Breaking News

Yearly Archives: 2020

निसर्ग चक्रीवादळात सुरूच्या झाडांची पडझड; नवीन वृक्ष लागवड करण्याची मागणी

मुरूड ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे काशीद व मुरूड किनार्‍यावरील असंख्य सुरूची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. ताशी 120 किलोमीटरच्या वार्‍यापुढे ही झाडे टिकाव धरूशकली नाहीत. मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली आहेत. परिणामी सामाजिक वनीकरण विभागाने समुद्रकिनारी पुन्हा सुरूंच्या झाडाची लागवड करावी, अशी मागणी लोकांकडून होत आहे. तसेच मुरूड येथील समुद्रकिनार्‍यावर रायगड …

Read More »

वेळेत उपचार न मिळाल्याने जखमी तरुणाचा मृत्यू

माणगाव : प्रतिनिधी दुचाकी अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. 21) घडली. माणगाव येथे रुग्णवाहिका वेळेत न उपलब्ध झाल्याने सहा तासांपासून बाहेर स्ट्रेचरवर मृत्यूशी झुंज देणार्‍या या तरुणाने अलिबागला पोहचण्याआधीच रस्त्यात जीव सोडला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, माणगाव तालुक्यातील विळे रस्त्यावर …

Read More »

कर्जत पोलिसांना कोरोनाचा विळखा; 20 रुग्णांची वाढ; आरोपीच्या संपर्कात आल्याने संसर्ग

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. सोमवारी एका दिवसात 20 नवीन रुग्ण आढळून आले असून सर्वाधिक कोरोना रुग्ण पोलीस आहेत. नेरळ पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी आणि सात कर्मचारी तसेच कर्जत पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. सोमवारी कर्जत तालुक्यातील 12 पोलिसांचे अहवाल पॉझिटिव्ह आले …

Read More »

विजेच्या धक्क्याने पाच म्हशी मृत्युमुखी

अलिबाग ः प्रतिनिधी तालुक्यातील आवास येथे शनिवारी सायंकाळी विजेच्या धक्क्याने पाच म्हशींचा जागीच मृत्यू झाला. यात म्हशींचे मालक अशोक भगत यांचे सव्वातीन लाख रुपयांचे नुकसान झाले. भगत यांच्या काही म्हशी चरण्यासाठी आवास ते किहीमदरम्यानच्या जंगलात गेल्या होत्या. चक्रीवादळामुळे अलिबाग तालुक्यात वीजवाहक तारा तुटून पडल्या आहेत. त्यांची जोडणी करून वीजपुरवठा सुरळीत …

Read More »

मासेमारी करणार्‍या यांत्रिकी नौकांवर धडक कारवाई

उरण ः प्रतिनिधी शासनाने यांत्रिकी नौकांद्वारे खोल समुद्रातील मासेमारीला महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बंदी घातली आहे, मात्र असे असतानाही या बंदी आदेशाचे उल्लंघन करून खोल समुद्रात मासेमारी करून आलेल्या सहा मासेमारी नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981चे कलम 4नुसार कारवाई करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्याच्या सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांच्या अधिपत्याखाली उरणचे …

Read More »

कर्जत पोलिसांनी केली कोरोनावर मात; सहकार्‍यांकडून जंगी स्वागत

कर्जत ः बातमीदार                                       कर्जत पोलीस ठाणे येथील तीन पोलिसांनी कोरोनाला हरवून ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत. एका कोरोनाबाधित आरोपीच्या संपर्कात आल्याने कर्जत पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचारी आणि एका अधिकार्‍याला कोरोनाची लागण झाली होती. त्यातील तिघे पोलीस कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतले आहेत. सावळे गावातील आरोपी कोठडीत असताना …

Read More »

रोह्यात आढळले तब्बल 10 कोरोना पॉझिटिव्ह

रोहे ः प्रतिनिधी कोरोनाचे संकट देश व राज्यभर वाढत असताना देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या जवळ असलेल्या रायगड जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी रोहा तालुक्यातही कोरोनाने हातपाय पसरले आहेत. रोह्यात रविवारी एकाच दिवसात 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती तहसीलदार कविता जाधव यांनी दिली. मोठ्या प्रमाणात रुग्ण …

Read More »

शेतकर्‍यांच्या कर्जवाटपासाठी भाजपचे राज्यव्यापी आंदोलन

मुंबई ः प्रतिनिधी पावसाळा सुरू झाला तरी खरीप हंगामासाठीचे शेतकर्‍यांचे कर्जवाटप ठप्प आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब पीककर्जाचे वाटप सुरू करावे, तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष सोमवारपासून (दि. 22) राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करेल, अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी …

Read More »

खालापुरात रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद

खालापूर ः प्रतिनिधी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी भाजप उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये 1000 बॉटल्स रक्तदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण रायगड जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविला जात आहे. त्या अनुषंगाने खालापूर …

Read More »

नुकसानग्रस्त बागायतदारांना भाजपकडून ऑटो कटरचे वाटप

अलिबाग ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात उन्मळून पडलेली झाडे कापण्यासाठी भाजपतर्फे बागायतदारांना  ऑटो कटरचे वाटप करण्यात आले. उन्मळून पडलेली झाडे कापण्याचे सध्या बागायतदारांसमोर मोठे आव्हान आहे.  अशा वेळी भाजपकडून रविवारी विभागवार ऑटो कटरचे वाटप करण्यात आले. त्यामुळे बागायतदारांना वाड्या साफ करणे सोपे होईल. या वेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश …

Read More »