Breaking News

Monthly Archives: December 2020

अवकाळी पाऊस वीटभट्ट्यांच्याही मुळावर

व्यावसायिक संकटात; राज्य शासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी मोहोपाडा : प्रतिनिधी डिसेंबर महिन्यात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी मालकांचा कच्चा माल भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने या आर्थिक संकटात असलेल्या वीटभट्ट्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी वीटभट्टी मालक राज्य शासनाकडे मागणी करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 …

Read More »

लग्नाचे वचन देऊन ठेवलेले संबंध बलात्कार नाही -न्यायालय

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थालग्नाआधी रिलेशनशीपमध्ये अथवा विवाहाचे वचन देऊन अनेक तरुण-तरुण शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. मुलांकडून लग्नाचे वचन पूर्ण झाले नाही तर त्यांच्यावर बलात्काराचा आरोप लावला जातो. या संदर्भात एका याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. लग्नाचे वचन देऊन लैंगिक संबंध ठेवणे हा नेहमीच बलात्कार असतो असे नाही, …

Read More »

105 वर्षांच्या आजीबाईंनी केली कोरोनावर मात

पुणे ः प्रतिनिधीसंपूर्ण जगाला जेरीस आणणार्‍या महाभयंकर कोरोनाची अनेकांना लागण झाली, तर काहींचा बळीही गेला. कोरोनाविरुद्धची लढाई अनेकांनी जिंकलीदेखील. अशाच प्रकारे आयटी नगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या हिंजवडीतील 105 वर्षांच्या आजीबाईंनी प्रबळ इच्छाशक्ती व उपचाराच्या जोरावर कोरोनावर मात केली आहे. शांताबाई हुलावळे असे या आजीबाईंचे नाव.पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात महिनाभरापूर्वीपर्यंत अनेक …

Read More »

मध्य रेल्वेवर एसी लोकल सुरू

मुंबई ः प्रतिनिधीगेल्या नऊ महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी मुंबईच्या लोकलचे दार बंदच आहे, पण आता मध्य रेल्वेवरील प्रवाशांना गारेगार दिलासा मिळाला आहे. पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता मध्य रेल्वेमार्गावर एसी लोकल सुरू झाली आहे.मुंबईतील लोकल रेल्वेचा प्रवास हा घामाघूम करणारा असतो. जीवघेणी गर्दी आणि घामांच्या धारांमुळे हा प्रवास मुंबईकरांना आतापर्यंत त्रासदायक ठरलाय. हा प्रवास …

Read More »

न्यायालयाचा अवमान करणार्‍या संजय राऊत यांच्यावर कारवाई करा : भाजप

मुंबई ः प्रतिनिधीमेट्रो कारशेडचा विषय विरोधी पक्षाने राजकीय केला असून, त्यात न्यायालयाने पडू नये अशी टीका करतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी न्यायालयाच्या कामकाजावर संताप व्यक्त केला आहे. राऊतांनी केलेल्या या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी थेट त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्याची मागणी केली आहे.’संजय …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचा निधी वितरित करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात सन 2018-19मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचा निधी वितरित करण्यात यावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.या निवेदनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी …

Read More »

रस्ते अडवणे गैर!

शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाची टिपण्णी नवी दिल्ली : वृत्तसंस्थाआपल्या हक्कांसाठी शेतकर्‍यांना आंदोलन करण्याचा हक्क नक्की आहे, मात्र आंदोलनासाठी रस्ते अडवणे गैर असल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. स्वतंत्र समिती स्थापन करून चर्चेच्या मार्गानेच यावर तोडगा काढावा, असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.दिल्लीच्या सीमेवर शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. मागील 20 दिवसांपासून शेतकरी …

Read More »

अहंकाराला चपराक

आरे येथील प्रस्तावित मेट्रो कारशेडचे काम थांबवून हा प्रकल्प कांजूरमार्ग येेथे हलविण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला, त्याला अव्यापारेषु व्यापार म्हणता येईल. कुठलाही अभ्यास न करता, कायदेशीर सल्ला न घेता, केवळ अहंकारापोटी ठाकरे सरकारने आरे येथील काम थांबवून मेट्रो कारशेड कांजूर येथे हलविण्याचे ठरविले. हा निर्णय जाहीर झाला तेव्हाच मेट्रो महाप्रकल्पाचे …

Read More »

धर्मशाळेस आर्थिक मदत; रुग्णांना चादर वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त ओवा गाव येथील संत गाडगे माहाराज धमार्थ निवास या धर्मशाळेच्या माध्यामतून सुनिल पाटील हे परिसरातील येणार्‍या अवे कॅन्सर रुग्नांची मनोभावे सेवा करत आहे. त्याअनुसंगाने भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या धर्मशाळेस भेट देऊन त्यांनी येथील रुग्णांना त्यांच्या हस्ते चादर वाटप करण्यात आले. तसेच या वेळी …

Read More »

माथेरानमध्ये प्रेमीयुगुल अपघातात जखमी

कर्जत : बातमीदार माथेरान फिरून घरी परतत असताना दोन प्रेमीयुगलांच्या दुचाकीने समोरून येणार्‍या वाहनाला धडक दिल्याची घटना माथेरान घाटात घडली आहे. या अपघातात दुचाकी चालवणार्‍या प्रियकराला जबर मार बसला असून त्याला पुढील उपचारासाठी बदलापूर येथे हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहिती नुसार हे प्रेमी युगल माथेरान फिरण्यासाठी रविवारी आले होते. माथेरान …

Read More »