Breaking News

Monthly Archives: October 2020

फणसाड अभयारण्यात वन्यजीव सप्ताह साजरा

मुरुड : प्रतिनिधी सध्या फणसाड अभयारण्यात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत असून, त्या अनुशंघाने अभयारण्यातील वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती वन कर्मचार्‍यांना देण्यासाठी डॉ. संतोष देवरुखकर यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. या वेळी डॉ. देवरुखकर यांनी, विविध औषधी वनस्पतींची माहिती दिली. त्याचप्रमाणे कॅन्सरला दूर ठेवणार्‍या औषधी वनस्पती, तुटलेली हाडे जुळवण्यासाठी लागणार्‍या वनस्पतींची …

Read More »

गुजरातवरून विक्रीसाठी आलेला तब्बल 35 लाखांचा गुटखा जप्त

चौघांना अटक; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गुजरातमधून मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी नवी मुंबईत आला होता. मात्र, ट्रकमधून इतर दोन वाहनांमध्ये हा गुटखा भरला जात असतानाच अमली पदार्थ विरोधी पथकाने रबाळे एमआयडीसी येथे छापा टाकून कारवाई करीत 35 लाखांचा गुटखा, 14 लाख रुपये किमतीची तीन …

Read More »

बिहारमध्ये भाजपचा शंखनाद

मोदी-नितीश यांनी राजकारणाची संस्कृती बदलली -नड्डा पाटणा : प्रतिनिधी भाजपने रविवारी बिहार विधानसभा निवडणुकीचा शंखनाद केला. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी रविवारी मोक्ष नगरी गया येथील गांधी मैदानात व्हर्चुअलसोबतच अ‍ॅक्चुअल रॅलीलाही संबोधित केले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रशंसा करत त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. नड्डा …

Read More »

पनवेलमध्ये 216 नवे पॉझिटीव्ह

पाच जणांचा मृत्यू   245 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 11) कोरोनाचे 216 नवीन रुग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 245 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 184 रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 162 रुग्ण बरे …

Read More »

रोह्यात परतीच्या पावसाचे थैमान

धाटाव ः प्रतिनिधी कोरोनामुळे हातावर पोट असलेल्या शेतकरीवर्गाने आपला रोजगार गमावला. त्यातून सावरताच निसर्ग चक्रीवादळाने शेतकर्‍यांच्या फळबागा, घरे उद्ध्वस्त केल्यामुळे त्यांचे कंबरडे मोडले होते. त्यातील अनेक जण शासकीय मदतीपासून वंचित आहेत. त्यातच शनिवारी झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची वेळ आली आहे. पावसाने धुवाँधार बॅटिंग करीत संपूर्ण …

Read More »

बारशीवमध्ये आगीत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान

रेवदंडा ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील भोईघर ग्रामपंचायत हद्दीतील बारशीव येथे रात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत घराचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचा मोठा भडका उडाल्याने आजूबाजूच्या घरांनाही धोका निर्माण झाला होता. स्थानिक युवकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीचा भडका पसरत होता. येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश घाटवळ …

Read More »

पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी समाज झाला आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

पाली ः प्रतिनिधी पाली येथील 16 वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार व जातीवाचक शिवीगाळ झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली. या घटनेचे सुधागडसह जिल्ह्यातील आदिवासी कातकरी समाज बांधवांत तीव्र पडसाद उमटले आहेत. यासंदर्भात पाली पोलीस स्थानकात संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्या अनुषंगाने या गुन्ह्यातील आरोपीस लवकरात लवकर कठोर …

Read More »

सकल ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी; नेरळ येथील परिषदेत एकमत

कर्जत ः बातमीदार ओबीसीमधील सर्व 3142 जातींना दिलेले आरक्षण घटनेने मान्य केल्याने त्या आरक्षणाला धक्का लागू नये, असा ठराव नेरळ येथे झालेल्या ओबीसी परिषदेत घेण्यात आला. त्याच वेळी 2021मध्ये होणारी जनगणना ही जातीनिहाय करावी यासाठी कर्जत तालुक्यातील ओबीसी प्रवर्गातील सर्व समाजप्रमुखांनी एकमत दर्शविले आहे. नेरळ येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक …

Read More »

साल्हेर किल्ल्यावरून कोरोना योद्ध्यांना मानवंदना!

अलिबाग ः प्रतिनिधीवयाच्या तिसर्‍या वर्षीच गिर्यारोहण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव झळकावणार्‍या महाराष्ट्राच्या लाडक्या शिवकन्या शर्विका म्हात्रे हिने पुन्हा एकदा नवा इतिहास घडविला आहे. सह्याद्री पर्वतरांगांत वसलेले अनेक लहान-मोठे किल्ले गिर्यारोहकांना खुणावत असतात. त्यापैकी सह्याद्री पर्वतरांगेतील साल्हेर हा सर्वाधिक उंचीचा किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात …

Read More »

250 आदिवासी बांधवांना प्रधानमंत्री सुरक्षा विमाकवच

अलिबाग ः प्रतिनिधीअलिबाग येथील बँक ऑफ बडोदा शाखेच्या वतीने वित्तीय साक्षरता आणि वित्तीय समावेशन शिबिर नुकतेच वाडगाव आदिवासीवाडी येथे आयोजित करण्यात आले होते. या वेळी प्रधानमंत्री सुरक्षा विम्याची दोन लाखांची इन्शुरन्स पॉलिसी 250 आदिवासी बांधवांसाठी कार्यक्रमस्थळी विनाअट उघडण्यात आली.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नाबार्ड जिल्हा संचालक सुधाकर रगतवर यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमात …

Read More »