Breaking News

Yearly Archives: 2020

टीव्ही-चित्रपटांच्या शूटिंगसाठी केंद्राची नवी नियमावली

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था टीव्ही व चित्रपटांच्या शूटिंगसाठी केंद्र सरकारने विस्तृत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करीत याबाबतची माहिती दिली. या मार्गदर्शक सूचनांमुळे शूटिंगमधील कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी योग्य परिस्थिती निर्माण करण्यास मदत मिळेल, असे जावडेकर यांनी म्हटले आहे. या सूचनांत सर्व ठिकाणी फेस …

Read More »

ऐन सणासुदीत माथेरानमध्ये पाणीटंचाई; पावसाळ्यातही नागरिक तहानलेले

कर्जत ः बातमीदार रायगड जिल्ह्यातील माथेरानमध्ये गणेश चतुर्थीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने माथेरानकरांना पाणीपुरवठा केला नसल्याने ऐन सणासुदीत माथेरानकर तहानलेले राहिल्याने माथेरानमधील अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. कोविडच्या भयंकर संकटात गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय माथेरानकरांनी घेतला, पण सण साजरा करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या घरात सजावट करून बाप्पाच्या आगमनाची …

Read More »

कृषी खाते झोपले आहे का? राज्यमंत्री बच्चू कडूंचा सरकारला घरचा अहेर

अमरावती ः प्रतिनिधी शेतकर्‍यांसंदर्भात कृषी विभाग गंभीर नाही. आधी बियाणे बोगस निघाले, आता पिकांवर रोग येत आहेत. या भयंकर परिस्थितीत राज्यातील कृषी खाते झोपले आहे की काय, असा सवाल करीत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा अहेर दिला आहे.विदर्भात सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अमरावती जिल्ह्यातील  सोयाबीन …

Read More »

बिहार निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस सज्ज; देशातील पहिली डिजिटल निवडणूक

मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी पक्षातर्फे फडणवीस यांना तसे कळविण्यात आले आहे. बिहारमध्ये चालू वर्षाअखेर निवडणूक होत आहे. फडणवीस यांनी या निवडणुकीच्या प्रत्यक्ष कामात सहभाग …

Read More »

ठाकरे सरकारसमोर नवे विघ्न; 11 आमदार बसणार उपोषणाला; निधी वाटपाबाबत नाराजी

मुंबई ः प्रतिनिधी ठाकरे सरकारमधील मानापमान नाट्य काही थांबताना दिसत नाही. निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेतले जात नाही, हा काँग्रेसने घेतलेला आक्षेप ताजा असतानाच आता निधी वाटपातही भेदभाव केला जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या काही आमदारांनी केला. परिणामी या आमदारांनी सरकारविरोधात उपोषणाला बसण्याचा इशाराही दिला आहे. काँग्रेसचे जालन्यातील आमदार कैलास गोरंट्याल ठाकरे …

Read More »

रायगडात 298 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 10 रुग्णांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 23) 298 नव्या कोरोना रुग्णांंची नोंद झाली, तर 10 रुग्णांंचा मृत्यू झाला. त्याचबरोबर 381 जण दिवसभरात बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 173, अलिबाग 35, महाड 27, रोहा 14, उरण 11, पेण 10, माणगाव नऊ, कर्जत चार, पोलादपूर दोन, तर सुधागड, श्रीवर्धन …

Read More »

मद्यपीचा फूलविक्रेत्याच्या मालावर डल्ला

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी अट्टल मद्यपी कोणत्या थराला जात असून फूलविक्रेत्याचा जवळपास पंधरा हजाराचा माल दारुड्यानी चोरून नेल्याची घटना खालापूरात घडली आहे. गणेशोत्सवात फूलांचे दर कडाडले आहेत. हार, कंठी याचे दर वाढले असले तरी ग्राहक खरेदी करत आहेत. खालापूर शहरातील फूल विक्रेत्यानी ग्राहकांच्या मागणीनुसार विविध आकाराचे हार, दुर्वाची कंठी तयार …

Read More »

गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणार्याला अटक

रेवदंडा पोलिसांची कारवाई रेवदंडा : प्रतिनिधी रेवदंडा पोलिसांनी हद्दीतील मुरूड तालुक्यातील सुपेगाव फाटयावर गावठी हातभट्टीची दारूची वाहतुक मोटर सायकलने करणारा एकास रंगेहाथ पकडून गुन्हा दाखल केला. याबाबत सविस्तर वृत असे की, रेवदंडा पोलिसांना सुपेगाव फाटयावरून गावठी हातभट्टीची दारू मोटर सायकलने होत असल्याच्या मिळालेला माहितीनुसार ऐन गणेशोत्सोवाचे दिवशी शनिवारी (दि. 22) …

Read More »

पनवेल तालुक्यात 173 नवीन रुग्ण

   तिघांचा मृत्यू; 208 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 23) कोरोनाचे 173 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू  झाला आहे तर 208 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 119 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर 167 …

Read More »

गणेश दर्शन

चिरनेर (ता. उरण) : सार्थक व काव्य यांच्या घरातील विराजमान गणरायाची मूर्ती. पुनाडे (ता. उरण) : अशोक कमळ पाटील यांच्या घरातील गणपती बाप्पा. दिघोडे (ता. उरण) : दत्तात्रेय शांताराम ठाकूर यांच्या घरातील श्री गणेशाची आकर्षक मूर्ती व इकोफ्रेंडली सजावट. पनवेल : अशोक पवार यांच्या घरातील श्री गणेशा व इकोफ्रेंडली लाकडाचे …

Read More »