मुंबई ः प्रतिनिधी राज्यात सलग दुसर्या दिवशी रविवारीही (दि. 11) परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या गडगडाटांसह बरसलेल्या पावसाने अनेक जिल्ह्यांत शेतीकामांना ब्रेक लावला, तर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत रविवारी पाऊस बरसला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस अशीच परिस्थिती …
Read More »Monthly Archives: October 2020
ग्रामीण भारताचे रूपडे पालटणार; केंद्राची महत्त्वाकांक्षी स्वामित्व योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकेंद्रातील मोदी सरकारने ग्रामीण भागाचे रूपडे पालटण्यासाठी स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 11) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी ’स्वामित्व योजना’ लॉन्च केली. या योजनेंतर्गत जमिनीच्या मालकांना प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्यात येणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात …
Read More »बैल कापून त्याची विक्री करणार्या एकास अटक
पनवेल : वार्ताहर बेकायदेशीररित्या दोन बैल कापून त्यांच्या मासांची विक्री करणार्या चौघांपैकी एकाला पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी व त्यांच्या पथकाने रिक्षासह पकडले असून इतर तिघांचा पनवेल शहर पोलीस शोध घेत आहेत. पनवेल शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बेकायदेशीररित्या बैल कापून त्यांच्या मासांची विक्री केली जात असल्याच्या …
Read More »गुजरातवरून विक्रीसाठी आलेला तब्बल 35 लाखांचा गुटखा जप्त
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गुजरातमधून मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी नवी मुंबईत आला होता. मात्र, ट्रकमधून इतर दोन वाहनांमध्ये हा गुटखा भरला जात असतानाच अमली पदार्थ विरोधी पथकाने रबाळे एमआयडीसी येथे छापा टाकून कारवाई करीत 35 लाखांचा गुटखा, 14 लाख रुपये किमतीची तीन वाहने असा 49 लाख 53 हजार रुपये …
Read More »राज्य सरकारच्या विरोधात आज आंदोलन
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्रात महिलांवर होणार्या अत्याचाराबाबत राज्य सरकार निष्क्रिय व उदासिन आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या सुचनेनूसार सोमवारी (दि. 12) आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात महिलांवर होणार्या अत्याचाराचे वाढते प्रमाण पाहता राज्यातील सरकार अत्याचार थांबविण्यासाठी कोणतेही प्रयत्न करीत नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. महिलांची सुरक्षितता …
Read More »बर्निंग कारचा थरार
उरण : वार्ताहर उरण शहरातील कोटनाका येथील क्सिस बँकेच्या समोर पार्कींग करुन ठेवण्यात आलेली शिफ्ट डिझायर या चारचाकी गाडीला शनिवारी संध्याकाळच्या सुमारास अचानक पेट घेतला. भर बाजारपेठेतील वर्दळीच्या रस्त्यावरच अचानक पेटलेल्या गाडीमुळे रस्त्यावरील पादचार्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली.आगीमुळे दुचाकींना धोका पोहचण्यापुर्वीच अग्नीशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानाने तत्काळ आग आटोक्यात …
Read More »नवी मुंबई पालिका करणार एचएफएनसी यंत्राची खरेदी
प्राणवायूची नितांत गरज असलेल्या रुग्णांना ठरणार संजीवनी पनवेल : बातमीदार कोरोनाबाधित रुग्णाला दुसर्या टप्प्यात प्राणवायूची गरज भासत असल्याचे आढळून आले आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर कमीत कमी व्हावा यासाठी पालिकेने आरोग्य यंत्रणेत अनेक बदल करण्याचे ठरविले असून यासाठी काही निष्णांत डॉक्टरांचा सल्ला घेतला जात आहे. प्राणवायूची नितांत गरज असलेल्या कोरोनाबाधित …
Read More »रायगड जिल्ह्यात 294 नवे पॉझिटिव्ह; पाच रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 10) नव्या 294 कोरोना रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 413 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 165 व ग्रामीण 33) तालुक्यातील 198, अलिबाग 23, पेण 15, उरण 13, कर्जत 12, महाड 10, माणगाव नऊ, रोहा आठ, खालापूर …
Read More »मुंबईसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
मुंबई ः प्रतिनिधीबंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात उल्लेखनीय बदल झाले असून, रविवार आणि सोमवारसाठी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी मुंबईसह संपूर्ण कोकण परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असेही आवाहन भारतीय हवामान शास्त्र विभागाने केले आहे.11 …
Read More »खंडाळा घाटात लागोपाठ तीन अपघात ; दोघांचा मृत्यू, एक जण जखमी
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी शनिवारी सकाळी सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटात लागोपाठ तीन अपघात घडले. यात दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी आहे.पहिला अपघात पुण्याकडून मुंबईकडे जाणारा साखरेची पोती भरलेला ट्रक शनिवारी पहाटे खंडाळा घाटातील अंडा पॉईंट येथून जात असतांना तीव्र वळणावर अनियंत्रित होऊन उलटला. …
Read More »