Breaking News

Yearly Archives: 2020

नारी फिट इंडिया फिट कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : बातमीदार नवीन पनवेलमधील सेक्टर 16 मधील सिडको गार्डनमध्ये डॉ. शुभदा नील यांनी आयोजित केलेल्या डायट, संगीतमय योगा कार्यक्रमाला सोमवारी (दि. 2) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी मार्गदर्शनपर भाषणात डॉ. शुभदा नील म्हणाल्या की, गोड खाऊ नये. पालक, दुधी, पेरु, सफरचंद, कडीपत्ता, तुळस, पुदिना, नागवेल पाने, दालचिनी, काळी मिरी …

Read More »

कामोठ्यात नगरसेविकेला लुटले..!

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती कुसूम म्हात्रे यांना कामोठे वसाहतीत काही अज्ञात चोरट्यांनी घेरून अंगावरील सोने लुटल्याची घटना घडली आहे. चक्क नगरसेविकेला कामोठे वसाहतीमधील भर रस्त्यात लुटण्याच्या घटनेमुळे वसाहतीमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जवळपास आठ ते 10 तोळे सोने चोरट्याने लंपास केल्याचे सांगितले …

Read More »

भाजप नगरसेवकांच्या उपस्थितीत कामोठ्यात ‘जनता दरबार’

नागरिकांच्या समस्या सोडविल्या ऑन दी स्पॉट कामोठे : रामप्रहर वृत्त येथील सिडको कार्यालयात पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत जनता दरबार मंगळवारी (दि. 3) भरविण्यात आला. या जनता दरबारामध्ये स्थानिक नागरिकांच्या विविध समस्या ऑन दी स्पॉट सोडविल्या गेल्या असून, त्यांचे निराकरण करण्यात आले. …

Read More »

मीडियाफोरम संस्थेला जाहिरात क्षेत्रातील उदयोन्मुख पुरस्कार

मुंबई : प्रतिनिधी जाहिरात या क्षेत्रात विविध संस्था काम करीत असून स्पर्धाही तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे. या स्पर्धेत टिकाव धरून नागपूरच्या मीडियाफोरम प्रा. लि. जाहिरात संस्थेला मुंबई येथील सोलटच मीडिया प्रा. लि व मुख्य प्रवाहातील वृत्तपत्राद्वारे सन 2019च्या उदयोन्मुख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  माध्यम प्रमुख …

Read More »

नेरूळ जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात

लवकरच नेरूळ ते भाऊचा धक्का जलवाहतुकीचा प्रारंभ नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोच्या जल वाहतूक प्रकल्पांतर्गत लवकरच नेरूळ ते भाऊचा धक्कादरम्यान कॅटामरान सेवा सुरू होणार आहे. तसेच या प्रकल्पाअंतर्गत सिडकोतर्फे नेरूळ येथे उभारण्यात येत असलेल्या जेट्टीचेही काम अंतिम टप्प्यात आले आहे. नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सिडकोतर्फे …

Read More »

उलवे येथे महिलेची गोळी घालून हत्या

पनवेल : बातमीदार बँकेत गेलेल्या पतीची वाट पहात कारमध्ये बसलेल्या महिलेला अज्ञात मारेकर्‍याने कारसह पळवून नेऊन आणि नंतर रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी भरदुपारी उलवे येथे घडली. प्रभावती भगत (50) असे या महिलेचे नाव असून, त्यांच्याकडील दागिने लुटले गेले नसल्याने या हत्येच्या कारणाविषयी गूढ निर्माण झाले …

Read More »

द्वारकादास शामकुमार शोरुमचा भव्य शुभारंभ सोहळा

पनवेल : शहरात द्वारकादास शामकुमार या नुतनीकरण करण्यात आलेल्या साडीच्या शोरुमचा भव्य शुभारंभ सोहळा रविवारी झाला. या शोरुमचे उद्घाटन महापौर डॉ. कविता चौतमोल, सिनेअभिनेत्री प्राजक्ता गायकवाड व अनघा कडु यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Read More »

वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीचा अभ्यास दौरा

मोहोपाडा : प्रतिनिधी ग्रुप ग्रामपंचायत वासांबे-मोहोपाडा ही 17 सदस्य असणारी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या वतीने 14व्या वित्त आयोगाअंतर्गत ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांचा अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला होता. एकूण 27 जण या दौर्‍यात सामील झाले होते. या वेळी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे, त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने गावासोबत …

Read More »

बीसीटी विधी महाविद्यालयात फूड फेस्ट उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लेक्चर सिरीज, रोझ डे, मिस-मॅच डे, ट्रॅडीशनल डे, मराठी भाषा दिवस, सारी डे आणि फूड फेस्ट 2020 अशा विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि शिक्षणेतर कार्यक्रमांची रेलचेल होती. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे उपक्रम …

Read More »

दहावीच्या विद्यार्थ्यांना मनस्ताप

परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शहरातील विद्युत पुरवठा खंडित पनवेल : वार्ताहर ऐन दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शहरातील काही भागाचा विद्युत पुरवठा पहाटेपासून खंडीत झाला होता. तो साधारण सहा तासानंतर पूर्ववत झाल्याने दरम्यानच्या काळात परीक्षेला जाणार्‍या विद्यार्थ्यांचे चांगलेच हाल झाले होते. त्यामुळे पालकांनी सुद्धा वीजवितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराबाबत संताप व्यक्त केला आहे. …

Read More »