Breaking News

Yearly Archives: 2020

खालापूरजवळ कारचा अपघात; एक जण ठार, दोघे गंभीर जखमी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधीमुंबई-पुणे महामार्गावरून जाणार्‍या एका कारला खालापूर हद्दीत खडी मशीनजवळ अपघात होऊन एकाचा मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. 17) सकाळी घडली. जखमींना चौक आणि पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातग्रस्त लोक माणगाव तालुक्यातील विळा येथील रहिवाशी असून, ते कारने पनवेलकडे जात होते. …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा कोविड योद्धा गौरव

उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून सन्मानपत्र पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना विषाणू जागतिक महामारीत नागरिकांना सर्वतोपरी मदत करीत आधार देणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाला पनवेल उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने कोविड योद्धा सन्मानपत्र प्रदान करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने हा विशेष गौरव झाला. कोरोना व्हायरस आणि त्यामुळे लागू झालेल्या लॉकडाऊन परिस्थितीत गोरगरीब …

Read More »

कोरोना रुग्णांच्या आकड्याची लपवाछपवी

खालापुरात शासकीय अहवालाहून प्रत्यक्ष रुग्णसंख्या अधिक खोपोली, खालापूर : प्रतिनिधीकोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनेक संशयास्पद गोष्टी घडत आहेत. खालापूर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या प्रत्यक्षात जास्त असूनही प्रशासनाकडून देण्यात येणारी आकडेवारी कमी दाखवली जात असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.खालापूर तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा चौदाशेकडे वाटचाल करीत आहे, तर 47 जणांचा बळी गेला …

Read More »

ऐन सणासुदीतही विजेचा लपंडाव

मूर्तीकारांना घ्यावा लागतोय जनरेटरचा आधार चिरनेर : वार्ताहर – ऐन सणासुदीच्या म्हणजे गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येवून, ठेपला असून श्री गणरायाची मुर्ती घडविणारे मूर्तीकार सध्या रंगसंगतीच्या कामात गुंतले आहेत. त्यांना स्प्रेद्वारे शेडींगचे रंगकाम करतांना विजे विना मोठी समस्या निर्माण होत आहे. वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने येथील मूर्तीकारांना नाहक भाड्याच्या …

Read More »

स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन

उरण : वार्ताहर – भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष उरणच्या वतीने नगर परिषद येथील सभागृहात रविवारी (दि. 16) अभिवादन करण्यात आले. या वेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, …

Read More »

टाटा कॅन्सर हॉस्पिटलसाठी रक्तदान शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त – युवा प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत टाटा कॅन्सर हॉस्पिटलसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा सगळीकडेच आहे. तरीही मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी पुढे येत रक्तदान केले. या रक्तदान शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच भाजप उत्तर …

Read More »

पोलिसांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त – बद्री केदार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि कळंबोली भाजप मंडळ उपाध्यक्ष दिलीप बिष्ट यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली पोलीस ठाण्यात सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप केले. या वेळी पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड उपस्थित होते. या वेळी दिलीप बिष्ट यांनी सांगितले की, कोरोनाच्या संकटात पोलीस दल …

Read More »

संपूर्ण वेळ दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी

नवी मुंबई महानगरपालिकेचा निर्णय आमदार मंदा म्हात्रे यांच्या मागणीला यश नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील दुकाने दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली ठेवण्याबाबतचे नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मान्यतेने आदेश काढले आहेत. याबाबतचे पत्र त्यांनी आमदार म्हात्रे यांना दिले आहे. यामुळे व्यापार्‍यांमध्ये …

Read More »

रत्नागिरीत अतिवृष्टी; महामार्गावरील वाहतूक बंद

चिपळूण : प्रतिनिधी जोरदार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीला पूर येऊन हे पाणी थेट शहरात शिरले. मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण येथील पूलही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. रात्रभर कोसळणारा पाऊस व कोयना धरणातून करण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग यामुळे वाशिष्ठी नदीचे पाणी शहरात घुसले आणि बाजारपेठ पाण्याखाली गेली. पाणी …

Read More »

मासेमारी नौका अद्यापही बंदरातच; मच्छीमारांचा नव्या हंगामाचा मुहूर्त लांबला

अलिबाग : प्रतिनिधी मच्छीमारांसमोरील विघ्ने काही संपण्याचे नाव घेत नाहीत. नव्या हंगामाची सुरुवात करण्यास सरसावलेल्या रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांना वादळी हवामानाचा जबर तडाखा बसला आहे. 20 ऑगस्टपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा बंदर विभागाने दिला आहे. यामुळे मासेमारीवरील दोन महिन्यांचा शासकीय बंदी कालावधी संपून अर्धा महिना उलटला तरी मासेमारी नौका …

Read More »