Breaking News

Monthly Archives: April 2020

आयुक्त संजय कुमार यांच्या हस्ते पोलीस कुटुंबांना कोरडा शिधा

पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांचे हस्ते पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 मधील पोलीस कुटुंबांना शुक्रवारी (दि. 24) कोरडा शिधाचे वाटप करण्यात आले. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले, यामुळे नवी मुंबई पोलीस दलातील कर्मचारी महिनाभर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रस्त्यावर उभे आहेत. परिमंडळ-2 मधील …

Read More »

नवी मुंबई डाक विभागाने पाठविले देशभरात वैद्यकीय साहित्य

उरण : वार्ताहर कोविड-19 अर्थात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी  सरकारने दि. 23 मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केले. या काळात वैद्यकीय तसेच पोलीस कर्मचारी आपल्या प्राणांची पर्वा न करता कोरोनाशी लढा देत आहेत. या कर्मचार्‍यांच्या बरोबरीनेच डाक विभागाचे कर्मचारी सुद्धा या लढाईत सहभागी झाले असून अहोरात्र सेवा देत आहेत. कोविड-19 वैद्यकिय साहित्य …

Read More »

सामाजिक अंतर राखताना ऐक्याला तडा जाऊ देऊ नका

जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन अलिबाग : प्रतिनिधीकोरोनाशी लढण्यासाठी सामाजिक अंतर राखा, परंतु हे करीत असताना सामाजिक ऐक्याला तडा जाऊ देऊ नका. जे लोक परजिल्ह्याच्या वेशी ओलांडून आपल्या गावी आले आहेत त्यांच्याशी माणुसकीने वागा.  कायदा हातात घेऊ नका, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगडकरांना केले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीबाबत …

Read More »

कामगारांना परत पाठवण्यापेक्षा त्यांच्या हाताला काम द्या -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तकुशल आणि अकुशल कामगारांना महाराष्ट्रातून त्यांच्या राज्यात परत पाठवण्यापेक्षा त्यांना महाराष्ट्रातच काम उपलब्ध करून दिल्यास राज्याचा महसूल वाढेल, असे मत भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.राज्यातील वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये या कुशल वा अकुशल कामगारांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे …

Read More »

आता म्हावराही मिळणार एका क्लिकवर!

कोरोनाच्या संकटातून मच्छीमारांना सावरण्यासाठी अ‍ॅपची निर्मिती पाली : प्रतिनिधीआधुनिकतेच्या काळात शहरांप्रमाणेच कोळीवाडेही स्मार्ट करण्याच्या उद्देशाने अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’चे शास्त्रज्ञ प्रणित पाटील बोंबील ऑन डिमांड प्लॅटफॉर्म अ‍ॅपची निर्मिती केली आहे. या अ‍ॅपद्वारे ताजी, स्वच्छ आणि स्वस्त मासळी एका क्लिवर घरपोच मिळणार आहे. यात मच्छीमारांसाठी नोंदणी मोफत असून कोरोनाच्या संकटातून …

Read More »

पनवेलमधील दोन डॉक्टर, एका सफाई कामगाराला कोरोना

पनवेल : तालुक्यातील कामोठे येथील महिला डॉक्टर व सफाई कामगार तसेच उलवे येथील एका डॉक्टरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. तिन्ही रुग्ण हॉस्पिटलमध्ये काम करणारे आहेत. या नव्या रुग्णांमुळे कोरोनाग्रस्तांची पनवेल महापालिका क्षेत्रातील संख्या 42, तालुक्यातील 49, तर रायगड जिल्ह्यातील 61 झाली आहे. कामोठ्यातील सेक्टर 36 येथील महिला मुंबईतील राजावाडी …

Read More »

रानडुकराच्या हल्ल्यात तिघे जखमी

पोलादपूरच्या दिविल येथील घटना पोलादपूर : प्रतिनिधीतालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रानडुकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून दिविल गावातील एक कुटुंब रानात लाकूडफाटा गोळा करायला गेले असता एका रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना गुरुवारी (दि. 23) सकाळी घडली. या हल्ल्यात आई, मुलगा व दीर असे तिघे जखमी झाले आहेत.दिवील येथील नामदेव भिल्लारे, …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना महापालिकेमार्फत धान्य-जेवणाचे पाकीट पुरवा

सभागृह नेते परेश ठाकूर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना महापालिकेमार्फत धान्य-जेवणाचे पाकिट पुरविण्यात यावेत, अशी मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी लेखी निवेदन दिले. या वेळी भाजपचे शहर सरचिटणीस नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अनिल भगत उपस्थित होते. …

Read More »

आणखी काही व्यवहारांना केंद्राची सूट

मोबाइल प्रीपेड रिचार्ज, पंखे, पुस्तकांची दुकाने सुरू राहणार नवी दिल्ली ः वृृत्तसंस्थाकोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सरकारने आणखी काही व्यवहारांना सूट दिली आहे. सर्व प्रथम म्हणजे ज्या घरात ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या बँकेतील खात्यांचे काम करणारे आणि देखभालीसाठी आवश्यक असलेल्या सेवांना सरकारने सूट दिली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या …

Read More »

चिरनेर-खारपाडा रोडवरील आग विझवण्यात यश

वणवे लावल्याने वन्य जीवांचे अस्तित्व धोक्यात उरण : प्रतिनिधी उरण, पनवेल, पेण तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या जंगलाना बेसुमारपणे वणवे लावण्याचा प्रताप वर्षानुवर्षे सुरूच आहे. असाच प्रताप उरण तालुक्यातील चिरनेर-खारपाडा रस्त्यावरील तलाखराच्या घाटातील पूर्वेच्या डोंगरांला वणवा लावण्यात आला होता. मात्र ही खबर वनविभागाला मिळताच वनरक्षक सन्नी ढोले आणि वन्यजीव …

Read More »