Breaking News

Yearly Archives: 2020

ग्रामीण भागात कोरोनाचे वाढते संक्रमण; महाडमध्ये 19 नवे रुग्ण, दोघांचा मृत्यू

महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यात कोरोनाच्या नव्या 19 रुग्णांची सोमवारी (दि. 27) नोंद झाली असून, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरीकडे सहा जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. महाड तालुक्यात नव्याने पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये महाड, खरवली, बिरवाडी-बापटनगर, श्रीजीआर एसबीआय बँक, केएसएफ कॉलनी नांगलवाडी, कौमुदी आर्केड रोहिदास नगर, शेलटोली, नवेनगर, तांबटभुवन, स्नेहरमण, …

Read More »

अंगणवाड्यांना प्रथमोपचार पेट्यांचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांचा वाढदिवस वृक्ष लागवड, अंगणवाडयांना प्रथोमोपचार पेट्यांचे वाटप, श्रमदान यांसारख्या विविध सामाजिक उपक्रमाद्वारे नुकताच साजरा करण्यात आला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. 26) ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन …

Read More »

देऊळ बंद असल्याने भाविकांची निराशा

उरण : वार्ताहर – श्रावण महिन्यातील पहिला सोमवारी (दि.27) रोजी असल्याने महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी गर्दी असायची परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता सर्वत्र लॉकडाऊन केल्याने मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे भाविक शंकराच्या मंदिरात जाऊन पूजा अर्चा करण्यासाठी जाऊ शकले नाहीत त्यामुळे भाविकांमध्ये नाराजीचा सूर येत आहे. उरण …

Read More »

गरजूंना वस्तूंचे वाटप, वृक्षारोपण

मोहोपाडा : प्रतिनिधी – कानसा वारणा फाऊंडेशनच्या सदस्या तसेच दिपकृष्ण नागरी पतसंस्था मर्यादित संचालिका कै. संगिता निकम यांच्या निधनानंतर कानसा वारणा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संस्थापक दीपक गणपत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू व गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ वृक्षारोपण करण्यात आले.  विविध जातींच्या पाचशे वृक्षांचेही …

Read More »

लाखोंच्या मालाचा अपहार; गुन्हा दाखल

पनवेल : बातमीदार – ट्रकमध्ये भरलेला माल इतर कंपन्यांना पोहचवण्यासाठी दिलेला असताना त्या मालाचा अपहार केल्याची घटना तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आरोपींनी आठ लाख 94 हजार दोनशे रुपयाच्या मालाचा अपहार केला आहे. बदलापूर येथील मनोहर शंकर पाटील यांचा अथर्व मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड नावाचा स्टील प्रोसेसिंगचा व्यवसाय तळोजा येथे …

Read More »

मंडळांचा गणेशोत्सव यंदा दीड दिवसाचा

पनवेल : बातमीदार – नवी मुंबईतील मोठ्या सार्वजनिक मंडळांनी 11 दिवसांऐवजी दीड ते पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. काही मंडळांनी लहान गणेशमूर्तीचे पूजन करून कृत्रिम तलावात विसर्जन करावयाचे नियोजन आखले आहे. शहरातील काही गणेश मंडळांनी गणेशोत्सवात सामाजिक उपक्रमावर भर दिला आहे. यात तुर्भेतील शिवछाया मित्रमंडळाने यंदा दीड …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात बीएमएस मेरिटाइम लॉजिस्टिक्स अभ्यासक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त – जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय हे देश व जगभरात व्यवस्थापन क्षेत्रातील बदलाचा वेध घेत रोजगार प्रशिक्षण आधारित पदवी मिळविण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस) मेरिटाइम लॉजिस्टिक्स असे या …

Read More »

मोरबे धरणातील पाण्याची पातळी खालावली

नवी मुंबईकरांवर पाणीसंकट? नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – जुलै महिना संपत आला, तरी पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. विशेषत: नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यंत कमी पाऊस पडला आहे. पुढील दोन महिन्यांत अपेक्षित पाऊस न पडल्यास शहरवासीयांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. मुंबईनंतर राज्यात …

Read More »

कर्जत, खोपोली भाजप युवा मोर्चाने पाठविली जय श्रीराम लिहिलेली पत्रे

कर्जत : बातमीदारप्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर बांधल्याने कोरोना आटोक्यात येणार आहे का, असे वादग्रस्त विधान नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. त्यामुळे श्रीरामांची महती सांगणारी असंख्य पत्रे भाजप युवा मोर्चाकडून पवारांना पाठविण्यात येत आहेत. अशाच प्रकारे कर्जत भाजप युवा मोर्चाकडून पत्रे पोस्ट करण्यात आली. या अभियानावेळी कर्जत पोष्ट …

Read More »

माणगावमधील वादळग्रस्तांना नुकसानभरपाई केव्हा मिळणार?

ज्ञानदेव पवारांचा महाआघाडी सरकारला घरचा आहेर माणगाव : प्रतिनिधीमाणगाव तालुक्यातील वादळग्रस्तांना राज्य सरकारकडून नुकसानभरपाई केव्हा मिळणार, असा सवाल काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती ज्ञानदेव पवार यांनी उपस्थित केला आहे. यानिमित्ताने त्यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला आहे. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात …

Read More »