Breaking News

Monthly Archives: May 2020

माणगावात वादळी पावसाचा धुमाकूळ

माणगाव : मोसमी वादळी पावसाने तालुक्यात रविवारी सायंकाळी अर्ध्या तासात धुमाकूळ घालून प्रचंड नुकसान केले. दरम्यान, परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. (छाया : सलीम शेख)

Read More »

आजपासून धावणार 200 विशेष ट्रेन्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आजपासून, अर्थात 1 जून 2020 पासून रेल्वे 200 विशेष गाड्या सुरू करत आहे. अनलॉक -1 च्या दिशेने जाण्याच्या दृष्टीने ही एक अतिशय महत्त्वाची पायरी मानली जात आहे. या ट्रेन श्रमिक विशेष ट्रेनपेक्षा वेगळ्या असतील. या ट्रेनची तिकिटे भारतीय रेल्वे केटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनची (आयआरसीटीसी) वेबसाइट, मोबाइल …

Read More »

महाराष्ट्र, गुजरातला वादळाचा धोका?

कोलकाता : वृत्तसंस्था येत्या 3 जून या दिवशी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांच्या किनारपट्टीवर वादळ धडक देण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. अरबी समुद्रामध्ये पुढील 48 तासांमध्ये कमी दाबाच्या पट्टा तयार होणार असल्याने दोन्ही राज्यांच्या किनारपट्टी भागांमध्ये 3 जूनपर्यंत वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. अम्फान या महाचक्रीवादळाने ओडिशा …

Read More »

महाराष्ट्र पोलीस दलाला कोरोनाचा विळखा

एका दिवसात 91 पोलिसांना लागण मुंबई : प्रतिनिधी राज्यात करोनाचा कहर वाढत असताना पोलीस दलातील अधिकारी, कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण दिवसेगणिक वाढतच आहेत. मागील चोवीस तासात 91 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. शनिवारपर्यंत कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 2416पर्यंत पोहचला आहे. तर, आत्तापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधित पोलिसांमध्ये …

Read More »

जसखार गावात रक्तदान शिबिर उत्साहात

उरण : वार्ताहर कोरोनाच्या संकट काळात तसेच लॉकडाऊनमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा सर्वत्र भासत आहे. अशा वेळेस सामजिक बांधिलकी म्हणून उरण तालुक्यातील जसखार येथील आर्यन कला, क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक संस्था वतीने शनिवारी (दि. 30) जसखार येथील रत्नेश्वरी देवीच्या मंदिरातील सभागृहात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सोशल डिस्टन्सिंग …

Read More »

नवी मुंबईत 94 जणांना कोरोना; तिघांचा मृत्यू

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत रविवारी  94 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले तर 98 जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले. तीन जणांचा मृत्यू झाला असून बरे होऊन परतलेल्यांची एकूण संख्या एक हजार 346 झाली आहे. तर एकूण दोन हजार 204 व्यक्ती पॉझिटिव्ह आहेत. रविवारी बधितांची विभागवार आकडेवारी पाहिल्यास बेलापूर …

Read More »

पनवेलमध्ये कोरोनाचे 40 नवीन रूग्ण

सहा महिन्यांच्या चिमुकलीचाही समावेश पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 31)  कोरोनाचे 40 नवीन रुग्ण सापडले असून 19 जणांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका क्षेत्रात 30 नवीन रुग्ण सापडले आहेत. यामध्ये कामोठे नऊ कळंबोली आठ, खारघर सात आणि पनवेल दोन, नवीन पनवेल तीन आणि खांदा कॉलनी मधील एका नवीन …

Read More »

नेरूळ येथील गृृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बसवले फूट स्टेपिंग सॅनिटायझर्स

नवी मुंबई : बातमीदार सेकटर 16 व 16 ए, 18 येथे जंतुनाशक फवारणी स्वखर्चाने करतानाच  गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये  फूट स्टेपिंग सॅनिटायर्झसचे वितरण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते गणेश भगत, भाजपच्या माजी नगरसेविका रूपाली भगत, भाजपचे नेरूळ तालुका अध्यक्ष राजू तिकोणे व समाजसेविका उल्का तिकोणे यांच्या माध्यमातून दोन प्रभागातील रहीवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा लोकोपयोगी …

Read More »

आठवड्यातून दोन दिवस कपड्यांची दुकाने उघडण्यात यावीत

पनवेलमधील कापड व्यापार्‍यांची मागणी पनवेल : वार्ताहर पनवेलमधील कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या 400 झाली असताना व पनवेल विभाग रेडझोनमध्ये असून लॉकडाऊन काळामध्ये सुद्धा काही गारमेंटचे दुकान सुरू असताना पनवेलमधील कापडगल्ली येथे काहीसाडी दुकानांमध्ये गर्दी होत असून सोशियल डिस्टन्सिंगचे पालन न करता दुकान मालक व कामगार नियमांचे उल्लंघन करत आहेत, त्यामुळे …

Read More »

चिरनेर-कोप्रोली रस्त्यावर जलवाहिनी फुटली

उरण : प्रतिनिधी उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाण्यासाठी पायपीट करावी लागत असताना उरण तालुक्यातील चिरनेर-कोप्रोली रस्त्यावरील कोप्रोली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्त्याच्या डाव्या बाजूला हेटवणे नळपाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनीतून कोप्रोली व खोपटे या दोन गावांसाठी पाणी पुरवठा करण्यासाठी दिलेली जोडणी जलवाहिनी फुटली असून, त्यामुळे या जलवाहिनीतून भर रस्त्यावर पाण्याचा उंच फवारा उडत आहे. …

Read More »