Breaking News

Yearly Archives: 2020

अपघातात क्लिनरचा जागीच मृत्यू

खोपोली ः प्रतिनिधी खंडाळा घाटात मुंबई-पुणे जुना महामार्ग व एक्स्प्रेस वे जुळतात त्याअगोदर असलेल्या अंडा पॉइंट येथे बुधवारी (दि. 2) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात गाडीतील क्लिनरचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत खोपोली पोलिसांत नोंद झाली असून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बाजूकडून मुंबईकडे जात असलेला कंटेनर अंडा …

Read More »

बाजारपेठेतील मोकळ्या जागेत वाहनांची पार्किंग

रोहे ः प्रतिनिधी रोहा शहरात वाहतूक कोंडी होऊ नये व शहरातील बेशिस्तपणा जावा यासाठी रोहा-अष्टमी नगरपालिकेच्या वतीने रोहा बाजारपेठेतील हातगाडी व्यावसायिक, फळविक्रेते व भाजी विक्रेत्यांना स्थलांतरित करण्यात आले होते. त्यामुळे बाजारपेठेत रस्त्यावर जागा मोकळी झाली होती. आता या ठिकाणी बाजारहाटासाठी आलेले नागरिक चारचाकी गाड्या उभ्या करीत असल्याने बाजारपेठेतील मोकळी जागा …

Read More »

पुढच्या वर्षी लवकर या..!

बोर्ली पंचतन ः सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बोर्ली पंचतनच्या ’बोर्लीचा राजा’ला भावपूर्ण वातावरणात दिवेआगर समुद्र किनार्‍यावर निरोप देण्यात आला. आसमंतात झालेल्या रंगांच्या उधळणीत गणरायाची छायाचित्रकार अमेय नाझरे यांनी टिपलेली विलोभनीय छबी.

Read More »

माणगाव तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून मागील सात दिवसांत 164 नवे रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांनी तालुक्यातील तमाम नागरिकांना दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. माणगाव तालुक्यात अनलॉक प्रक्रियेत कोरोनाचे रुग्ण दरदिवशी आढळत असल्याने ही प्रशासनाबरोबरच नागरिकांसाठीही धोक्याची घंटा आहे. तालुक्यात 26 ऑगस्ट ते …

Read More »

योग्य आहाराने टाळा हृदयरोग

आरोग्य प्रहर हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी पौष्टिक आहार महत्त्वाचा आहे. चांगली जीवनशैली व आहार उच्च रक्तदाब, रक्तातील कॉलेस्ट्रॉलचे वाढते प्रमाण, लठ्ठपणासारखे आजार टाळण्यास मदत करतात. हे सर्व घटक हृदयरोगास कारणीभूत ठरतात. वाढते शहरीकरण, आर्थिक प्रगती, काम व फिरण्यासाठी वाढलेला प्रवास, बाहेरचे खाणे वाढत्या आजारांची कारणे आहेत. जेवणाची खालावलेली गुणवत्ता, पोषकतत्त्वे …

Read More »

उसरोली वालवटी पूल धोकादायक

 मोठ्या दुर्घटनेची शक्यता; ग्रामस्थांची दुरुस्तीची मागणी मुरूड ः प्रतिनिधी     मुरूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीमधील उसरोली वालवटी पूल धोकादायक झाला असून सदरचा पूल कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पुलावरून पास झाल्यावर बाजूच्या चार गावांशी संपर्क होऊ शकतो, परंतु हा पूल कोसळल्यास ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांचा संपर्क तुटून मोठी समस्या …

Read More »

पनवेलमध्ये 225 नवे कोरोना रुग्ण

तिघांचा मृत्यू; 130 जणांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 31) कोरोनाचे 225 नवीन रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर 130 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 170 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 100 रुग्ण …

Read More »

हळूहळू बिगिन अगेन

देशातील कोरोना महामारीचे थैमान अजुनही थांबलेले नाही. रुग्णांचे आकडे अद्याप रोज वाढतच आहेत. कोरोना रुग्णांची ही आकडेवारी काळजी वाढवणारी बाब आहे हे खरेच, परंतु हातावर हात बांधून निमूटपणे बसणे आता कोणालाच परवडणारे नाही. कोरोना विषाणूच्या विरोधात मारे युद्धबिद्ध छेडल्याच्या आविर्भावात भाषणे ठोकायची आणि दुसरीकडे हातावर हात बांधून घरात दडून बसायचे …

Read More »

रायगडात 430 नवे कोरोना पॉझिटिव्ह; नऊ रुग्णांचा मृत्यू

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 31) 430 नव्या कोरोना रुग्णांची आणि नऊ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. दुसरीकडे 252 जण दिवसभरात बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 225, अलिबाग 64, पेण 49, रोहा 22, कर्जत 20, खालापूर व सुधागड प्रत्येकी 14, उरण नऊ, महाड चार, तळा तीन आणि …

Read More »

राज्यात ई-पासची अट रद्द

मुंबई : राज्यभर एसटीचा प्रवास ई-पास मुक्त करण्यात आला असताना खासगी वाहनांवर असलेल्या निर्बंधांबाबत जनतेतून नाराजी व्यक्त होत होती. अखेर राज्य शासनाने ई-पास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अनलॉक-4संदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली असून, यामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे आंतरराज्य प्रवास करण्यावरील बंधने शिथील झाली आहेत.

Read More »