पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा जोर दिवसेंदिवसत ओसरत असून, गुरुवारी (दि. 15) नव्या 230 रुग्णांची आणि सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 376 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 140 व ग्रामीण 38) तालुक्यातील 178, रोहा 11, उरण व अलिबाग प्रत्येकी आठ, खालापूर …
Read More »Monthly Archives: October 2020
महापौर, सभागृह नेत्यांकडून कोविड रुग्णालयांची पाहणी
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अधिकार्यांनी गुरुवारी (दि. 15) महापालिका हद्दीतील कोविड रुग्णालयांचा संयुक्त पाहणी दौरा केला. या दौर्यात त्यांनी एमजीएम हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय, देवांशी इन व टियारा हॉल या कोविड सेंटर्सची पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी या सेंटर्समध्ये पुरवल्या …
Read More »रायगडास परतीच्या पावसाचा तडाखा
अलिबाग ः प्रतिनिधी मागील कित्येक वर्षांत परतीच्या पावसाने जेवढा धुमाकूळ घातला नव्हता तो यंदाच्या पावसाने घातला आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट करीत बरसलेल्या पावसाने बुधवारी मध्यरात्रीपासून रायगडात कहर केला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. बंगालच्या उप महासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला व त्याची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली. 10 ऑक्टोबरपासून राज्यात …
Read More »‘आरे’चा निर्णय अंगाशी आल्यानेच ‘जलयुक्त’ची चौकशी; भाजपचा आरोप
कोल्हापूर ः प्रतिनिधी एखाद्या गावात भ्रष्टाचार झाला असेल तर संपूर्ण जलयुक्त शिवार योजनेतच गैरव्यवहार झाल्याचा महाविकास आघाडी सरकारचा आरोप हास्यास्पद असल्याचा टोला मारतानाच खुशाल चौकशी करा, तुम्हाला अडवतंय कोण, असे आव्हानच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (दि. 15) पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारला दिले. राजकीय सूडभावनेने घेण्यात आलेल्या अशा …
Read More »स्वराज्य सोशियल वेल्फेअर ऑर्गनायझेशनकडून नांदगाव शाळेस मदत
कर्जत : बातमीदार निसर्ग चक्रीवादळात कर्जत तालुक्यातील अनेक शाळांच्या इमारती क्षतीग्रस्त झाल्या होत्या. छतांचे पत्रे आणि कौल उडून नुकसान झाले होते. शासकीय मदत मिळण्यास उशीर होत असल्याने तालुक्यातील दुर्गम भागातील काही शाळांची दुरुस्ती करण्यास सेवाभावी संस्था धावून आल्याने या शाळांच्या इमारती नव्याने उभ्या राहिल्या आहेत. कर्जत तालुक्यातील नांदगाव येथील मराठी …
Read More »शेतकर्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी; भाजप किसान मोर्चाची मागणी
कर्जत ः बातमीदार परतीच्या पावसाने कर्जत तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतीची 100 टक्के नासाडी झाली असून या नुकसानीचे शासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकर्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी गुरुवारी (दि. 15) भाजप किसान मोर्चाच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अवकाळी आणि वादळी पावसामुळे कर्जत तालुक्यातील सर्व …
Read More »मुरूडच्या गिर्यारोहकांनी केला वानरटोक सुळका सर
मुरूड : प्रतिनिधी गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणारा अलिबाग जवळील वानरटोक सुळका मुरूड शेगवाडा येथील अतुल मोरे, विशाल मोरे व तोषित नायडू या गिर्यारोहकांनी अवघ्या 40 मिनिटात सर केला. आणि या सुळक्यावर तिरंगा फडकवला. अलिबागपासून हाकेच्या अंतरावरावर सागरगड उर्फे खेडदुर्ग हा किल्ला आहे. या गडाच्या दक्षिणेला असलेला वानरटोक नामक सुळका दुर्ग …
Read More »वाहन चालवताना मोबाइलवर बोलू नका, अन्यथा कारवाई -पोलीस निरीक्षक रामदास इंगवले
माणगाव : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याचे नुतन पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी वाहतूक व्यवस्थेबाबत काही कडक निर्बंध आखले आहेत. पोलीस अधीक्षकांनी वाहतूक व्यवस्था विना अपघात सुरळितपणे सुरू ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार आता माणगावात दुचाकी स्वारांनी हेल्मेट वापरणे सक्तीचे आहे. तसेच वाहन चलविताना मोबाईलवर बोलणे टाळा, असे आवाहन माणगावचे …
Read More »देवदूतांच्या कार्यामुळे सर्वसामान्यांना आधार; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सन्मान
मुंबई ः हरेश साठे कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, संस्थांनी देवदूताप्रमाणे अतुलनीय कार्य केले. या कौतुकास्पद कार्याची प्रशंसा करू तेवढी कमीच असून कोरोनाच्या कष्टकाळात देवदूतांनी केलेल्या कार्यामुळे सर्वसामान्यांना कोरोनावर मात करण्याची ताकद आणि आधार मिळाला, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी (दि. 14) राजभवन येथे …
Read More »जिते येथे ट्रकची रिक्षाला धडक; तीन प्रवासी जखमी
पेण : प्रतिनिधी मुंबई- गोवा महामार्गावरील जिते (ता. पेण) गावच्या हद्दीत एका ट्रकने रिक्षेला पाठिमागून ठोकर दिली. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातात रिक्षेमधील प्रवासी जखमी झाले. फिर्यादी (रा. बारपाडा, ता. पनवेल) हे त्यांच्या ताब्यातील रिक्षे (एमएच-46, बीडी-7296) मध्ये मंगळवारी (दि. 13) रात्री प्रवाशी घेवून मुंबई -गोवा महामार्गाने पेण येथे …
Read More »