नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे चक्र पूर्णपणे थांबले होते. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हळूहळू अर्थव्यवस्थेचे चक्र सुरू होताना दिसत आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आपल्या देशात एमएसएमई क्षेत्राचे मोठे योगदान आहे. येत्या काळात या क्षेत्रात पाच कोटी नवे रोजगार निर्माण …
Read More »Yearly Archives: 2020
भाजप किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी परशुराम म्हसे
कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी कर्जत तालुका मंडल कार्यालयीन प्रमुख आणि प्रगतशील शेतकरी परशुराम म्हसे यांची निवड करण्यात आली आहे. भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते म्हसे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांच्यावर तीन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी असणार आहे. कर्जत तालुक्यातील खैरपाडा …
Read More »राज्यपालांनी 79व्या वर्षी केला शिवनेरी सर
जुन्नर : प्रतिनिधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वयाच्या 79व्या वर्षी पायी चालत शिवनेरी किल्ला सर केला. अशी कामगिरी करणारे ते पहिलेच राज्यपाल ठरले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन होणे हा माझ्या भाग्याचा क्षण आहे. ते सामान्य व्यक्तिमत्त्व नव्हते, तर अवतारी पुरुष होते. त्यांच्यासारख्या महापुरुषांकडून प्रेरणा मिळते. ते खरे पूजनीय …
Read More »रिलायन्स पाइपलाइनबाधित प्रकल्पग्रस्त करणार उपोषण; भाजपचा पाठिंबा
कर्जत : बातमीदार रिलायन्स इथेन गॅस पाइपलाइन प्रकल्पापोटी कर्जत तालुक्यातील शेतकर्यांना त्यांनी दिलेल्या जागेचा मोबदला मिळालेला नाही. तो मिळावा यासाठी रिलायन्स कंपनी आणि प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता, पण त्यात कोणताही तोडगा न निघाल्याने या प्रकल्पग्रस्तांनी येत्या बुधवारी (दि. 19) कर्जत तहसील कार्यालयाबाहेर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. …
Read More »सुकापूर येथील व्यसनमुक्ती केंद्रात ध्वजारोहण
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील आशा की किरण या व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष अल्लारखा (देवदूत) बशीर कुरेशी व सचिव नूरजहाँ कुरेशी यांच्या केंद्रात वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्यामकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी कोकण डायरी या सुप्रसिद्ध मराठी वृत्तपत्राचे संपादक, पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष तथा …
Read More »वाढदिवसानिमित्त केले वृक्षारोपण
उरण : वार्ताहर भारतीय जनता पक्ष उरण तालुका महिला उपाध्यक्षा निर्मला घरत यांचा वाढदिवस शनिवार (दि. 15) वृक्षारोपण करुन साजरा करण्यात आला. निर्मला घरत यांनी या वेळी वृक्षारोपण करून वृक्षाचे महत्व पटवुन दिले आहे. त्यांनी उरण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सावरखार येथील पटांगण येथे व इतर ठिकाणी वृक्षारोपण केले. तसेच …
Read More »घराच्या छताचे प्लास्टर कोसळले
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईमध्ये सध्या घरातील छत पडण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. रविवारी (दि. 16) सीबीडी बेलापूर सेक्टर 4 या इमारतीतील ग बी, 10/11/4:1 या घराच्या छताचे प्लास्टर कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणासही दुखापत झाली नसली तरी कुटुंबातील व्यक्ती थोडक्यात बचवल्या. मात्र यामुळे फर्निचरचे किरकोळ …
Read More »कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने खारघर टोल नाक्यावरील कर्मचार्यांना मिळाला न्याय
खारघर : प्रतिनिधी लॉकडाऊनमध्ये अनेक संकटांना तोंड द्यावे लागत असताना सायन-पनवेल महामार्गावरील खारघर टोल नाक्यावर मागील सात वर्षांपासून कार्यरत असलेल्या 39 कर्मचार्यांना एप्रिल महिन्यापासून कामावरून तडकाफडकी कमी करण्यात आले होते. टोल कंत्राटदाराच्या या भूमिकेमुळे कामगारांनी आंदोलनाचा पर्याय निवडला होता, परंतु या आंदोलनापूर्वी झालेल्या बैठकीत कंत्राटदाराने पहिल्या टप्प्यात 17 कामगारांना कामावर …
Read More »पनवेल तालुक्यात 212 नवे रुग्ण
तिघांचा मृत्यू; 153 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 16) कोरोनाचे 212 नवीन रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर 153 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 148 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 125 रुग्ण बरे …
Read More »तांबडी घटनेप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करा! अन्यथा अधिवेशन काळात मोर्चा काढणार; मराठा समाजाचा राज्य सरकारला इशारा
रोहे : प्रतिनिधी मराठा समाजाच्या समन्वयकांनी रविवारी (दि. 16) रोहा तालुक्यातील तांबडी बुद्रुक येथील अत्याचारात बळी गेलेल्या मुलीच्या कुटुंबीयांची दुसर्यांदा भेट घेत सांत्वन केले. या वेळी त्यांनी या घटनेत न्याय मिळवून देण्यासाठी समस्त मराठा समाज एकवटला आहे. आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी; अन्यथा येत्या अधिवेशन काळात भव्य मोर्चा काढण्याचा इशारा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper