Breaking News

Yearly Archives: 2020

पोलादपूर-खेडदरम्यान महाकाय भुयारी मार्ग

पोलादपूर ः प्रतिनिधीसार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वरील कशेडी घाटाला पर्याय म्हणून पोलादपूरमधील भोगाव ते खेड तालुक्यातील खवटीपर्यंत भुयारी मार्ग खोदण्याचे काम सुरू केले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हा सर्वांत मोठ्या लांबीचा भुयारी मार्ग असणार आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी मार्ग म्हणून पोलादपूरमधील भोगाव …

Read More »

रायगडात पर्यटनवृद्धीसाठी अधिक सेवासुविधांची गरज

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन अलिबाग ः जिमाका रायगड जिल्ह्यात पर्यटनवृद्धीच्या अनेक संधी आहेत, मात्र पर्यटनवाढीसाठी अधिक सेवासुविधा निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. रायगड जिल्ह्याच्या नियोजन भवन येथे सोमवारी (दि. 3) राज्य व केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा आढावा राज्यपालांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.या बैठकीस …

Read More »

माणगाव असोसिएशनची क्रिकेट स्पर्धा उत्साहात

माणगाव ः प्रतिनिधीमाणगाव येथील मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत फ्रेंड्स ग्रुप साई माणगाव संघाने अंतिम सामन्यात नाणोरे संघावर मात करीत सलग दुसर्‍यांदा अंतिम विजेतेपद मिळवून प्रथम क्रमांकाचे बक्षीस 10 हजार  रुपये व आकर्षक चषक पटकावला. येथील माणगाव क्रिकेट असोसिएशनच्या वतीने यंगस्टार उतेखोल माणगावतर्फे ही स्पर्धा घेण्यात आली. माणगाव शासकीय …

Read More »

धामणपाड्यातील क्रिकेट स्पर्धेत वादळ शहाबाजचे सुयश

श्रीगाव : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील धामणपाडा येथे रविवारी (दि. 2) विहार इलेव्हन क्रिकेट क्लब धामणपाडा यांच्या वतीने व पोयनाड शहाबाज पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन शहाबाज ग्रामपंचायत सरपंच धनंजय म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यात वादळ शहाबाज संघ अंतिम विजेता ठरला. त्यांना …

Read More »

आडघरचा छावा क्रिकेट संघास अंतिम विजेतेपद

माणगाव ः प्रतिनिधीलहाने सुरव येथील मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत आडघरचा छावा क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब कोशिंबळे संघावर मात करीत अंतिम विजेतेपद मिळवून प्रथम क्रमांकाचे बक्षीस 10 हजार  रुपये व आकर्षक चषक पटकावला. येथील एकता ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने कोयना वसाहत रोहीनेतर्फे ही स्पर्धा …

Read More »

‘केपीएल’मध्ये रत्नदीप स्पोर्ट्स क्लबची विजयी हॅट्ट्रिक

खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्तसंजय भोपी सोशल क्लब (डखइडउ), अलर्ट सिटीझन फोरम खांदा (अउऋघ), मॉर्निंग योगा ग्रुप (चधॠ) यांच्या संयुक्त विद्यमाने खांदा कॉलनी क्रिकेट प्रीमियर लीग (40 +) क्रिकेटच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये रत्नदीप स्पोर्ट्स क्लब, धाकटा खांदा या संघाने 2018, 2019, 2020 या तीनही वर्षांत प्रथम …

Read More »

रोहितची किवी दौर्‍यातून माघार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था न्यूझीलंड दौर्‍यात टी-20 मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवणार्‍या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाने नुकताच पाच सामन्यांच्या मालिकेत 5-0 असा विजय मिळवत इतिहास घडवला होता. जागतिक क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाला आतापर्यंत पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील सर्व सामने जिंकता आले नव्हते, पण विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने हा …

Read More »

पनवेल पालिकेचे सुरक्षा रक्षक महेश वाहूळे यांचे कौतुक

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे सुरक्षा रक्षक महेश अर्जुन वाहूळे यांनी एका कॉलेज युवतीचा हरवलेला मोबाइल परत केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. जहिर अहमद उस्मानगनी शेख यांची कन्या हदा शेख ही बस मधुन याकुब बेग हायस्कुलला जात असतांना महापालिकेच्या गेट समोर तीचा मोबाइल बॅग मधुन खाली पडला. महापालिका …

Read More »

रसायनीतील तरुणांकडून शिवस्मारकांचे सुशोभीकरण

मोहोपाडा : प्रतिनिधी वाढदिवस सोहळा आणि त्यासाठी केला जाणारा खर्च न करता रसायनीतील तरुणांनी शिवस्मारकांचे सुशोभीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे रसायनी परिसरातील शिवस्मारकाच्या आवारात स्वच्छता असून शिवस्मारकाचे आकर्षण होत आहे. रसायनी येथील एचओसी कॉलनीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाचे नूतनीकरण व महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरणाचे काम युवा पिढीने हाती घेत …

Read More »

राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत चमकल्या ‘सीकेटी’च्या विद्यार्थीनी

पनवेल : रामप्रहर वृत्त 28 जानेवारी 2020 ते 30 जानेवारी 2020 दरम्यान नागपूर येथे झालेल्या ‘ऑल इंडिया फोर्थ नॅशनल डान्स कॉन्टेस्ट अ‍ॅण्ड फीस्ट’ मध्येे सीकेटीच्या विद्यार्थीनींनी चांगलेच सुयश प्राप्त केले आहे. वैयक्तिक नृत्य स्पर्धेत चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यमाची विद्यार्थीनी सई मयुरेश जोशी हिने प्रथम क्रमांक संपादन केला. देशभरातील …

Read More »