पनवेल : वार्ताहर सिडको वसाहतीत पाणीपट्टीत तिपटीने वाढ करण्यात आली होती. कोरोना काळात पाठवलेल्या सुधारित देयकाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. त्यामुळे सिडकोने या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली होती, परंतु आता ग्राहकांना सुधारित दरानुसार पाणी देयके पाठवण्यात आली आहेत. ही रक्कम जास्त असल्याने कळंबोलीतील रहिवाशांनी नाराजी व्यक्त करून विरोध दर्शविला आहे. …
Read More »Monthly Archives: December 2020
कुपोषणमुक्तीसाठी प्रशासन, स्वयंसेवी संस्थांचा हातात हात
अलिबाग : प्रतिनिधी – रायगडच्या दक्षिण भागातील सात तालुक्यांमधील कुपोषित बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था हातात हात घालून पुढे सरसावल्या आहेत. रायगड जि. प.चा एकात्मिक बालविकास विभाग, स्वदेस फाऊंडेशन आणि भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना (आयएपी) यांच्यात एक सामंजस्य करार झाला असून दक्षिण रायगड कुपोषणमुक्त करण्याचा निर्धार यानिमित्ताने करण्यात आला. …
Read More »रेवदंडा बायपासलगत कचर्याचे साम्राज्य
कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी रेवदंडा : प्रतिनिधी – रेवदंडा बायपासलगत कचर्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, तेथून ये-जा करणे धोकादायक बनले आहे. हा कचरा टाकणार्यांवर ग्रामपंचायतीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. रेवदंडा बायपास रस्त्यालगत रेवदंडा व चौल ग्रामपंचायतींनी संयुक्तपणे ‘येथे कचरा टाकू नये, कचरा टाकणार्यांवर कारवाई करण्यात येईल‘ …
Read More »अर्धवट कालवा सफाईमुळे शेतकरी संकटात
पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे माणगावमधील भातपीक धोक्यात माणगाव : सलीम शेख – काळ प्रकल्पांतर्गत डोलवहाळ बंधार्याचे पाणी डाव्या कालव्यातून माणगाव तालुक्यातील शेतीला सोडण्यात येते, मात्र यंदा या कालव्याच्या सफाईची कामे अद्यापही पूर्ण झाली नाहीत. कालव्याला पाणी सोडले नसल्याने रब्बी हंगामातील भातपीक धोक्यात येईल या भीतीने माणगाव तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. …
Read More »आणखी एका नेत्याचा ‘तृणमूल’ला राम राम
ममतांसमोर गळती रोखण्याचे आव्हान कोलकाता ः वृत्तसंस्थापश्चिम बंगालच्या राजकारणात दबदबा असलेले नेते सुवेंदू अधिकारी यांच्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका आमदाराने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा राजीनामा दिला आहे. मागील दोन दिवसांत तीन नेत्यांनी पक्ष सोडल्याने मुख्यमंत्री व पक्षाध्यक्ष ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी वाढली आहे.ममता यांचे मंत्रिमंडळातील सहकारी सुवेंदू अधिकारी यांनी नुकताच …
Read More »आपला पगार किती? बोलता किती?
आमदार पडळकरांनी राऊतांना झापले मुंबई ः प्रतिनिधीशिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. सामनाच्या अग्रलेखात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख फेकूचंद असा केला होता. आता यावर पडळकर यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. आपला पगार किती? आपण बोलता किती? असा टोमणा पडळकर यांनी राऊतांना मारला आहे.आमदार गोपीचंद पडळकर …
Read More »आमदार प्रताप सरनाईकांचा शिवसैनिकांनीच केला निषेध
महाड ः प्रतिनिधीशिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्याबाबत केलेल्या अपमानास्पद विधानाचा महाड येथील शिवसैनिकांनीच निषेध केला आहे.‘मी तानाजी मालुसरेसारखा धारातिर्थी पडणारा सैनिक नाही,’ असे बेताल विधान शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केले होते. त्याचा महाड आंबेशिवथर येथील शिवसैनिकांनी जाहीर निषेध केला आहे.या वेळी आंबेशिवथर गावचे माजी पोलीस …
Read More »आंजर्लेच्या समुद्रात बुडून पुण्यातील तीन पर्यटकांचा मृत्यू
रत्नागिरी ः प्रतिनिधीरत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या आंजर्ले येथील समुद्रात सहा पर्यटक बुडाल्याची घटना शुक्रवारी (दि. 18) घडली. सहापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला, तर तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे. हे सर्व पर्यटक पुण्यातील आहेत.पुण्याच्या औंध येथील निहाल चव्हाण, अक्षय राखेलकर, उबेस खान, रोहित पलांडे, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे यांच्यासह …
Read More »पोरखेळ चालला आहे!
बुलेट ट्रेनच्या जागी मेट्रो कारशेड उभारण्यावरून फडणवीस संतापले नागपूर ः प्रतिनिधीकांजूरमार्गमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेत कारशेड उभारण्याच्या पर्यायावर राज्य सरकारने चाचपणी सुरू केली आहे. यावरून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. कोणीतरी चुकीचे सल्ले …
Read More »राजकारणाचा अतिरेक
विचित्र वर्तनाने आणि अनाकलनीय निर्णयांच्या बळावर आपल्या पक्षाला रसातळाला नेणारे काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी बेजबाबदारपणाचे दुसरे टोक गाठले आहे असे दिसते. बुधवारी झालेल्या संरक्षण मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी आपल्या अनाकलनीय वर्तनाचा वस्तुपाठच दिला. कुठल्याही लोकशाही व्यवस्थेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष अशा दोन …
Read More »