Breaking News

Monthly Archives: February 2020

जाफरच्या नावावर महाविक्रम

नागपूर : प्रतिनिधी रणजी ट्रॉफी स्पर्धेत विदर्भाकडून खेळणार्‍या वासिम जाफरने आतापर्यंत कोणाला जमली नाही अशी कामगिरी केली आहे. नागपूरमध्ये सुरू असलेल्या केरळविरुद्धच्या सामन्यात जाफरने रणजी ट्रॉफी स्पर्धेतील 12 हजार धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. विशेष म्हणजे जाफर रणजी स्पर्धेत 150वा सामना खेळत आहे. …

Read More »

बास्केटबॉल स्पर्धेला खांदा कॉलनीत प्रतिसाद; महान खेळाडू कोबी ब्रायंट यांना श्रद्धांजली

पनवेल : वार्ताहर आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट यांचे नुकतेच दुर्दैवी अपघाती निधन झाले. या महान खेळाडूला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बास्केटबॉल असोसिएशन ऑफ रायगडच्या वतीने ब्लॅक मांबा बास्केटबॉल स्पर्धा भरविण्यात आली होती. या स्पर्धेत शेकडो खेळाडू सहभागी झाले होते. बास्केटबॉल असोसिएशन ऑफ रायगडचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे नगरसेवक विक्रांत …

Read More »

युवा चेहर्यांना संधी; पृथ्वी शॉचे पुनरागमन; अग्रवाल, गिल, विहारी, सैनीलाही स्थान; न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सलामीवीर रोहित शर्माला दुखापतीमुळे उर्वरित न्यूझीलंड दौर्‍याला मुकावे लागल्यानंतर भारतीय निवड समितीने कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. अनुभवी खेळाडूंच्या गैरहजेरीत युवा खेळाडूंना या संघात स्थान मिळाले आहे, मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणार्‍या लोकेश राहुलला वगळण्यात आले आहे. मुंबईकर पृथ्वी शॉने कसोटी संघात पुनरागमन …

Read More »

‘सीएए’विरोधातील आंदोलनांमागे कारस्थान

पंतप्रधानांची आप, काँग्रेसवर सडकून टीका नवी दिल्ली : वृत्तसंस्था‘सीएए’विरोधात सीलमपूर, जामिया, शाहीन बागमध्ये आंदोलने सुरू आहेत. ही आंदोलने योगायोग नाही, तर तो एक प्रयोग आहे. यामागे राजकारणाचे असे डिझाईन आहे, जे राष्ट्राच्या सौहार्दाला बाधा आणत आहे. कायद्याला केवळ विरोध असता तर सरकारच्या आश्वासनानंतर तो संपला असता, पण आप आणि काँग्रेसची …

Read More »

झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करता येत नाही

मुंबई ः प्रतिनिधीझोपलेल्याला जागे करता येते, मात्र झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करता येत नाही, असे म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. सीएएच्या मुद्द्यावरुन जी भूमिका शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतली, त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खडे बोल …

Read More »

पोलादपूर-खेडदरम्यान महाकाय भुयारी मार्ग

पोलादपूर ः प्रतिनिधीसार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वरील कशेडी घाटाला पर्याय म्हणून पोलादपूरमधील भोगाव ते खेड तालुक्यातील खवटीपर्यंत भुयारी मार्ग खोदण्याचे काम सुरू केले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हा सर्वांत मोठ्या लांबीचा भुयारी मार्ग असणार आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी मार्ग म्हणून पोलादपूरमधील भोगाव …

Read More »

रायगडात पर्यटनवृद्धीसाठी अधिक सेवासुविधांची गरज

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन अलिबाग ः जिमाका रायगड जिल्ह्यात पर्यटनवृद्धीच्या अनेक संधी आहेत, मात्र पर्यटनवाढीसाठी अधिक सेवासुविधा निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. रायगड जिल्ह्याच्या नियोजन भवन येथे सोमवारी (दि. 3) राज्य व केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा आढावा राज्यपालांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.या बैठकीस …

Read More »

माणगाव असोसिएशनची क्रिकेट स्पर्धा उत्साहात

माणगाव ः प्रतिनिधीमाणगाव येथील मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत फ्रेंड्स ग्रुप साई माणगाव संघाने अंतिम सामन्यात नाणोरे संघावर मात करीत सलग दुसर्‍यांदा अंतिम विजेतेपद मिळवून प्रथम क्रमांकाचे बक्षीस 10 हजार  रुपये व आकर्षक चषक पटकावला. येथील माणगाव क्रिकेट असोसिएशनच्या वतीने यंगस्टार उतेखोल माणगावतर्फे ही स्पर्धा घेण्यात आली. माणगाव शासकीय …

Read More »

धामणपाड्यातील क्रिकेट स्पर्धेत वादळ शहाबाजचे सुयश

श्रीगाव : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील धामणपाडा येथे रविवारी (दि. 2) विहार इलेव्हन क्रिकेट क्लब धामणपाडा यांच्या वतीने व पोयनाड शहाबाज पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन शहाबाज ग्रामपंचायत सरपंच धनंजय म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यात वादळ शहाबाज संघ अंतिम विजेता ठरला. त्यांना …

Read More »

आडघरचा छावा क्रिकेट संघास अंतिम विजेतेपद

माणगाव ः प्रतिनिधीलहाने सुरव येथील मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत आडघरचा छावा क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब कोशिंबळे संघावर मात करीत अंतिम विजेतेपद मिळवून प्रथम क्रमांकाचे बक्षीस 10 हजार  रुपये व आकर्षक चषक पटकावला. येथील एकता ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने कोयना वसाहत रोहीनेतर्फे ही स्पर्धा …

Read More »