पनवेल ः रामप्रहर वृत्त कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना तन-मन-धनाने मदत करणारे रायगडचे माजी खासदार, दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा बुधवारी (दि. 14) सायंकाळी 5 वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील राजभवन येथे कोरोना देवदूत पुरस्काराने सन्मान होणार आहे. दै. शिवनेरच्या वतीने होणार्या या समारंभाला माजी गृहराज्यमंत्री …
Read More »Monthly Archives: October 2020
नवीन पनवेल येथील गटारांची कामे सुरू
नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांच्या मागणीला यश पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील सेक्टर-12, 13, 14, 15 बांटिया शाळा दत्त मंदिर ते कालिमाता मंदिर या ठिकाणी नवीन मोठी गटारे बांधण्याची कामांना सुरुवात करण्यात आली आहे. भाजप नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे (प्रभाग क्र.17‘क’) यांनी यासंदर्भात सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांकडे मागणी केली …
Read More »नवी मुंबईत आयसीयू बेडची संख्या वाढणार
आमदार गणेश नाईक यांच्या मागण्या मान्य नवी मुंबई : बातमीदार इमारत सुरक्षित रहावी यासाठी त्यावर बांधण्यात आलेल्या वेदरशेड आता नियमित होणार आहेत. त्याच बरोबर हिवाळ्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका पाहता आयसीसीयु बेडची संख्या वाढविण्यात येणार आहे. आमदार गणेश नाईक यांनी सोमवारी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली कोरोना प्रतिबंधात्मक …
Read More »कोरोनामुळे एनएमएमटी तोट्यात
पनवेल : बातमीदार नवी मुंबई पालिकेची परिवहन सेवा तोट्यात असून पालिकेच्या उत्पन्नावर सुरू आहे. दरम्यान करोना प्रादुर्भावानंतर टाळेबंदीत ही बससेवाही बंद असल्याने परिवहनचे उत्पन्न ठप्प झाले होते. त्यानंतर शिथिलीकरणानंतर हळूहळू ही बससेवा सुरू झाली असून लोकल बंद असल्याने प्रवासी बस प्रवासाला प्राधान्य देत आहेत. एनएमएमटीच्या 480 बसपैकी 325 बस सध्या …
Read More »किती सोसायचे?
संकट केव्हाही येऊ शकते, त्याचे स्वरूप आपल्या कल्पनेपलीकडचे असू शकते हा धडा तर आपल्यापैकी प्रत्येकाला कोरोना महामारीच्या रूपात मिळाला आहे. आपापल्या जगण्याच्या परिघात हा धडा ध्यानात ठेवूनच इथून पुढे मार्गक्रमणा करण्याची खूणगाठ आपण मनात बांधली आहे. त्यामुळेच कुठल्याही गोष्टीत पाऊल टाकतानाच संभाव्य आणि कल्पनेपलीकडल्या धोक्यांचा विचार आपल्यातील शहाणे लोक तरी …
Read More »रायगड जिल्ह्यात 10 रुग्णांचा मृत्यू ; 207 नवे पॉझिटिव्ह
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 10 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 207 नव्या रुग्णांची नोंद सोमवारी (दि. 12) झाली, तर दिवसभरात 308 रुग्ण बरे झाले आहेत. मयत झालेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा सात व ग्रामीण 1) तालुक्यातील आठ आणि उरण व कर्जत तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल …
Read More »पेणमध्ये भरदिवसा घरफोडी
पेण : प्रतिनिधी शहरातील कुंभारआळी येथील बंद फ्लॅट दिवसाढवळ्या फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे बारा लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. महिला फिर्यादी (रा. स्पर्श बिल्डींग, दुसरा मजला, कुंभार आळी, पेण) यांच्या बंद फ्लॅटचा लॉक शुक्रवारी (दि. 9) सकाळी 11:30 च्या सुमारास अज्ञात चोरट्याने तोडून आतमध्ये प्रवेश केला. व बेडरूममधील …
Read More »म्हसळ्यात अल्पवयीन मुलीशी छेडछाड ; आरोपीस अटक
म्हसळा : प्रतिनिधी एमएससीआयटीच्या क्लासला गेलेल्या एका मुलीची छेड काढून लगट करण्याचा प्रकार म्हसळा पोलिसांनी हाणून पाडला. या प्रकरणी नराधमास अटक करण्यात आली आहे. म्हसळा शहरात एमएससीआयटीच्या क्लाससाठी देवघर कोंड येथील सुमारे 17 वर्षांची एक विद्यार्थिनी आली होती. क्लास बंद असल्याने ती दिघी नाक्यावर थांबली असता, तेथे असणार्या 32 वर्षीय …
Read More »शेलू स्टेशनला एकही लोकल थांबत नाही; प्रवाशांची परवड
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील शेलू स्थानकात सध्या सुरू करण्यात आलेली एकही लोकल थांबत नाही. यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या 23 उपनगरीय लोकल गाड्या आणि 10 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आलेल्या विशेष गाड्या यांना मुंबई सीएसएमटीपासून कर्जतपर्यंत फक्त शेलू स्थानकात थांबा नाही. तसे पत्रक मध्य रेल्वे प्रशासनाकडून काढण्यात आले आहे. …
Read More »भाजप महिला मोर्चाचे आंदोलन; सुधागड तहसीलदारांना निवेदन
पाली : रामप्रहर वृत्त महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. असा आरोप करून राज्य सरकारने महिला सुरक्षेसाठी कडक कायदे करण्याची मागणी करीत सुधागड भाजप महिला मोर्चातर्फे तहसील कार्यालयासमोर सोमवारी (दि. 12) आंदोलन करण्यात आले. या वेळी तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार वैशाली …
Read More »