Breaking News

Monthly Archives: April 2020

शेलू येथे नरेश मसणे यांच्याकडून धान्यवाटप

कर्जत : बातमीदार कर्जत तालुका पंचायत समितीचे सदस्य भारतीय जनता पक्षाचे नरेश मसणे यांनी शेलू गावातील गरीब लोकांना धान्य वाटप करण्यात आले. शेलू गावातील रोजंदारी कामगार आणि विधवा महिला यांना मदत केल्याने त्यांना आधार मिळाला आहे. शेलू गावात घरोघरी जाऊन कर्जत पंचायत समितीचे सदस्य नरेश मसणे यांनी धान्य वाटप आयोजित …

Read More »

अलिबागमध्ये काळाबाजार करणार्‍या रेशन दुकानावर गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; 51 हजारांचा माल पोलिसांनी केला जप्त

अलिबाग ः प्रतिनिधी धान्याचा काळाबाजार करणार्‍या अलिबाग तालुक्यातील रेशन दुकानावर रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली. या कारवाईत 51 हजारांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. टाळेबंदीच्या काळात शासनाकडून रेशन दुकानांवर स्वस्त दरात धान्यविक्री केली जात आहे, परंतु काही रेशन दुकानदार शिधापत्रिका धारकांव्यतिरिक्त इतर लोकांना अधिक दराने धान्यविक्री …

Read More »

वादळी पावसाचा आंबा उत्पादकांना फटका; पोलादपूर तालुका कृषी अधिकार्‍यांचा प्राथमिक अंदाज

पोलादपूर : प्रतिनिधी चैत्र प्रतिपदेच्या दिवशी म्हणजेच मराठी नवीन वर्षाच्या पहिल्याच गुढीपाडव्याच्या दिवशी वादळी पावसामुळे पोलादपूर तालुक्यातील 87 पैकी 37 गावांमधील शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला असून यामध्ये 35 गांवातील शेतकरी आंबा उत्पादक असल्याचा प्राथमिक अंदाज पोलादपूर तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ यांच्या कार्यालयाकडून तयार करण्यात आलेल्या अहवालामध्ये व्यक्त केला आहे. …

Read More »

श्री रत्नेश्वरी देवीचा पालखी सोहळा रद्द

उरण : जसखार गावची ग्राम देवता श्री रत्नेश्वरी देवीचा 15 व 16 एप्रिलला होणारा यात्रा पालखी उत्सवही रद्द करण्याचा निर्णय जसखार ग्रामस्थांनी पोलीस अधिकार्‍यांशी चर्चेअंती घेतला असल्याची माहिती जसखार ग्रामपंचायतीचे सरपंच दामोदर घरत यांनी दिली आहे. हा उत्सव 15 एप्रिलला येत असल्याने पाच जनांचा सोशल डिस्टन्सिंग राखून देवीचा अंग गावातून …

Read More »

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच राहून साजरी करा’

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही घरामध्येच साजरी करावी, असे आवाहन पनवेल महापालिकेचे नगरसेवक तथा भाजप रायगड जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश बिनेदार आणि भाजपचे रायगड जिल्हा परिषद प्रतोद व अनुसूचित जाती …

Read More »

उरण नगर परिषदेकडून रस्त्यांवर संदेश रेखाटून जनजागृती

उरण : वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे.  उरण नगरपरिषदकडून  नागरिकांची सुरक्षा, त्यांचे आरोग्य चांगले राहावे त्याकरिता विविध प्रकारच्या माध्यमातून कोरोना संदर्भात जनजागृती करीत आहे. नागरिकांनी कोणती व कशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे याबाबत मोठ्या प्रमाणत जनजागृती केली जात आहे.  उरण नगरपरिषदेने कोरोनाबाबतच्या जनजागृतीसाठी विविध माध्यमांचा वापर केला …

Read More »

हरिग्राम येथील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल तालुक्यातील हरिग्राम  येथे मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप निराधार कुटुंबांना करण्यात आले. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने सुमारे 35 हून अधिक कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. समितीच्या वतीने ज्यांना ज्यांना शासनाची कोणतीही मदत …

Read More »

करंजाडेत साई संस्थानतर्फे गरजू महिलांना मदत

पनवेल : वार्ताहर श्री साई नारायणबाबा पनवेल व भगवती साई संस्थानतर्फे करंजाडे येथील हातावर पोट असलेल्या माता-भगिनींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून मदतीचा हात दिला आहे. गेल्या 20 दिवसापासून श्री साई नारायणबाबा संस्था पनवेलच्या मार्फत वेगवेगळ्या गोरगरीब जनतेला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. करंजाडे येथील काही माता-भगिनींना अशाच प्रकारे जीवनावश्यक …

Read More »

खारघरच्या आणखी एका विलगीकरण कक्षाचे विद्युतीकरण

पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार खारघर येथील श्री सत्य साई हेल्थ अ‍ॅण्ड एज्युकेशन ट्रस्ट, सेक्टर 38 या रुग्णालयाचे विलगीकरण कक्ष म्हणून निवड करण्यात आल्याने त्यासाठी उच्च दाब वीजपुरवठा सुरु करण्याचे काम एका आठवड्यात  युद्धपातळीवर रविवारी (दि. 12) पूर्ण करण्यात आले. या इमारतीत 500 केडब्लूचे  वीजभार  सुरु करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या …

Read More »

भाजप नगरसेवकांकडून नागरी समस्यांचे निराकरण

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्यासह नगरसेविका रूचिता लोंढे यांनी कोरोना प्रादुर्भाव झाल्यानंतर प्रभागात सातत्याने संपर्कात राहून आवश्यक असणार्‍या गरजांची दखल घेवून त्याची माहिती वेळोवेळी प्रभागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत सोशल मिडीया व व्हॉटसअ‍ॅपद्वारे पोहचवून अडीअडचणी सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे, त्याबद्दल त्यांचे प्रभागात कौतुक …

Read More »