मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटना आणि मंदिरे उघडण्यास परवानगी न देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात भाजपतर्फे सोमवार (दि. 12) आणि मंगळवारी (दि. 13) राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. या वेळी आंदोलनाच्या माध्यमातून निष्क्रिय आघाडी सरकारचा निषेध करण्यात येईल. पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, प्रदेश …
Read More »Monthly Archives: October 2020
सामाजिक उपक्रमातून नवरात्र उत्सव साजरा करावा -सहायक पोलीस निरीक्षक रंगराव पवार
मुरुड : प्रतिनिधी येथील जनतेने गणपती उत्सवात मोठे सहकार्य करून पोलिसांना मदत केली होती. त्याच प्रमाणे येणारा नवरात्र उत्सव सामाजीक भान राखून समजुतदारपणे साजरा करावा, असे आवाहन मुरूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांनी येथे केले. नवरात्र उत्सव साजरा करण्याबाबत शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक तत्वाची माहिती जनतेला व्हावी, यासाठी मुरुड पोलीस …
Read More »रोहे तालुक्यात बहरली भातशेती
कापणीची लगबग सुरु; पावसाचे सावट कायम रोहे ः महादेव सरसंबे यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने रोहे तालुक्यात भातशेती बहरली आहे. बळीराजाचे पिवळे सोने तयार झाले असून, तालुक्यात काही ठिकाणी कापणीला सुरुवात झाली आहे. मात्र परतीच्या पावसाचे सावट असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. तालुक्यात यंदा काही प्रमाणात भातशेती क्षेत्र वाढले आहे. रोहे तालुक्यात …
Read More »थंडीच्या दिवसांत जपा आरोग्य
आरोग्य प्रहर थंडीच्या दिवसांत भूक वाढून पचनशक्तीही सुधारते. हवेतील बदलामुळे सर्दी-खोकलाही होऊ शकतो. एकीकडे सकाळी अंथरुणातून बाहेर पडायला जिवावर येते, तर दुसरीकडे व्यायाम करायला उत्साहही वाटतो. तापमान घसरल्यावर आपल्याला भूक लागते व काही खाल्ले की शरीरात ऊर्जा तयार होऊन आपल्याला बरे वाटते. या मोसमात आहाराबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे. थंडीत …
Read More »नागोठण्यात तुफान पर्जन्यवृष्टी; भातशेती धोक्यात
नागोठणे : प्रतिनिधी चित्रा नक्षत्रास प्रारंभ होताच शनिवारी (दि. 10) दुपारी दोन वाजल्यापासून वातावरणात अचानक बदल होऊन नागोठणे परिसरात पावसाचे विजांच्या कडकडाटासह आगमन झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. अर्धा ते पाऊण तास तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने शेतात कापणी केलेल्या भातपिकाला धोका पोहोचला असून, तयार धान्य भिजून गेले आहे. त्यामुळे हातात आलेले पीक …
Read More »प्रलंबित वेतनासाठी पेणमध्ये एसटी कामगार संघटनेचे आत्मक्लेश उपोषण
पेण : प्रतिनिधी प्रलंबित वेतन त्वरित मिळावे व एसटी कामगारांना दरमहा देय तारखेला पूर्ण वेतन देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि. 9) पेण रामवाडी येथील एसटी विभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय आत्मक्लेश उपोषण करण्यात आले. एसटी कामगारांचे प्रलंबीत तीन महिन्याचे वेतन 7 ऑक्टोंबरपर्यंत न मिळाल्यास …
Read More »तळोजा येथील वृद्धाची फसवणूक; गुन्हा दाखल
पनवेल : बातमीदार, वार्ताहर – नशा करतो असे बोलून 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या पाकिटातून चार हजार रुपये घेऊन दोन व्यक्ती पसार झाले आहेत. त्यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोजा येथील बाळू श्रीपती बडेकर हे त्यांच्या रेशन कार्डच्या कामाकरिता तहसील कार्यालय पनवेल येथे आले होते. तेथील काम …
Read More »बोनस शेअर, लाभांश आणि शेअर विभाजन
शेअर बाजारातील कंपन्या जाहीर करत असलेल्या बोनस शेअर्स, लाभांश आणि शेअर विभाजनाविषयी अनेक समज गैरसमज आहेत. या तिन्हीतील फरक आपण समजून घेऊयात. आपण सर्वच जाणतो की पारंपरिक गुंतवणुकीच्या माध्यमात व्याज हेच एक परताव्याचा मार्ग असतं (ठेवींवरील व्याज अथवा मुदतपूर्तीच्या वेळी व्याजासकट मिळणारी निश्चित रक्कम) परंतु शेअर्सच्या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर कोणताच …
Read More »मागणी वाढली- आली अर्थचक्राची गाडी पकडण्याची वेळ
कोरोना साथीच्या या अभूतपूर्व संकटात किती हानी झाली, याची आता केवळ चर्चा करण्यापेक्षा त्या चक्राला गती देण्यासाठी आपण खारीचा वाटा उचलला पाहिजे. अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी मागणीच्या बाजूकडे दुर्लक्ष करून चालत नाही. ती मागणी भारतात भरपूर आहे. ती वाढत असल्याचे ताजी आकडेवारी सांगते आहे. वाढत्या मागणीचा अर्थ शेअर बाजार आणि गुंतवणूकदार …
Read More »घोटाळ्याचा फुसका बार
मुंबई पोलिसांना आणि राज्यातील आघाडी सरकारला कायम धारेवर धरणार्या एका इंग्रजी वाहिनीवर टीआरपी घोटाळ्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर दोन मराठी मनोरंजन वाहिन्यादेखील या प्रकरणात अडकल्याचे सांगण्यात येत आहे. टीआरपीचा हा तथाकथित घोटाळा हास्यास्पद मानून सोडून द्यायचा की याला सुडाचे राजकारण म्हणायचे हे यथावकाश स्पष्ट होईलच. जगातील सर्व समस्या संपल्याप्रमाणे …
Read More »