Breaking News

Yearly Archives: 2020

माणगावमध्ये सहा, तर रोह्यात एक नवा रुग्ण

माणगाव, रोहा : प्रतिनिधी – माणगाव तालुक्यात सहा नवे रुग्ण आढळले. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 48 झाली आहे. त्यापैकी 14 रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेल्याची माहिती तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांनी दिली. दुसरीकडे रोहे तालुक्यात दोन नवे कोरोना रुग्ण आढळल्याने एकूण आकडा 23वर गेला. माणगाव तालुक्यातील नव्या रुग्णांमध्ये कोंडेथर गावात …

Read More »

निसर्ग चक्रीवादळ : मुरूडमध्ये प्रशासन सतर्क

घराबाहेर न पडण्याचे तहसीलदारांकडून जनतेला आवाहन मुरूड : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर मुरूड तालुक्यात प्रशासन सज्ज झाले असून, विशेषत: समुद्रकिनारी असणार्‍या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. कोकण किनार्‍याला चक्रीवादळाचा धोका आहे. तो लक्षात घेऊन तालुक्यातील समुद्र किनारी असणार्‍या लोकांची …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकरी, मजुरांसह उद्योगांसाठी तरतूद नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसर्‍या टर्ममधील सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. 1) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. याबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री …

Read More »

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नका : लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी वाढदिवस आहे. सध्या सुरू असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नये, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक जण …

Read More »

रायगडात 28 नवे रुग्ण

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 1) कोरोनाचे 28 नवे रुग्ण आढळले. यामध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीतील 16, पनवेल ग्रामीण पाच, उरण तीन, रोहा दोन आणि महाड व म्हसळा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 1145 झाली आहे. जिल्ह्यात दिवसभरामध्ये 25 रुग्ण बरे …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचा उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना महामारीच्या काळात अनेक हॉस्पिटल्समध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताची ही तूट भरून काढण्यासाठी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या माध्यमातून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध ठिकाणी मंगळवारी (दि. 2) रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहे.   फिजिकल डिस्टन्स नियमांचे पालन करून …

Read More »

बहुत जनांसि आधारू…

ज्यांच्या समाजकारणाची मुळेच जनकल्याणाच्या ध्यासामध्ये आहेत असे आपले सगळ्यांचे अतिशय प्रिय आणि आदर्श लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आज वाढदिवस. गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे दानशूर व्यक्तिमत्त्व ही त्यांची जनमानसावर कोरली गेलेली प्रतिमा. सर्वसामान्य स्थितीत सतत माणसांमध्ये रमणारे रामशेठ आजच्या कोरोनाच्या अभूतपूर्व संकटकाळातही जनसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. दोन महिन्यांच्या लॉकडाऊनने ठप्प …

Read More »

देवदूत

सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू आहे. या महाभयंकर विषाणूने विश्व व्यापले असून, अखिल मानवजातीवर त्याचा विपरित परिणाम होताना दिसून येत आहे. अशा संकटकाळात काही व्यक्ती, संस्था पुढाकार घेऊन सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात देत आहेत. यामध्ये दानशूर व्यक्तिमत्त्व असलेले माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे नाव विशेषत्वाने घ्यावे लागेल. जनतेच्या सुख-दु:खात धावून …

Read More »

करंजाडे (ता. पनवेल) : भाजप तालुका चिटणीस किरण मुंबईकर यांच्या पाठपुराव्यानंतर सेक्टर 2 मध्ये सीव्रेज लाईनच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

Read More »

पळस्पे (ता. पनवेल) : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद विभागात रविवारी मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळी विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा मोर्चा अध्यक्ष योगेश लहाने, भाजप कार्यकर्ते हिरामण पाटील आदी उपस्थित होते.

Read More »