Breaking News

Yearly Archives: 2020

लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा; नगरसेविका सीता पाटील यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाची साखळी तुटावी याकरीता पनवेल महापालिकेने दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केले आहे. यादरम्यान भाजीपाला किराणा दुकानांमध्ये काऊंटर सेल सुद्धा बंद करण्यात आला आहे. मात्र असे असताना खांदा वसाहत, कामोठे आणि कळंबोलीत भाजीवाले व काही किराणा दुकानदार सरळ सरळ विक्री करत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर …

Read More »

पनवेल तालुक्यात 226 नवीन रुग्ण; चौघांचा मृत्यू; 125 रुग्ण बरे

पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 11) कोरोनाचे 226  नवीन रुग्ण आढळले असून चौघांचा मृत्यू  झाला आहे तर 125  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत पुन्हा विक्रमी वाढ झाली आहे. दिवसभरात 181  नवीन कोरोनाबाधित रुग्णांची  नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 97 रूग्ण बरे झाल्याने …

Read More »

गैरप्रकारांना आळा हवाच

कोरोना या घातक विषाणूचा फैलाव जसजसा वाढत गेला आणि या महामारीत मोठ्या संख्येने जीवितहानी होऊ शकते हे स्पष्ट झाले तसतशी कोरोनाची भीती फैलावाइतकीच झपाट्याने वाढत गेली आहे. या भीतीच्याच जोरावर काही नफेखोर सर्वसामान्यांना कोंडीत पकडून त्यांची नाना तर्‍हेने आर्थिक लुटमार करीत आहेत. खाजगी हॉस्पिटलांकडून रुग्णांची केली जाणारी लूट आणि औषधांचा …

Read More »

पॅनेसिया हॉस्पिटलची कोविड-19 मान्यता रद्द

पनवेल : प्रतिनिधी पनवेलमधील पॅनेसिया हॉस्पिटलची कोविड रुग्णांकडून अतिरिक्त बिल आकारणी केल्यामुळे महापालिका आयुक्तांनी कोविड -19 रुग्णालय म्हणून दिलेली मान्यता रद्द केली आहे. रुग्णांकडून तक्रारी आल्यावर सूचना देऊनही व्यवस्थापनाने बदल न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीत वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून …

Read More »

कोरोनामुळे अश्वत्थामा कट्टा शांत

पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन स्थापन केलेला अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचा कट्टा म्हणजे त्यांचे विरंगुळा केंद्रच पण सामाजिक आणि वैयक्तिकसमस्या सोडवण्याचे हे ठिकाण आज कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शांत झाले. आता रस्त्यावरील बेघरांचे आश्रय स्थान बनलेले दिसते.    अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे हे रोहा तालुक्यातील चणेरे …

Read More »

ग्रामीण भागात वल्गनीचे मासे पकडण्यासाठी धावपळ

पनवेल : वार्ताहर सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातील तरूण वर्ग हा घरीच असल्याने त्यांचे लक्ष आता वल्गनीचे मासे पकडण्याकडे लागले आहे. मोठ्या प्रमाणात या दमदार पावसात हे मासे पकडण्यासाठी तरूण वर्ग ग्रामीण भागातील नदीकिनारी, ओव्हळ, नाले, शेती क्षेत्राच्या रस्त्यावर दिसत आहेत. सध्या कोरोना विषाणूमुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे प्रत्येकजण हा आपआपल्या …

Read More »

अमली पदार्थांची रेल्वेतून वाहतूक; नायजेरियन नागरिकाला अटक

पनवेल : प्रतिनिधी दिल्ली-एर्नाकूलम मंगला विशेष प्रवासी एक्सप्रेस मधून अमली पदार्थांची वाहतूक करणार्‍या एका नायजेरियन नागरिकाला रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून दोन कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.         दिल्ली-एर्नाकूलम मंगला विशेष प्रवासी एक्सप्रेस या गाडीची निळजे आणि तळोजा स्टेशन दरम्यान साखळी ओढून गाडी थांबवली जात असल्याच्या तक्रारी आरपीएफकडे …

Read More »

पनवेल महानगरपालिका मुख्यालय दोन दिवस बंद; नियंत्रण कक्षातील कर्मचारी पॉझिटिव्ह

पनवेल : प्रतिनिधी पनवेल परिसरातील कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या विषाणूंचा प्रादुर्भाव थेट महापालिकेच्या नियंत्रण कक्षात झाला आहे. या ठिकाणी काम करणार्‍या जबाबदार कर्मचार्‍यांना त्याची लागण  झाली आहे. त्यामुळे खबरदारी तसेच निर्जंतुकीकरण करण्यासाठी मुख्यालय पुढील दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. क्षेत्रीय कार्यालय मात्र चालूच राहतील, असे प्रशासनाकडून …

Read More »

भाजप नगरसेवकाकडून कोरोनाबाधित रुग्णांना खाद्यपदार्थांचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे येथील भाजप नगरसेवक विजय चीपळेकर यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी रुग्णांसाठी बिस्कीट पुडे आणि वयोवृध्द रुग्णांसाठी बिस्कीट व नारळ पाणी वाटप केले. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विजय चीपळेकर हे कामोठे येथील एमजीएम कोविड19 रुग्णालयात एका परिचित रुग्णाला गरजेच्या वस्तू देण्यासाठी गेले असता त्यांना रुग्णालयातील कर्मचार्‍यांकडून या रुग्णालयात कोरोनाचे …

Read More »

मोहोपाडा हद्दीत कोरोनाचे संकट गडद; सात नव्या रुग्णांची भर; एकाचा मृत्यू

मोहोपाडा : प्रतिनिधी वासांबे (मोहोपाडा) हद्दीत कोरोनाचा फैलावर वाढत असून नविन पोसरी येथील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी नव्याने सात जणांचे कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आले असून वासांबे (मोहोपाडा) हद्दीत एकूण 94 जण कोरोनाने बाधित झाले आहेत. तर पंचवीस जण बरे होवून घरी परतले आहेत. आढळलेल्या रुग्णांमध्ये वासांबे मोहोपाडा शुक्रवारी …

Read More »