Breaking News

Monthly Archives: May 2020

रायगडात 42 रुग्ण वाढले

पनवेल : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 30) कोरोनाच्या 42 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक 33 रुग्ण पनवेल तालुक्यातील आहेत. याशिवाय अलिबाग चार, माणगाव दोन, तर उरण, खालापूर व रोहा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. पनवेल तालुक्यात महापालिका हद्दीत 23 आणि ग्रामीण भागात 10 रुग्ण आढळले …

Read More »

जिल्हा रुग्णालयातील दोन आरोग्यसेवकांना कोरोनाची लागण

अलिबाग : प्रतिनिधी – अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात काम करणार्‍या दोन आरोग्यसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांना आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या जिल्ह्यातील कोविड योद्ध्यांची संख्या सहा झाली आहे. जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना आयसोलेशन वॉर्डात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. सद्यस्थितीत अलिबागमध्ये 50च्या …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून तळोजा मजकूरमध्ये पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 30) तळोजा मजकूर गावाला भेट दिली व पाहणी केली. गेल्या पावसाळ्यात तळोजा मजकूर गावात पुराचे पाणी येऊन अनेक कुटुंबांचे नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर हा पाहणी दौरा होता. पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने तळोजा मजकूर गावाला पुराला …

Read More »

रायगडातील महाआघाडीत यादवी

खासदार तटकरे आणि माजी आमदार जगतापांमध्ये जुंपली महाड : प्रतिनिधी – सध्या सर्व जण कोरोनाविरुद्ध लढा देत असताना रायगड जिल्ह्यात मात्र महाविकास आघाडीतील दोन नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांनी खासदार सुनील तटकरे यांचा कार्य अहवाल धादांत खोटा असल्याचा आरोप केला होता. त्यावर गेली 36 वर्षांच्या …

Read More »

माणसांमध्ये अंतर राखा, माणुसकीमध्ये नको!

सुरुवातीच्या काळात शहरी भागापुरते मर्यादित असलेले कोरोनाचे संक्रमण एव्हाना गाव-खेड्यांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. मुंबईपासून जवळ असणार्‍या रायगड जिल्ह्यामध्ये विशेषकरून पनवेल परिसरात कोविड-19चा सर्वाधिक प्रादुर्भाव होता व आजही आहे, पण आता जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झालेला दिसून येतो. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 15 तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे.कोरोनाने रायगड जिल्ह्याला …

Read More »

पनवेलमध्ये 2223 शेतकर्यांना बियाणे, खत वाटप

खारघर : प्रतिनिधी पावसाळा तोंडावर आला आहे. त्यादृष्टीने पावसाळापुर्वी शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. यावर्षी कोविड 19 च्या धोक्यामुळे मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे.कृषी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी यावर्षी कृषी विभागाला शेतकर्‍यांना बांधावर बियाणे व खते उपलब्ध करून देण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. या अंतर्गत पनवेल तालुक्यात सुमारे 70 …

Read More »

नवी मुंबईत 114 जणांना कोरोना; सात मृत्युमुखी

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत शनिवारी (दि. 30) एकाच दिवशी 114 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. शुक्रवारी एकाच दिवसात 277 बरे झालेल्या व्यक्तींमुळे दिलासा मिळाला होता, या दिलासादायक बाबीवर देखील विरजण पडले आहे. दररोजचा आकडा वाढत असताना नवी मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब ठरली होती. त्यात शनिवारी अधिक भर …

Read More »

उरणमध्ये होमिओेपॅथिक गोळ्यांचे वाटप

उरण : वार्ताहर उरण मधील डॉ. अरबाज नवाबुल्लाह पठाण यांनी पंचक्रोशीत अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे नुकतेच शासनाच्या नियमांचे पालन करून सोशल डिस्टन्सिंग ठेऊन मोफत गोळ्यांचे वाटप केले. ह्याचा एक हजार पाचशे जास्त व्यक्तींनी याचा लाभ घेतला. आयुष मंत्रालय यांच्या शिफारशीनुसार अर्सेनिक अल्बम 30 या  होमिओेपॅथिक गोळ्यांचा डोस रोगप्रतिकारशक्ती …

Read More »

रायगडातील मिनिडोअर रिक्षाचालकांना राज्य शासनाने आर्थिक मदत करावी

आमदार रविशेठ पाटील यांची मागणी पेण : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. अनेकांना आर्थिक चणचण भासू लागली आहे. अशा परिस्थिती रिक्षा चालकांवर देखील संकट आल्े असल्याने रायगड जिल्ह्यातील मिनिडोअर-रिक्षा चालक, मालक यांना राज्य शासनाची मदत मिळावी, अशी मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी केली आहे. …

Read More »

मुलीकडून आईविरोधात मारहाणीची तक्रार

पनवेल : बातमीदार – सानपाडा सेक्टर 19 परिसरातील एका 11 वर्षीय मुलीने आपल्या आईविरोधातच मारहाणीची तक्रार केल्यानंतर सानपाडा पोलिसांनी या महिलेविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील 11 वर्षीय मुलगी ही आई, वडील व लहान बहिणीसह राहते. आई विनाकारण मारहाण करत असल्याची तक्रार तिने सानपाडा पोलिसांकडे केली आहे. टीव्ही …

Read More »