच्छा; गाण्यांचीही मेजवानी

कर्जत : बातमीदार मराठी भाषा दिनानिमित्त नेरळ रेल्वे स्थानकात गुरुवारी (दि. 27) मराठी भाषेबद्दल माहिती देणार्‍या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. राजमुद्रा आणि मराठी आमुची मायबोली असा मजकूर असलेल्या या रांगोळ्यांच्या माध्यमातून सर्व प्रवाशांना शुभेच्छा देण्याचा प्रयत्न मनसे रेल्वे कामगार युनिटच्या माध्यमातून करण्यात आला होता. तसेच या रेल्वे स्थानकात दिवसभर मराठी …

Read More »

पनवेलमध्ये स्वरशंकरा कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त विरूपाक्ष देवस्थानच्या वतीने पनवेल येथे स्वरशंकरा या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रसिद्ध शास्त्रीय गायक केदार केळकर व नेहा पुरोहित यांंचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन झाले. पं. अरुण कशाळकर व मंदार भिडे यांच्याकडे गायनाचे धडे घेणार्‍या नेहा पुरोहित हिने देव देव महादेव महेश्वर या यमनकल्याण …

Read More »

सीकेटी विद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील मराठी माध्यमाच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका इंदू घरत यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी (दि. 27) मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष अरूणशेठ भगत यांच्या हस्ते …

Read More »

‘मराठी ही हृदयाची भाषा आहे, ती माणसाला मोठेच बनवते’

पनवेल : रामप्रहर वृत्त जगात बोेलणार्‍या भाषांमध्ये मराठी भाषेला मानाचे स्थान असून मराठी भाषिक व्यक्तींनी जगावर प्रभुत्व गाजवले, इंग्रजी बोला पण मराठी सोडू नका. मराठी ही हृदयाची भाषा आहे ती माणसाला मोठेच बनवते, असे मत सुप्रसिद्ध साहित्यिक व कवी अरूण म्हात्रे यांनी पनवेल येथे व्यक्त केले. महात्मा फुले कला, विज्ञान …

Read More »