रेवदंडा ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊन काळात बंदोबस्त व गस्तीसाठी शाळाशाळांतील आरएसपी शिक्षकसुध्दा पोलिसांसह रस्तोरस्ती ऑन ड्युटी दिसत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार आरएसपी शिक्षकही देशासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावत नाका, चेक पोस्टवर कर्तव्य बजावत आहेत. रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत रायगड जिल्हा आरएसपी सल्लागार दीपक मोकल, रायगड जिल्हा …
Read More »Monthly Archives: April 2020
‘मोहोपाडा बाजारपेठ दुपारपर्यंतच खुली राहणार’
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी परीसराची मुख्य बाजारपेठ असणार्या मोहोपाडा येथे रसायनी पाताळगंगा व आसपासच्या परिसरातील नागरिक येत असतात. कोरोना पार्श्वभूमीवर वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत व व्यापारी असोसिएशन यांच्यात संगनमत होवून मोहोपाडा नवीन पोसरी बाजारपेठ लॉकडाऊन काळात सध्या तीन मेपर्यंत सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत खुली ठेवण्याचे ठरले असल्याचे सरपंच ताई …
Read More »शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांकडून सुटीचा सदुपयोग
पेण ः प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्याने अनेकांना घराबाहेर जाता येत नाही. या फावल्या वेळेचा सदुपयोग म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी व शहरातील पगारदार वर्ग तसेच गृहिणी विविध कामांत व्यस्त असल्याचे एकंदरीत चित्र दिसून येत आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्वत्र लॉकडाऊन जारी …
Read More »‘स्वप्नपूर्ती’च्या यशस्वी अर्जदारांची यादी जाहीर
पनवेल : बातमीदार सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांतील यशस्वी अर्जदारांची यादी व भूखंडांच्या ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रियेअंतर्गत यशस्वी ठरलेल्या बोलीधारकांना वाटपपत्रे सिडकोने ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहेत. स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेअंतर्गत शिल्लक असलेल्या खारघर येथील 810 घरांसाठी योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेची सोडत 26 नोव्हेंबर 2019 रोजी काढण्यात आली. यातील …
Read More »पिंपळपाडा येथील इसम बेपत्ता
पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील पिंपळपाडा येथील लिंगप्पा मनोहर वाघमारे (55) (मूळ रा. अक्कलकोट) हे 17 एप्रिल रोजी सकाळी 6.30 वाजल्यापासून पिंपळपाडा येथील मालकाच्या घरातून कोणास न सांगता निघून गेले आहेत. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या इसमाची उंची चार फूट तीन इंच, बांधा मध्यम, …
Read More »पनवेल पोलिसांच्या आरोग्याची विशेष काळजी
पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर गेल्या दिड महिन्यापेक्षा जास्त काळ पोलीस वर्ग 24 तास रस्त्यावर आहे. त्यांच्या आरोग्याची तसेच त्यांच्या कुटुंबियांची काळजी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार हे घेतच आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी त्यांच्या पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांच्या …
Read More »नगरसेवक विक्रांत पाटील यांनी करून घेतली पनवेल सेक्टर 6 परिसरात औषध फवारणी
पनवेल : वार्ताहर सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर सर्वत्र स्वच्छता मोहिम सुरू आहे. औषध फवारणी सुरू आहे व विशेष काळजी घेतली जात आहे. असे असतानाही नवीन पनेवल सेक्टर 6 परिसरात दोन दिवसापूर्वी कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याची माहिती माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांना मिळताच त्यांनी तातडीने त्या परिसरात …
Read More »पेणमध्ये जमावबंदी, वाहनबंदीचे उल्लंघन करणार्यांवर गुन्हे दाखल
पेण : प्रतिनिधी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता जिल्हाधिकार्यांनी जमावबंदी व वाहनबंदीचे आदेश दिले आहेत, मात्र तरीसुद्धा पेण व वडखळ परिसरात अनेक दुकानदारांनी दुकानात नागरिकांची गर्दी जमवून तसेच वाहनचालकांनी वाहन चालवून शासकीय आदेशाचा भंग केल्याप्रकरणी संबंधित दुकानदारांवर व वाहनचालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, …
Read More »‘नैना’च्या डिजिटल सभेस शेतकर्यांचा विरोध
प्रकल्प परियोजना 6च्या मंजुरीसाठी सिडकोची धडपड पनवेल : बातमीदार सिडकोच्या नैना प्रकल्पातील नगररचना परियोजना टप्पा 6 योजनेला मंजुरी मिळविण्यासाठी सिडकोची धडपड सुरू आहे. जमीन मालकांना ही योजना समजावून सांगण्यासाठी सिडकोने डिजिटल सभा आयोजित करण्याचा निर्णयही घेतला. या निर्णयाला शेतकर्यांनी विरोध केला असून ही सभा बेकायदा असल्याचा आरोप शेतकर्यांच्या संघटनांनी केला …
Read More »हुतात्मा हिराजी पाटील सभागृहासाठी 35 लाखांचा निधी
कर्जत ः बातमीदार नेरळजवळ धामोते-बोपेले हद्दीत हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक भवन असून या सभागृहाचे पहिल्या मजल्याचे बांधकाम करण्यासाठी आणि बांधकाम केलेल्या सभागृहाचे सुशोभीकरण करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने 35 लाखांचा निधी दिला आहे. 35 लाख रुपये खर्चाच्या कामाचे कार्यादेश रायगड जिल्हा परिषदेच्या नेरळ विकास संकुल प्राधिकरणाने दिले आहेत. कर्जत तालुक्यातील मानिवली …
Read More »