कामोठे, तळोजातील महिलांचा मृत्यू पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनामुळे दोन महिलांचा मृत्यू झाला असून, 16 नवीन रुग्ण आढळले आहेत. कामोठ्यात पाच, कळंबोलीत चार, नवीन पनवेलमध्ये तीन आणि तळोजा फेज-1 येथे एक नवीन रुग्ण आढळला, तर 19 जणांनी कोरोनावर मात केली आहे पनवेल ग्रामीणमध्ये दिवसभरात एकही नवीन रुग्णाची नोंद …
Read More »Yearly Archives: 2020
कोरोनाचे सर्व उपचार मोफत झाले पाहिजेत : प्रवीण दरेकर
रत्नागिरी : प्रतिनिधीभाजप महाराष्ट्रातील जनतेसोबत आहे. त्यामुळेच राज्यात काही समाधानकारक स्थिती नसल्याने आम्ही जनतेकरिता आता उपापयोजना, आवश्यक तिथे निधी देत आहोत. भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी 50 लाखांचा निधी पनवेलच्या रुग्णालयाकरिता दिला. आमचे सर्व आमदार आपला निधी कोरोना लढ्यासाठी देत आहेत. स्वॅब तपासणी व कोरोनाचे सर्व …
Read More »पनवेलकरांची भावना लक्षात घ्यावी -सभागृह नेते परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी मेहनत घेणारे आयुक्त गणेश देशमुख यांची तडकाफडकी झालेली बदली रद्द करण्यात यावी, अशी मागणी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात परेश ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपात दिलेल्या पत्रातून गणेश देशमुख यांच्या बदलीला विरोध …
Read More »आयुक्त गणेश देशमुख यांची बदली रद्द करावी
आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करणारे आणि जनमानसात चांगली प्रतिमा उमटविणारे आयुक्त गणेश देशमुख यांची झालेली बदली रद्द करण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री …
Read More »दहावी-बारावीच्या परीक्षांना केंद्राकडून हिरवा कंदिल
नवी दिल्ली : लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने दहावी-बारावीच्या परीक्षा होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक राज्यांतील बोर्डाच्या परीक्षांसह सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, परंतु केंद्र सरकारने दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. याविषयी केंद्राने नियमावलीही जारी केली आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी …
Read More »नाकर्तेपणाचा निषेध
सुरुवातीपासूनच राज्यातील उद्धव ठाकरे सरकार कोरोनाला अटकाव करण्याच्या आघाडीवर गोंधळून गेल्यासारखे चाचपडते आहे. या तीन चाकी सरकारमध्ये मुळातच अंतर्गत समन्वयाचा अभाव आहे. सरकारच्या मंत्र्यांमध्ये परस्पर संवाद सहज नसल्यामुळे कोरोनाविरोधी उपाययोजनांच्या बाबतीत सुरूवातीपासूनच गोंधळाचे वातावरण आहे. चीनमधून सुरू झालेला कोरोनाचा फैलाव या वर्षाच्या प्रारंभी जगभरातील अनेक देशांमधून डोके वर काढू लागताच …
Read More »कोन (ता. पनवेल) : कोविड-19 विषयात तातडीने पावले उचलून त्याला अटकाव करावा आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांसाठी राज्य सरकारने आर्थिक पॅकेज घोषित करावे, अशा मागणीचे निवेदन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत इंडिया बुल्स येथे तहसीलदारांना दिले. या वेळी …
Read More »आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्वीकारला पनवेल मनपाचा पदभार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून सुधाकर देशमुख यांनी बुधवारी (दि. 20) सूत्रे स्वीकारली. ते यापूर्वी उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहात होते. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, मावळते आयुक्त गणेश देशमुख आदी उपस्थित होते. गणेश देशमुख यांची पनवेलमधून बदली करून त्यांच्याकडे ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची …
Read More »नागोठण्यात येणार्यांची संख्या चारशेपार
नागोठणे : प्रतिनिधी मुंबई, ठाणे, पुणे सारख्या शहरांतील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, ’गड्या आपला गावच बरा’ या उक्तीप्रमाणे चाकरमान्यांनी आपल्या गावाची वाट धरली आहे. त्यातच लॉकडाऊनचे निर्बंध काहीसे शिथिल झाल्यानंतर त्यांच्या संख्येत प्रचंड अशी वाढ होत आहे. नागोठणे सुध्दा त्यात मागे नसून शहरात बाहेरून येणार्या नागरिकांनी चारशेचा टप्पा गाठला आहे. …
Read More »खालापूरकरांना गुड न्यूज; कोरोना योध्द्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह
खोपोली : प्रतिनिधी रूग्णसेवा देणार्या खालापूरातील दोन डॉक्टर आणि रूग्णवाहिका चालकांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील कुंभिवली आदिवासीवाडीतील अठ्ठावीस वर्षीय तरूणाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तो जखमी अवस्थेत असताना खालापूर आरोग्य केंद्रात आणले होते. डॉक्टरांनी उपचार केले परंतु नंतर त्याला जे जे रूग्णालय मुंबई येथे हलविण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper