* कोरोना विषाणूचा संसर्ग प्रतिबंधित करण्यासाठी शेतीतील कामे करताना स्वच्छता व सुरक्षिततेच्या खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करावे. * शेतीतील सर्व कामे करताना शेतकर्यांनी, शेतमजुरांनी तोंडाला मास्क लावावे तसेच एकमेकांमध्ये चार ते सहा फुट अंतर राहील याची दक्षता घ्यावी. ठराविक वेळाने साबणाने हात स्वच्छ धुवावेत. * जेवताना विश्रांती घेताना, शेतमाल गाडीत चढवत …
Read More »Monthly Archives: April 2020
हॅलो! आपण आम्हाला मदत कराल का?
पनवेल : प्रतिनिधी हॅलो, आपण आम्हाला मदत कराल का? संचारबंदीमुळे घरातील धान्य संपले आहे. आमची उपासमार होत आहे. आपण काही मदत कराल का? फोनवरुन एक महिला पनवेलचे मंडल अधिकारी रोडे यांना विचारत होती. त्यांनी तिची माहिती घेऊन तिला मदत मिळवून दिल्यावर तिने फोन करून त्यांचे खास आभार मानले. पनवेलचे मंडल …
Read More »टाळेबंदीत पशुधनाची घेतली जातेय काळजी!
अलिबाग ः प्रतिनिधी टाळेबंदीच्या काळात रायगड जिल्ह्यातील पशुधनाची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे. पशुपालकांचा व्यवसाय पूर्ववत राहावा यासाठी सुविधा दिल्या जात आहेत. प्राण्यांसाठी चारापाण्याची व्यवस्थाही सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. जिल्ह्यात सुमारे एक हजार 300 पशुपालकांना दूध, मटण, अंडी, जनावरांचे खाद्य, वैरण आदी वाहतुकीसाठी सुविधी देण्यात आल्या आहेत. काही …
Read More »द्रोणागिरी बाजारात येणार्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे -संचालक
उरण : वार्ताहर उरण तालुका ग्राहक सहकारी संस्था यांचे द्रोणागिरी बाजार हे गेली 27 वर्षे उरण तालुक्यातील सर्व नागरिकांना रास्त भावात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहे. या बाजाराचा लाभ मोठ्या संख्येने ग्राहक घेत आहेत. या बाजाराच्या पूर्वीच्या वेळा सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत व सायंकाळी 4 ते रात्री 8 …
Read More »शैक्षणिक संस्थांना करावा लागणार अडचणींचा सामना
अलिबाग ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटामुळे केंद्र सरकारने लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्यात आलेला आहे. या कालावधीत शैक्षणिक संस्था पूर्णपणे बंद ठेवाव्या लागणार आहेत. त्यामुळे त्यांना शैक्षणिक वर्षाची पूर्वतयारी इतर प्रशासकीय कामे करताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कोरोनामुळे देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आली होते. त्यामुळे राज्यातील नववीपर्यंतच्या परीक्षा रद्द …
Read More »खोपोली पोलीस ‘इन अॅक्शन’
लॉकडाऊनच्या दुसर्या टप्प्यात आक्रमक पवित्रा; विनाकारण फिरणार्यांवर कडक कारवाई खोपोली ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसर्या टप्प्यातील लॉकडाऊन व संचारबंदी सुरू आहे. यासाठी नवीन निर्देश जारी करण्यात आले आहेत. तरीही काही नागरिक घरात बसत नसल्याने खोपोली पोलीस आक्रमक होत अॅक्शनमध्ये आले आहेत. कोणत्याही स्थितीत सोशल डिस्टन्सिंग व लॉकडाऊनचे पालन करावेच लागेल. …
Read More »दिलासादायक कामगिरी
गेल्या 24 तासांत देशात आजवर नोंदल्या गेलेल्या कोरोनाच्या एकूण केसेसची संख्या 12 हजार 759 इतकी झाली आहे. पाश्चिमात्य देशांपैकी अनेक देशांमध्ये 12 हजारांहून अधिक केसेसचा हा टप्पा भारताच्या तुलनेत खूपच कमी काळात गाठला गेला होता. फक्त कॅनडा या एकमेव देशाने भारताइतक्याच प्रभावीपणे या साथीचा फैलाव थोपवून धरल्याचे दिसते. भारताने कोरोनाचा …
Read More »कोरोनाविरोधात प्राथमिक आरोग्य केंद्र सतर्क; औषधसाठा सज्ज
रेवदंडा ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यात रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्राची कोरोनाच्या संकटकाळात सतर्क सेवा सुरू असून रुग्णसेवेसह कोरोनाविषयक सर्वेक्षण, जनजागृती व आरोग्यसेवा यांचे मार्गदर्शन दिले जात आहे. रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात वावे, बामणगाव, खानाव, आग्राव, चिंचोटी, रामराज व नागाव हे सात उपकेंद्र आणि 16 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. डॉ. विजय वाघमोडे व …
Read More »श्रीवर्धन तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित; नागरिकांना मनस्ताप
श्रीवर्धन ः प्रतिनिधी श्रीवर्धन तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अर्ध्या ते एक तासानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येतो. दिवसा तसेच रात्रीच्या वेळीही वीजपुरवठा खंडित होत असल्याने लॉकडाऊनमुळे घरात बसलेल्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांना घरात बसणे अशक्य होत आहे. मागील पाच …
Read More »गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त
मुरूड ः प्रतिनिधी येथील गारमबी व नागशेत येथील जंगल भागात पारगाण येथे राहणार्या व्यक्तीने गावठी दारू बनविण्याचा अड्डा निर्माण करून दारू काढण्याचे काम करीत होता. याबाबतची खबर मुरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांना मिळताच त्यांनी एक पथक तयार करून गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला. मुरूड पोलिसांना पारगाण …
Read More »